मालेगावात शेकापचा रास्ता रोको: वाहतूक ठप्प
राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
मालेगाव : मालेगाव येथून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल या २२२ महा मार्गाचे चौदपदरी करणाचे काम पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनी कडून होत असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता तपासून कंत्राटदारांविरूद्ध व रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मालेगाव येथील महामार्गावर शेकापचे जिल्हा चिटणीस भाई शुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मालेगाव येथून २२२ या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू असून सदरील काम पाटील कन्स्ट्रक्शन कडून होत आहे.या रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.हे काम पूर्ण होण्या अगोदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्याची गुणवत्ता नियंत्रण मंडळाकडून तत्काळ तपासणी करण्यात यावी व पाटील कन्स्ट्र्शन प्रा.ली.पुणे व संबंधित कामावरील अभियंते आणि कंत्रादारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.
शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड जिल्हा चिटणीस भाई सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलकांवर यावेळी विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनात पिंटू तारु, बंटी शेळके,रोहन गायकवाड, धनंजय घोडके, मारोती शिंदे, श्रीकांत कांबळे, पवान कांबळे, कैलास वाघमारे, सूरज हनुमंते, स्वप्नील खंदारे, पांडुरंग वालमरे, प्रकाश अटकोरे, रघुनाथ खंदारे, सिद्धार्थ अटकोरे, आकाष साखरे, सोनू गायकवाड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.