डॉ.आ.ह. साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” सन्मान मिळण्याकरीता पाठपुरावा करणार : आमदार भाई जयंत पाटील
डॉ.आ.ह. साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार भाई जयंत पाटील
भाई राहुल पोकळेंच्या मागणीची घेतली दखल
पुणे ( २८ ऑक्टोबर) : डॉ.आ.ह. साळुंखे हे साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी साधारण ५५ पुस्तके लिहीलेली आहे व त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पुस्तके लिहीली पीएचडी मिळवलेली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा “महाराष्ट्र भूषण” हा सन्मान मिळावा यासाठी आपण पुरेपूर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी दिले.
भाई जयंत पाटील पुणे येथे आले असता, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे डॉ.आ.ह.साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” सन्मान मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली असता भाई जयंत पाटील यांनी हे आश्वासन दिले आहे.
भाई जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात भाई राहुल पोकळे यांनी म्हटले होते की, डॉ.आ.ह.साळुंखे सरांच्या लिखानामुळे बहुजन समाजात उर्जा निर्माण झालेली आहे. बहुजन चळवळीतील त्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर ज्यांचे नांव अभिमानाने घेतले जावे अशा डॉ.आ.ह. साळुंखे सरांना ” महाराष्ट्र भूषण ” हा सन्मान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तो फक्त त्यांचा सन्मान नसुन समस्त चळवळीचा सन्मान ठरेल. त्यामुळे आपण आपल्या पक्षामार्फत महाराष्ट्र शासनास पाठपुरवठा करुन डॉ.आ.ह. साळुंखे सर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही भाई राहुल पोकळे यांनी आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे केली होती.यावेळी शेकापचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे,भाई चंद्रशेखर पाटील,भाई संपतराव पवार,भाई सागर आल्हाट,भाई भाई मोहन गुंड,भाई ॲड.संग्राम तुपे,भाई ॲड नारायण गोरे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.