कृषी संस्कृतीचा सण : नागपंचमी

 

– भाऊराव बेंडे

नागपंचमी हा सबंध भारतामध्ये साजरा केला जाणारा अब्राह्मणी सन आहे. अब्राह्मणी सन असण्याचे कारण ज्या सन उत्सव, परंपरा यामध्ये कुठल्याही प्रकारचे शोषण होत नाही त्यासाठी कुठल्याही पूरोहिताची मध्यस्थी लागत नाही, ते कृषी संस्कृतीशी नाते सांगतात ते सर्व अब्राह्मणी. या सणाचा भारतीय हिंदू समाजावर प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे त्या सणाची दखल घेणे महत्वाचे आवश्यक आहे.

नागपंचमी सणाचा भारतीय जनमानसावर असलेला प्रभाव:
————————————-

सबंध भारतामध्ये नागदेवतांची प्राचीन अशी मंदिरे अगदी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहेत. भारतामध्ये क्वचितच असे एखादेच राज्य असेल की जिथे नाग मंदिरं नसतील. भारताच्या अति उत्तरेकडील उत्तराखंड राज्यांमध्ये असलेल्या पिथोरगढ जिल्ह्यामध्ये बेरीनाग या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे येथे आसलेल्या पहाडाची नावे धोलीनाग पहाड , नागेश्वर पहाड अशी नाग नावावरूनच आहेत. या पहडामध्ये आजही भुमिया ( नाग) देवाची पूजा केली जाते. येथील मंदिरांची नावे ही बेरिनाग मंदिर, धोलिनाग मंदिर, फेनीनाग मंदिर, पेनिनाग, कलिनाग,सुंदरी नाग मंदिर असेच आहेत. बिहारमधील बेगुसराय आणि samastipur जिल्यात जिवंत साप घेऊन जुलूस काढतात त्याच बरोबर तो मंसुरचक आणि आगापुर येथेही काढतात. इलाहाबाद मध्येही असेच गंगेच्या काठावर वासुकी नाग मंदिर आहे. तसेच त्याच तटावर तक्षकेश्वर नाग मंदिर आहे. मध्यप्रदेश मध्येही उज्जैन येथे असेच प्रसिद्ध नागचांद्रेश्वर मंदिर आहे.
महाराष्ट्रामध्ये असलेल्या औढा नागनाथ मंदिर हे भारतातील प्रसिद्ध अश्या 12 ज्योति्लिंगांपैकी एक आहे. याच मंदिराच्या बाजूला आसपास नाग नावावरूनच गावे आहेत . वाराणाशिमध्येही नागमंदिर असून त्याच्या बाजूला नागकुप आहे. असेच जगातील सर्वात प्राचीन रहस्यमयी नागमंदिर हे केरळ मधील मन्नारसा येथे आहे.

अश्या प्रकारे सबंध भारतामध्ये नागपंचमी नागदेवता यांचा प्रचंड प्रभाव आहे. अगदी भगवान शिव यांच्या गळ्यात आणि वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्याशीही नाग गण संबंधित आहेत. ते त्यांच्या शिल्पावरून दिसून येते.

नाग पंचमीचे स्वरूप:

नाग पंचमी सबंध भारतामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा सन आहे. भारतामध्ये राज्यस्थान, आसाम, बिहार, बंगाल, नागालँड, महाराष्ट्र, केरला, मनिपूर, मध्यप्रदेश आणि जवळपास सर्वच भारतामध्ये हा सण साजरा केला जातो.
हा सण शुद्ध अब्राह्मणी आहे तो कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा आहे. शेतील सर्व महत्त्वाचे कामे ही उरकून झालेली असल्याने शेतात पीक हे लहा लाहा दिसत असल्याने हा सण तसा हर्ष आणि उल्हासाचा सन . लग्न करून गेलेल्या बायका या सणाला पहिल्यांदा माहेरी येतात. त्यांच्यासाठी हा सण विशेष ओढीचा आहे. या सनाविषयी एक असेही मत आहे की हा नाग , सर्प हे शेतीची नासधूस करणारे उंदीर संपवतात आणि शेतीचे रक्षण करतात म्हणून त्यांच्या प्रती पूज्यभाव व्यक्त करण्यासाठी ही साजरा केला जातो.

या सणाचे स्वरूप :

1] या दिवशी चिरणे, कापणे, तळणे, चुलीवर तवा ठेवणे, त्याच बरोबर नागर चालवणे, आणि जमीन खानने निषिद्ध आहे.

2] या दिवशी स्त्रिया ह्या भावासाठी आयुष्य मिळावे म्हणून उपवास धरतात.

3] या दिवशी चिखलाचे नाग बनवून त्याच्या प्रतिकाची पूजा केली जाते.

4] या दिवशी पाटावर रक्त चांदणे किंवा हळदीने नऊ नाग तर कुठेकुठे पंच नाग काढले जातात.

5] या दिवशी फक्त स्त्रियांचं या नागाची किंवा त्या प्रतीक पूजा करतात हा सण मुख्यतः स्त्रियाच साजरा करतात.

6] या दिवशी झाडाला झोके बांधून तो खेळून हा सण उत्साहाने साजरा केला जातो.

नाग पंचमीचा मिथक् आणि त्याची उकल.

नागपंचमी विषयी भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे मिथक आहेत.

नाग गणाविषयी:

नाग हे कुणी सरपटणारे प्राणी नव्हते तर ते एक मानवी गण होते त्यांच्या गणाचे गण चिन्ह हे नाग होते त्यावरून तो नाग गण म्हणून ओळखला गेला.

एकंदरीत नागाविषयी सांगायचे झाले तर अगदी स्त्रीसत्तेपासून ते रामायण, महाभारत आणि तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत त्यांनी स्वतःचा गण टिकून ठेवला होता त्यानंतर तो जातिव्यवस्थेत विभागला गेला मात्र काही आदिवासी समुहनी त्यांनी ही ओळख आतापर्यंत अशीच टिकून ठेवली आहे त्याचाच परिणीती हे नागांच्या नावाने नागालँड ( नाग भूमी) हे राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या गणाची ओळख ही उत्तर भारतातील आसाम, मिझोराम, मणिपूर, नागालँड या आदिवासी जमातींत जपून ठेवली आहे याचे महत्त्वाचे कारण हे त्यांच्यात जाती व्यवस्था नसणे हे आहे. उर्वरित भारतात मात्र ह्या गणाचे लोक इतर जातीत मिसळून गेले आहेत मात्र त्यांची नागगणाची त्या गण चिन्हांची नेणीव अजूनही टिकून आहे त्यामुळेच ते प्रतीकात्मक रुपात नागपंचमी साजरी करतात.

ज्या पंच नागाची पूजा केली जाते त्यापैकी अनंतनाग( शेष) ज्याच्या की नावाने जम्मू आणि काश्मीर मध्ये अनंतनाग नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे तक्षक याही नागाच्या नावाने पाकिस्तानमध्ये तक्षशिला नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर वासुकी,पद्मनाभ नाग, कालिया हे येतात. आणखीही येरावत, कर्कोटक, धृतराष्ट्र ह्याही नागांचा उलेख आढळतो. भारतातील नागालँड आणि विदर्भातील नागपूर हे नागांच्या इतिहासाचे खूप महत्वाचे असे ठिकाणे आहेत. नागपुर हा जिल्हा नाग नदी, बाजूला नाग टेकडी असलेला आहे. संपूर्ण विदर्भाला नागविदर्भ म्हणून ओळखले जाते.मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ येथे नाग नाथाचे भारतातील आठवे ज्योतिर्लिंग आहे.

मध्यप्रदेश येथे विदिशावर शेष, भोगिन, सदाचद्र, भूतनंदी, शिशूनंदि, यशनंदि या नाग राज्यांनी राज्य केल्याचा उलेख हा पुराणात आधलून येतो. पुराणातील आणखी एका उल्लेखामुळे नागानी मथुरा, विदेशा, कांतीपुरी आणि पद्मावती येथे राज्य केल्याचा उलेख आहे.

नागपंचमी आणि या सणाचे स्त्रीसत्तेशी असलेले आदीबंध.

भारतातील बहुतेक अभ्यासक हे नागवंशी हीच caonsept वापरतात मात्र जगाचा विचार केला सर्व मानव हे मुख्य तीन वंशात म्हणजे निग्रो इड, कोकेसाईड आणि मंगोलॉईड या वंशात सामावलेले आहेत . याचे अजून काही उपवंश देखील आहेत मात्र त्यात नागवंशाचा उल्लेख नाहीये. याचाच अर्थ नाग हा वंश नसून तो गण आहे. मुळात गनाचि निर्मिती ही. ही स्त्रीचं तिच्या नावाने करू शकते हे केव्हा शक्य होते तर शेतीतील वरकड उत्पादनाने शक्य होते आणि वरकड उत्पादन गनाचि राष्ट्री कृषी मायेमुळेच घेऊ शकते. या नाग गणाचि कुणी तरी राष्ट्री असली पाहिजे. तर पुराणामध्ये कृदू ही ब्राम्हण कष्यापाची पत्नी नागमाता म्हणून दाखवली आहे.मात्र इतर कुठेही तिचा उलेख किंवा शिल्प आधळून येत नाही.

मात्र एवढ्यावरच ती नाग गनाचि आद्य राष्ट्री होत नाही. त्यासाठी संशोधनाची अत्यंत गरज आहे. कारण नाग गण आहे या अर्थी त्या गणाची आद्य राष्ट्री नक्कीच असली पाहिजे. आणि ती आपल्या गण सभासदांना अभिक्तजलसिंचन विधीच्या माध्यमातून गण सदस्य करून घेत असेल त्यासाठी गणाची पुषकरणी ( great bath) आवश्यक असते. अशीच एक पुषकरणी ही काशिमध्ये आहे त्यास नागकुप ( नागाची विहीर) म्हंटले जाते .ती नीश्चीतच नाग गणाची पूषकरणी असली पाहिजे आणि तिथे नाग गणाचे राज्य असेल पाहिजे. केवळ एका पुराव्यावरून ही भक्कमपणे सांगणे योग्य नाही त्यासाठी आपल्याला आणखी पुरावे पाहिजेत जे की नाग गण हा स्त्रीसत्ताक गण होता आणि त्या गाणाची निर्मिती ही स्त्री सत्तेच्या राष्ट्रीय ने केली होती. हे सिद्ध करू शकतील. असाच एक पुरावा आपल्याला केरळ मध्ये सापडतो जिथे की स्त्रीसत्तेचा दीर्घ वारसा लाभला आहे. या केरळमध्ये मन्ना रसा हे केरळमधील सर्वात प्राचीन मंदिर नाग राजाचे आहे. या मंदिराच्या मार्गावर 30000 हजाराहून ही अधिक प्रतिमा आहेत. या मंदिराची विशेषतः ही की या मंदिरात पुजारी हा पुरुष नसून लबुदरी महिला आहेत.
मंदिराच्या मूळ ठिकाणी पूजा व इतर कामे करण्याची परंपरा ही लबुदारी घरांच्या सूनाना आहे. येथे मंदिराच्या बाजूला छोटासा तलाव आहे कदाचीत तो त्या गणाची पुशकरणी असू शकतो. या तलावात अंघोळ करूनच महिलांची संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. असे एक मिथ आहे.

सणाच्या वेळी या मंदिरात सर्वात वयस्क महिला ही नाग राजाच्या मूर्तीची पूजा करते. या सर्व बाबीतून कुठेतरी स्त्रीसत्तेच्या नेणिवेच्या तिच्या अस्तित्वाच्या खुणा आधलुन येतात आदीबंध जुळून येतात.

औंढा नागनाथ मंदिराच्या बाजूलाही अशीच एक बारव ( पुष्करणी) आहे जिला सासू सुनेची विहीर म्हणतात.

यानंतर बंगालमध्ये अशीच एक मनसा देवीची जी की नागदेवी आहे तिचे मंदिर आहे. राजस्थानमध्ये ही पिपादेवी आणि तेजादेवी अश्या सर्प देवता आहेत कदाचीत तिथेही पुष्करणी असू शकते.या सणाच्या दिवशी फक्त स्त्रियाच पूजन करतात त्यामुळेही हा स्त्री सत्तक तानत्रिकीचा सन असल्याचे चटकन लक्षात येते.

नागपंचमी विषयी भूमिका.
आजच्या घडीला तांत्रिकी स्त्रीसत्तेच्या अब्राह्मणी प्रवाहाची नेणीव जपणारे काहीच सन उत्सव आणि परंपरा ह्या शिल्लक राहिल्या आहेत ज्या आपल्या गत काळातील अब्राह्मणी प्रवाहाची उकल करू शकतात.

तेव्हा सर्व पुरोगामी संघटनांनी या अब्राह्मणी सणाचे महत्त्व ओळखून त्या सनाशी संबंधित असलेल्या मिथकांची उकल करावी. प्रत्येक सन उत्सव परंपरा यात काही ना काही तरी इतिहास दडलेला असतो. स्त्रीसत्ताक तांत्रीकी शृतिवर पुरुषसत्ताक वैदिकी श्रुतीने हिंसक विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर तिला बदनाम केले विकृत करून नेनिवेत लोटून दिले.

आपले खूप सारे सन उत्सव आणि महापुरुष असेच विकृत केले गेले त्यांचे दुष्ट नेणीवेकरण केले गेले ज्यांचे विकृतीकरण करता आले नाही त्यांचे सुष्ट नेनिविकरन करून त्याचे ब्राम्हणीकरण केले गेले.

सर्व पुरोगामी विचारवंतांनी या सणाला टोकाचा नकार न देता त्याची विधायक उकल करावी आणि आपला सांस्कृतिक वर्चस्व घट्ट करावे.

खरं तर नाग गण, नाग राजे यांच्या राजवटी, नाग गणाचे इतिहासातील सांस्कृतिक महत्व , इतिहासात त्यांचा आर्यांशी झालेला संघर्ष हा खरं खूप मोठा संशोधनाचा विषय आहे.

संदर्भ:
1] प्रिमिटिव्ह कमुनिझं मातृसत्ता स्त्री सत्ता आणि भारतीय समाजवाद
2] पत्रिका न्यूज पोर्टल
3]न्यूज 85 पोस्ट. कॉम
4] लोकसत्ता

सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक
महाराष्ट्र राज्य समन्वयक मानव मुक्ती मिशन.
7499520294

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *