शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बोंब मारो आंदोलन : शेतकरी कामगार पक्ष आक्रमक

दुष्काळासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बोंबमारो आंदोलन

शेतकरी कामगार पक्ष आक्रमक : प्रशासनाचा केला निषेध

बीड (२३ ऑक्टोबर):- बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, मागील वर्षाचे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना बिल वाटप करा कापसाला आठ हजार रुपये भाव द्या, डीसीसी बँक एकदिन प्रलंबित पिक कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा, बीड जिल्ह्यामध्ये सरसकट पिक विमा लागू करा यासह शेतकऱ्याच्या इतर हे प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकापचे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व बोंब मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शासनाच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार बोंममारो करुन कापसाची होळी केली. यावेळी ॲड. संग्रम तूपे, भाई नारायण गोले पाटील, सुग्रीव लाखे, भीमराव कुटे, दत्ता प्रभाळे, प्रवीण खोडसे, सौ. किस्किंदा पंचाळ, मनीषा जाधव, महेश गायकवाड, अर्जुन सोनवणे, हनुमंत नेहरकर, यशवंत सोनवणे, राजु शेख, ज्ञानेश्वर आंधळे, मुंजा पांचाळ, समाधान पोळ, लहू सोळुंके, सुदाम चव्हाण, अजय शेरकर, अमोल देवकाते, गवळी आंकुश, सूर्यकर्ण येवले, विष्णू येवले यांनी प्रशासनाचा निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *