नीट परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड वेबसाईटवर पुन्हा सुरु करा : भाई राहुल पोकळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यास रोल नंबर आवश्यक आहे. पण नीट परीक्षा दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी झाल्यानंतर विद्यार्थीकडुन प्रवेशपत्र (admit card) उपस्थिती कारणावरुन जमा करून घेतले गेले, त्यामुळे विद्यार्थीना विना परीक्षा बैठक क्रमांक सदर परिक्षेच्या निकालाची प्रत प्रिंट काढता नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.NTA NEET ची पुढील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. विना निकाल प्रत पुढील प्रवेश आणि इतर प्रक्रिया विद्यार्थ्यांना करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थीचे पुर्ण वर्षभराचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर NTA NEET केंद्रीय परीक्षा मंडळाशी चर्चा करून प्रवेशपत्र (admit card) डाऊनलोड करण्यासाठीची बंद असलेली वेबसाईट चालु करावी.व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही भाई राहुल पोकळे यांनी केली आहे.