रावण दहनाची प्रथा बंद करा : भाई रामदास जराते यांचे आवाहन
गडचिरोली(२५ ऑक्टोबर): राजा रावण हे संपूर्ण आदिवासी समाजाचे दैवत आणि आदर्श आहेत त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी यापुढे करु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
धानोरा तालुक्यातील परसवाडी येथील रावण मंदिर येथे मुळनिवासी कोया वंशीय,महान ज्ञानी पंडित, आदिवासी राजा रावण यांचे पुजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते हस्ते अत्यंत साधेपणाने आणि शारीरिक अंतर ठेवून करण्यात आले.यावेळी पुरोगामी युवक संघटना जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, धानोरा तालुका चिटणीस भाई हिरामण तुलावी गावाचे पोलीस पाटील शामराव पोरेट्टी,गाव पुजारी मोतीराम हलामी, वसंत हलामी, विनायक तुलावी, देवराव आतला, हरिश्चंद्र शेडमाके,आशिष प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई रामदास जराते पुढे म्हणाले,जे लोक रावण दहन करतात त्यांनी आपले कर्तृत्व तपासले पाहिजे.केवळ मनुवादाने प्रेरीत पोथीनिष्ठ कथांच्या आधारावर मुळनिवासी पराक्रमी राजाला वाईट ठरवून त्याचे दहन करुन मुळनिवासींना हिणवण्याचा प्रकार यापुढे गैर आदिवासींनी बंद करावा असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तानाबाई हलामी,जाणीबाई टेकाम,पार्वता कड्यामी,वच्छला जाळे,जैवंता पदा,विमल पोरेट्टी,कांता पोरेट्टी, वनिता
तुलावी,रावण दलाचे कार्यकर्ते पुनेश्वर उसेंडी, कैलास दुग्गा, आशिष पोरेट्टी,विजय जाळे, अमीत पोरेट्टी, महेंद्र सलामी,प्रल्हाद हलामी यांनी परिश्रम घेतले.