क्रांतिदिनी अंबेजोगाईत निघाला शेकापचा लक्षवेधी बैलगाडी मोर्चा
शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी न लागल्यास रुमने हातात घेऊन आंदोलन करू- भाई मोहन गुंड
आंबेजोगाई (९ ऑगस्ट) : शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर क्रांतीदिनी शेतकरी कामगार पक्षाचा आंबाजोगाई येथे सोमवार दि ९ ऑगस्ट रोजी शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. अंबाजोगाई शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून बैलगाडी मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
शेकापचे जेष्ठ नेते गणपत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली. या वेळी अॅड नारायण गोले यांनी केंद्र सरकार वर कडाडुन टिका केली, मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळात रुमने हातात घेऊन आंदोलन करण्याचा इशारा भाई मोहन गुंड यांनी दिला,तीन कृषी कायदा रद्द करा पिक विमा वाटप करा शेतकऱ्यांना मिळत नसलेले पिक कर्ज संजय गांधी निराधार मानधन वेळेवर मिळावे, हमाल कामगारांना माथाडी कामगार मध्ये समावेश करून घ्यावा सरसकट पीक कर्ज माफ करण्यात यावे, यासह शेतकऱ्याच्या अनेक प्रश्नावर मोर्चेच आयोजन करण्यात आले होते.
अनेक बैलगाड्या घेऊन शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी अॅड नारायण गोले पाटील कॉ. कापसे सर भाई भीमराव कुटे,वजीर शेख नावानाथ जाधव बाळु तरकसे महेश गायकवाड सोनु पंचाळ, बलभिम भगत, राहुल शिंदे, अमोल सावंत, अनिल कदम, प्रविण खोडसे गणपत कोळपे अशोक रोडे, भागवत मोरे राजु शेख आमीर शेख हबीब शेख, विवेक सुळुके, दिपक वाकचोरे, अशोक मुंडे, बंडू उघडे, मनोहर उघडे, गोविंद जाधव, गोविंद राजेभाऊ, मुंडे केदारी निलंगे, सहदेव सोळुंके, महादेव विकास निलंगे, गोपाळ फंड यांचा मोर्चाला पाठीबा माकपचे कॉ. बब्रुवान पोटभरे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण ठोंबरे,लोकशाही जोगदंड, बहुजन रयत परिषदेचे रमेश पाटोळे यांनी उपस्थित राहुन पाठींबा दिला.