शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो

  “जगातील डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा आयकॉन. जन्म अर्जेंटिनातला, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड मोटारसायकल वरून फिरणारा, क्युबन क्रांतीचा एक महत्त्वाचा नायक, त्यानंतर बोलिव्हियामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करणारा एक खराखुरा क्रांतिकारक. जगात जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे जाऊन लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे कॉम्रेड अर्नेस्टो चे गव्हेरा नक्कीच सर्व देशांच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवरील तमाम तरुणांचा आदर्श बनण्यावाचून कसा राहील. अर्नेस्टो चे गव्हेरा हे क्युबन क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे पुढारी, लढाऊ सेनापती, खुपच प्रभावी क्रांतिकारक होते. कारण ते जन्मले अर्जेंटिनामध्ये, क्रांतिकार्य केले क्युबात आणि तेच कार्य करताना शहीद झाले बोलिव्हियात. म्हणूनच तर ‘चे’ यांच्याबद्दल…

भांडवलशाहीच्या उन्मत्त गजराजाला काबूत ठेवू पाहणारा माहूत : कार्ल मार्क्स

  आईन्स्टाईनचा E=mc2 हा सापेक्षता सिद्धांत जसा कुठल्याही परिस्थितीत भौतिकशास्त्रातून आपणाला खोडता येणार नाही, त्याच प्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, कला ह्या सर्वातून कार्ल मार्क्सला आपण खोडू शकणार नाही. त्याने दिलेल्या मूलभूत सिद्धांतांचा आत्ताच्या परिस्थितीमधील संदर्भ शोधून मानवी जीवनाच्या सुधारणांसाठी वापर करणं अपरिहार्य आहे, पुढे होईल. तुम्ही पुरोगामी असा, मूलतत्त्ववादी असा, राष्ट्रवादी असा, धर्मवादी असा, समाजवादी असा, भांडवलदारी असा कुणीही असाल राजकीय, आर्थिक, सामाजिक धोरण राबवताना तुम्हाला मार्क्सचा विचार करणं भाग पडेल. तशी चिन्हं आता स्पष्टपणे जगभरात दिसून येत आहेत. प्रत्यक्ष मार्क्सवाद आणि भारतातील मार्क्सवादी साम्यवादाचं स्वरूप, कार्यपद्धती हे एक संपूर्ण स्वतंत्र प्रकरण…

कृषी संस्कृतीचा सण : नागपंचमी

  – भाऊराव बेंडे नागपंचमी हा सबंध भारतामध्ये साजरा केला जाणारा अब्राह्मणी सन आहे. अब्राह्मणी सन असण्याचे कारण ज्या सन उत्सव, परंपरा यामध्ये कुठल्याही प्रकारचे शोषण होत नाही त्यासाठी कुठल्याही पूरोहिताची मध्यस्थी लागत नाही, ते कृषी संस्कृतीशी नाते सांगतात ते सर्व अब्राह्मणी. या सणाचा भारतीय हिंदू समाजावर प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे त्या सणाची दखल घेणे महत्वाचे आवश्यक आहे. नागपंचमी सणाचा भारतीय जनमानसावर असलेला प्रभाव: ————————————- सबंध भारतामध्ये नागदेवतांची प्राचीन अशी मंदिरे अगदी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहेत. भारतामध्ये क्वचितच असे एखादेच राज्य असेल की जिथे नाग मंदिरं नसतील. भारताच्या अति उत्तरेकडील उत्तराखंड राज्यांमध्ये…

भाई जयंत पाटील : कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांचे ठाम वैचारिक नेतृत्व

७ जुलै १९५५ रोजी प्रभाकर पाटील आणि सुलभाताई पाटील यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांचे नाव ‘जयंत’ ठेवण्यात आले. जयंतभाईंनी पुढे महाराष्ट्राच्या समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा लाभलेल्या भाई जयंत पाटलांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून केली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर २७ जुलै २००० पासून विधान परिषदेचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत ते आजपर्यंत. राजकारण हा आमचा पैसा कमवण्याचा उद्योग नाही, तर अनेक उद्योगांच्या माध्यमातून कमावलेला पैसाही समाजकारण म्हणून राजकारणात वापरल्याचे भाई रोखठोकपणे सांगतात. मतदारसंघातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते…

कार्ल मार्क्स

(५ मे १८१८–१४ मार्च १८८३) साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता. १९१८ साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि १९४९ मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा मूळ प्रणेता. यहुदी वा ज्यू मातापितरांपासून पश्चिम जर्मनीतील ऱ्हाइनलंड या प्रांतातील ट्रीर शहरात कार्लचा जन्म झाला. पित्याचे नाव हाइन्‍रिख पित्याचा वकिलीचा धंदा चांगला चालत होता. त्याला खिश्चन धर्माचा स्वीकार करावा लागला त्याला ज्ञानोदय आंदोलनामध्ये रस होता, त्याचे कांट आणि व्हॉल्सेअर हे आवडते लेखक. कार्लला वयाच्या ६व्या वर्षीच बाप्तिस्मा मिळाला. कार्लचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ट्रीर याच गावी झाले. ज्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले त्याच्यावर…

वैदिकांनी गौण बनविलेला बहुजनांचा महान नायक “मारुती”

‘मारुति’ हा शब्द ‘मरुत्’ या शब्दापासून बनला आहे. मरुताचा पुत्र तो ‘मारुति’ होय. मरुताचे वंशापत्य, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ मारुती हा मरुताचा पुत्र वा मरुताच्या वंशात जन्माला आलेला पुरुष ठरतो. मारुतीचा मरुताशी जवळचा संबंध आहे. हे यावरून स्पष्ट होते. मरुत् हा केवळ एक पुरुष नसून तो अनेक जणांचा गण होता. त्यामुळेच ‘मरुत्’ हा शब्द वैदिक वाङ्मयात बहुतेक वेळा बहुवचनात वापरला जातो. मरुतांविषयी वैदिक ग्रंथांनी केलेले काही निर्देश आधी उद्धृत करावेत आणि मग त्यांच्या संबंधी काही विवेचन करावे, असे माझ्या मनात आहे. या मरुतांच्या संदर्भात वैदिक ग्रंथांनी घेतलेली एक भूमिका आपल्या दृष्टीने खूप…

लेनिन नावाचा अजरामर माणूस..

  लेनिन… जगाने अनुभवलेलं एक बिलोरी स्वप्न… व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून रशियात समाजवादाचा बीज पेरणारा हाडाचा क्रांतिकारक. क्रांतीच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख जोडून परिवर्तनाची पहाट आणणारा उगवत्या जगातील लाल सूर्य. विषमतेविरुद्ध लढणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील सच्च्या कार्यकर्त्यांच्या हृदयातील स्फुर्तीचा जिवंत झरा. सबंध जगावर आपल्या निस्सीम कर्तृत्वाने छाप पाडणारा एक मोठा माणूस. मृत्यूच्या 96 वर्षानंतरही ज्याच्या प्रेताच्या दर्शनासाठी रोज रांगा लागतात असा लोकप्रियतेचे शिखर गाठलेला रशियाचा अजरामर राष्ट्राध्यक्ष म्हणजे ब्लादिमीर लेनिन. 22 एप्रिल 1870 ला व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावरील सिम्बीस्क्र गावात एका शिक्षकाच्या पोटी सुसंस्कृत आणि सुखी कुटुंबात लेनिनचा जन्म झाला. सहा भावंडांतील लेनिन हे तिसरे अपत्य होतं. शालेय…

“मार्क्सवाद संपला आहे ?”

गेली अनेक दशकं हे पुनःपुन्हा ओरडून सांगितलं जातं आहे.एक साधा प्रश्न आहे, जर तो खरंच संपला असेल तर हे पुनःपुन्हा ओरडून सांगायची गरज का वाटते?कारण यामागं दडली असते एक भीती, जी प्रस्थापित वर्गाला आतून सतत पोखरत असते.या भांडवली जगात जगण्याची जणू जीवघेणी स्पर्धाच लागली आहे, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत इतरांना मागे टाकण्यासाठी धावतो आहे. त्यामुळे तो इतरांपासून सतत दुरावला जातो आहे. त्याला हवं असणारं आयुष्य तो जगू शकत नाही आहे आणि तो जे जगतो आहे ते त्याला नको आहे यामुळे तो स्वतः पासून देखील दुरावला जातो आहे. इतरांना दाखवताना सगळं काही आलबेल असल्याचा मुखवटा पण प्रत्यक्ष…