केज येथे शेकापचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील, लोकशाहीर काॅ.अण्णाभाऊ साठे यांचे विचारानेच शेतकर्यांच्या जिवनात क्रांती शक्य -डाॅ.प्रा संतोष रणखांब

केज येथे शेकापचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

केज (बीड) ३ ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील,लोकशाहीर काॅ.अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती व शेतकरी कामगार पक्षाच्या 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्षाच्या वर्धापण दिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित केलेले असतात मात्र या वेळेस सिटी केबल फेसबुक लाईव्ह कार्यक्रम शिक्षक पतपेढी येथे घेण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापण दिनानिमित्त केज येथे पक्ष कार्यालयासमोर पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहन भाई अॅड.नारायण गोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर नुतन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन भाई अॅड. संग्रम तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेयांच्या जयंती निमित्त व शे.का.पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. प्रा.संतोष रणखांब यांचे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी प्रसंगी वक्ते प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनात क्रांती व्हावी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या खांद्यावर लालबावटा घेऊन शेतकऱ्यांची चळवळ उभी केली. या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. या महापुरुषांनी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून आणण्यासाठी टोकाचा संघर्ष केला. शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनात क्रांतिसिंह नाना पाटील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानेच क्रांती शक्य असून तरुणांनी क्रांतिसिंह नाना पाटील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन संघर्ष केला पाहिजे असे सांगून मार्क्सवादी विचाराने देशातील नव्हे तर जगातील कष्टकरी श्रमकरी वर्गाला न्याय मिळू शकतो हे अनेक देशातील क्रांतिकारकांनी आपल्या संघर्षातून दाखवून दिले आहे.असे वक्तव्य केले या वेळी विचारपिठावर भाई मोहन गुंड प्रा हनुमंत भोसले भाई भीमराव कुटे जि डी देशमुख भाई प्रवीण खोडसे भाई अशोक रोडे भाई मंगेश काका देशमुख भाई महेश गायकवाड बाबाराजे गायकवाड निखिल बचुटे अशोक डोंगरे सुमित वाघमारे किरण पारवे इत्यादीची उपस्थिती होती तर मारुती राया शिंदे यांनी कोरोना महामारीत केज शहरात जनजागृती करुण जनतेत कोरोणाचे भय कमी करण्यासाठी लढणारा योद्धा म्हणून त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाई मोहन गुंड केले सुत्रसंचलन हनुमंत घाडगे तर आभार महेश गायकवाड यांनी केले

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *