केज येथे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हास्तरीय अभ्यास शिबीर
*केज येथे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हास्तरीय अभ्यास शिबीर
क्रांतिकारकांच्या विचारा शिवाय परिपक्व कार्यकर्ता होऊ शकत नाही -भाई उमाकांत राठोङ
जिल्हाभर तालुकास्तरावर कार्यकर्ता शिबीर घेणार – मोहन गुंड
केज प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा अभ्यास शिबिर भाई मोहन गुंड यांच्या पुढाकाराने आज दि.6 सप्टेंबर रोजी केज येथे संपन्न झाले. या शिबिराच्या सुरुवातीस क्रांतिसिंह काॅम्रेड नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांना श्रद्धांजली अर्पण करून, अभ्यास शिबिराचे पहिल्या सत्राचे उद्घाटन भाई अॅड. संग्रम तूपे यांच्या हस्ते झाले तर या पहिल्या सत्राला भाई प्रा. डॉ. उमाकांत राठोड यांनी मार्क्सवाद,शेतकरी कामगार पक्ष व पक्षापुढील आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले,भाई प्रा. चंद्रकांत चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्ता व पक्षाची वाटचाल या विषयावर सविस्तर विवेचन केले या सत्राचे अध्यक्ष शत्रुगण तपसे हे होते,तर दुसऱ्या सत्रात पक्षाचा कार्यकर्ता व कार्यपद्धती याविषयावर भाई अॅड. नारायण गोले पाटील यांनी प्रबोधन केले तर पक्षबांधणी,गतिमान चळवळ या विषयावर भाई मोहन गुंड यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी पक्षातील कार्यकर्ते आधीचे मनोगत व प्रश्न यावर सविस्तर चर्चा प्रा. भाई उमाकांत राठोड यांनी केली,भाई अनिकेत देशमुख यांनी पक्षाच्या क्रांतिकारी विचारधारेवर प्रकाश टाकला तर सौरभ संगेवार गणेश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण खोडसे यांनी केले यावेळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची शेवटी पक्षाची प्रतिज्ञा घेऊन बीड जिल्ह्यात प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरा घरात शेतकरी कामगार पक्षाचे विचार पोहोचवण्याचा निर्धार केला या कार्यक्रमाला भाई दत्ता प्रभाळे,भाई भीमराव कुटे,भाई अनिल कदम,भाई निलेश पानखडे, भाई शेख वजीर भाई पापा सोळुंके,भाई माऊली जाधव उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी भाई अशोक रोडे,भाई प्रवीण खोडसे, भाई निखिल बचुटे ,भाई मंगेश देशमुख,भाई बाबा गायकवाड, शेबाज फारोकी सुमित वाघमारे बबलू फारोकी किरण पारवे आदींनी परिश्रम घेतले.