मागील वर्षी एफआरपी पेक्षा ऊसाला कमी दर देऊन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना फसवले – भाई मोहन गुंड
एफ आर पी प्रमाणे ऊस बील द्या शेकापची साखर आयुक्तांकडे तक्रार
बीड (७नोव्हेंबर): बीड जिल्ह्यामध्ये जवळपास डझनभर साखर कारखाने असून बीड जिल्ह्याला लागून असलेले शेजारील जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांनी देखील मागील वर्षाच्या ठरवुन दिलेल्या एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिल दिले नसल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
मागील वर्षी ऊस हागामात कारखान दाराकडुन शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे ऊस बील देऊ इतर कारखान्याच्या तुलनेत शंभर रुपयांचा हप्ता अधिक देऊ असे खोटे आश्वासन जिल्ह्यातील कारखान्याच्या चेअरमनी मोठ मोठ्या गप्पा मारल्या पण बील मात्र देत असताना जिल्ह्यातील कुठल्याच कारखान्यांनी एफआर पी प्रमाणे बील दिले नाही,जमेल तस बील देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली, रिकव्हरी देखील कमी दाखवून शेतकऱ्यांना लुटलं गेलं एकाच जिल्ह्यातला ऊस एकाच गावातला ऊस दोन कारखान्याला गेला तर संबंधित शेतकऱ्याला वेगवेगळे भाव मिळाले ही मनमानी साखर कारखानदारांनी केली या मध्ये शेतकऱ्याची मोठी फसवणूक केली आहे अशी तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी साखर आयुक्ताकडे केली आहे.
मागील वर्षाची एफआरपी मिळावी चालू हांगामात १४ दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पेमेंट जमा करावे अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिवाळीत आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड भाई ॲड. नारायण गोले, भाई ॲड. संग्राम तुपे, भाई दत्ता प्रभाळे, भाई भिमराव कुटे, अर्जुन सोनवणे यांनी निवेदनात दिला आहे.