लोकनेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे पार्थिवावर सांगोला सूतगिरणीच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हजारो कार्येकर्ते समर्थकासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांच्या उपस्थित गणपतरावांना अखेरचा लाल सलाम.. सांगोला (३१ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वविक्रमी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा पार्थिव देह अंत्य दर्शनासाठी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे दुपारी ठेवण्यात आला. यावेळी अंत्य दर्शनासाठी राजकिय लोकप्रतिनिधी सह सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाई गणपतराव देशमुख यांचे शुक्रवार दि. ३० जुलै रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते. विधानसभेवर एकाच मतदारसंघातून ते सर्वाधिक वेळा निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूरजिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा ते निवडून आले होते. साधी राहणी व उच्च…

विधिमंडळाच्या ५५ वर्ष कामकाजाचा साक्षीदार हरपला

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, विश्वविक्रमी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे निधन सोलापूर (३० जुलै) : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, कष्टकरी – शेतकरी – कामगार – दलित – श्रमिक – बहुजन समाजाचा महाराष्ट्र राज्य विधानसभेतील बुलंद आवाज, जनतेच्या प्रश्नावर विधिमंडळात आणि रस्त्यावरील आंदोलनात धडाडणारी तोफ,सत्ताधाऱ्यांना जनहिताचे कायदे करण्यास बाध्य करणारे मुरब्बी राजकारणी, ११ वेळा विधानसभेवर निवडून येऊन आमदारकीचा विश्वविक्रम करणारे,महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री ॲड. डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले. सोलापूर येथील अश्विनी या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपासून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल…

बॅंकेच्या दारावरच शेकापचे ठिय्या आंदोलन

अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासू : भाई ॲड.नारायण गोले पाटील यांचा इशारा माजलगाव ( २९ जुलै) : परळी शिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात कानाडोळा करत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी बोलताना, बँक प्रशासन शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचे पाप करीत असून हतबल झालेला शेतकरी उद्ध्वस्त होत असताना निगरगट्ट प्रशासन शेतकऱ्यांना सहकार्य करणार नसेल तर अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासू व सुतासारखे अधिकाऱ्यांना सरळ करु असा खरमरीत इशारा दिला. यावेळी भाई सुमंत आण्णा उंबरे,भाई माउली जाधव, सिद्धेश्वर नायबळ,…

ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा

अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार भाई जयंत पाटील यांचे आवाहन सोलापूर (२८ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी दिली. सोलापूर येथील अश्विनी या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. आज भाई जयंत पाटील, सुप्रीयाताई पाटील,प्रा.एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड राजेंद्र कोरडे  यांनी भाई गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. संबंधित डाॅक्टर आणि परिवारातील सदस्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली असून भाई गणपतराव देशमुख यांच्या…

शेकडो युवकांनी लाल बावटा घेतला खांद्यावर

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप मध्ये इन्कमिंग सुरूच..! पनवेल (२५ जुलै) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांना घेऊन शेतकरी कामगार पक्ष जनतेच्या सोबत आवाज उठवत आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने लावलेल्या कर प्रणाली ला खांदा कॉलनी येथून नागरिकांचा जोरदार विरोध होत आहे यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.भाई प्रितम म्हात्रे यांच्या नागरिकांसाठी आणि युवकांसाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल प्रभावित होऊन खांदा कॉलनी येथील रोहन व्हटकर मित्र परिवार युवा कार्यकर्त्यांनी आज शेतकरी कामगार पक्षा मध्ये महानगरपालिका विरोधी पक्षनेते भाई प्रीतम…

आपदग्रस्तांच्या मदतीसाठी शेकापचा पुढाकार

महाड, चिपळूण मध्ये पोहचले अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि साधने महाड ( २५ जुलै) : महाड मधील तळये येथील दरडग्रस्त आणि चिपळूण येथील पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पुढे सरसावला आहे.शेतकरी कामगार पक्षातर्फे आतापर्यंत दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, बिस्किटे,राशन, पिण्याचे शुद्ध पाणी आणि आपत्तीनंतरचा मलबा साफ करण्यासाठी जेसीबी, डंपर, ग्रेडर अशी विविध साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. दरम्यान शेकापक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस ॲड.आस्वाद उर्फ पप्पूशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी, रायगड जिल्हा परिषद सदस्य व आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेशशेठ खैरे, शेकापक्षाचे पोलादपूर तालुका चिटणीस व आरडीसीसी बँकेचे संचालक एकनाथ आप्पा गायकवाड, बोरावळे…

अन्यायकारक कृषी कायद्यांविरोधात डाव्या आघाडीचा ‘एल्गार’

राजकारण न करता घटनादुरुस्ती करून आरक्षण देण्याचे केले आवाहन मुंबई ( १५ जुलै ): महाविकास आघाडीने राज्य विधी मंडळाच्या पटलावर ठेवलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेवून केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांचा राज्यात अंमल केला जाणार नाही, असा ठराव करावा, अशी एकमुखी मागणी डाव्या पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आज शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर,बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी, लाल निशाण पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, रि.पा.ई. सेक्युलर, सी.पी.आय.(एम.एल.) लिबरेशन या महाराष्ट्रातील ११ डाव्या व प्रागतिक विचारांच्या राजकीय पक्षानी एकत्र…

शेकापच्या दणक्याने बॅंका आल्या ताळ्यावर

भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांनी घेतला कर्ज वाटपाचा आढावा माजलगाव (१३ जुलै ) : सर्वसामान्य शेतकरी हा पेरणीच्या काळामध्ये अडचणीत असतो अशावेळी कर्जासाठी जे शेतकरी पात्र असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे. पात्र असणारा एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, असे आदेश माजलगावच्या तहसीलदारांनी तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत. माजलगाव तालुक्यातील बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाकरीता हेकेखोरपणाची भूमिका घेत असून हजारो शेतकरी ऐन हंगामात बॅंकेच्या दारावर ताटकळत उभे ठेवले होते. याबाबतची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या कडे अनेक शेतकऱ्यांनी केली होती. याचा जाब विचारण्यासाठी बॅंकेत गेलेल्या भाई…

आरक्षण प्रश्नावर भाजप – काॅग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहेत : भाई जयंत पाटील यांची टीका

शेतकरी कामगार पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश सांगोला ( १३ जुलै ) : आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, संविधानाने तो अधिकार संसदेला दिला आहे. मराठा, ओबीसी किंवा इतरांना आरक्षण द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती करून तशी सुधारणा करण्याची गरज असतांना राज्यातील महाआघाडी आणि भाजप हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. सांगोला तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज आबासाहेबांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशा प्रसंगी भाई जयंत पाटील बोलत…

देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु

गोरगरीब कष्टकरी जनतेकडे सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्षांचा होतोय दुर्लक्ष : भाई जयंत पाटील यांची टिका मुंबई ( ११ जुलै ) : करोनाने संपूर्ण देश त्रस्त असून सुद्धा सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्ष हे कोणीही गोरगरीब आणि कष्टकऱ्यांकडे लक्ष देत नाही, खोटे दावे करत खुर्चीच्या माध्यमातून एक किळसवाणा प्रकार आज देशात सुरु आहे. अशी टिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे. गेले दोन महिने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, विद्यार्थी नेत्या साम्या कोरडे, पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर…