देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु

गोरगरीब कष्टकरी जनतेकडे सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्षांचा होतोय दुर्लक्ष : भाई जयंत पाटील यांची टिका मुंबई ( ११ जुलै ) : करोनाने संपूर्ण देश त्रस्त असून सुद्धा सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्ष हे कोणीही गोरगरीब आणि कष्टकऱ्यांकडे लक्ष देत नाही, खोटे दावे करत खुर्चीच्या माध्यमातून एक किळसवाणा प्रकार आज देशात सुरु आहे. अशी टिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे. गेले दोन महिने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, विद्यार्थी नेत्या साम्या कोरडे, पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर…

केंद्रीय सहकार खाते नव्याने निर्माण करण्याच्या निर्णयाचा शेतकरी कामगार पक्षातर्फे तिव्र निषेध

मोदी सरकारने राज्यांच्या अधिकारावर आणली गदा : ॲड राजेंद्र कोरडे मुंबई (८ जुलै) : केंद्राच्या मोदी सरकारने सहकार खाते निर्माण करण्याचा निर्णय घेऊन संविधानावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. राज्य सरकारांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणाऱ्या या निर्णयाचा भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड राजेंद्र कोरडे यांनी म्हटले आहे की, संविधानाच्या सातव्या परिशिष्टा नुसार सहकार हा राज्याचा विषय आहे. केंद्राची राज्याच्या अधिकार क्षेत्रातील ही घुसखोरी अत्यंत गंभीर असून शेतकरी कामगार पक्ष या संविधान विरोधी निर्णयाला प्रखर विरोध करीत आहे. मोदी सरकारच्या मित्रांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून…

आंबिल ओढ्याच्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय शेकाप स्वस्थ बसणार नाही

शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड.राजेंद्र कोरडे यांची ग्वाही पुणे (८ जुलै) : बिल्डर, राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी मिळून आंबिल ओढ्याच्या भुखंडाचे श्रीखंड खाण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा अन्यायकारक प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष हाणून पाडणार असून स्थानिक रहिवासी आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घडवून आणून चर्चा केली जावून आंबिल ओढ्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड.राजेंद्र कोरडे यांनी दिले. पुण्यातील आंबिल ओढा येथे झालेल्या चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने झालेल्या कारवाई संबंधाने शेतकरी कामगार पक्षातर्फे कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे यांनी अन्यायग्रस्त आंबिल ओढ्याच्या नागरिकांची भेट देऊन चर्चा केली. व…

शेतकरी कामगार पक्षातर्फे रामराज विभागाला रुग्णवाहिका भेट

आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण अलिबाग ( ७ जुलै ) : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे रामराज विभागातील नागरिकाच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली. सदर रुगणवाहिकेचे लोकार्पण चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर तेलगे, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सभापती प्रिया पेढवी, अरुण भगत, सुभाष वागळे, धर्मा लोभी, बाळू पाटील, हर्षदा मयेकर, विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होेते. यावेळी बोलताना महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील…

६६ व्या वाढदिवसानिमित्त भाईंना हार्दिक शुभेच्छा

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांना ६६ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील कार्यकर्ते, हितचिंतकांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. क्रांतिकारी लाल…!

माजी आमदार भाई धैर्यशील पाटील यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या उपस्थितीत, पीठासीन अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार सन्मान मुंबई ( ५ जुलै ): राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचा सन २०१७ – १८ सालाचा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाई धैर्यशील पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण याकरिता २०१५ – १६, २०१६ – १७, २०१७ – १८ सत्रातील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत व पीठासन अधिकाऱ्यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता विधान भवनातील राष्ट्रकुल संसदीय समिती कक्षात होणाऱ्या कार्यक्रमात हा  पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. भाई धैर्यशील पाटील यांनी आपल्या कार्यकाळात…

शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना वीस टक्के अनुदान अखेर मंजूर

  कोकण विभाग शिक्षक आमदार भाई बाळाराम पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी मुंबई ( ५ जुलै ) : कोकण आणि कोल्हापूर विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे यासाठीीशेतकरी कामगार पक्षाचे नेते,  कोकण विभाग शिक्षक आमदार भाई बाळाराम पाटील यांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन सदर मागणी लावून धरली होती. पुढील अधिवेशनात या विषया बाबत पुरवणी मागणी सादर करू, असे आश्वासन  अजितदादा पवार यांनी दिले होते. अखेर उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडलेली…

जनतेच्या हक्कांसाठी ‘भाई’ व्हीलचेअरवर पोहचले सभागृहात

  मुंबई ( ५ जुलै ) : पायाला गंभीर फ्रॅक्चर असल्याने पाच दिवसांपूर्वी ऑपरेशन झालेले असतांना आणि डाॅक्टरांनी दिर्घ विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला असतांनाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, विधान परिषदेचे आमदार भाई जयंत पाटील जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत त्यासाठी संविधानिकरित्या पाठपुरावा करता यावा या पोटतिडकीने व्हीलचेअरवर बसून विधानभवनात पोहोचल्याने ‘विधान भवन’ परिसर अचंबित झाले. आजपासून महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे जनतेच्या हिताचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्याची आयती संधीच! शेतकरी कामगार पक्षाला विधिमंडळ कामकाजात सहभागी होण्याचा ऐतिहासिक वारसा. विधिमंडळात पुर्णवेळ उपस्थित राहून कामकाजात सहभागी होण्याचा हा वारसा शेतकरी कामगार पक्षाच्या भाई उद्धवराव पाटील,…

सातही ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा फडकला

सांगोला ( ३ जुलै ) : तालुक्यातील उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज निवड प्रक्रीया पार पडली. या सर्वच्या सर्व सातही ठिकाणी भाई गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेच सरपंच म्हणुन विराजमान झाले. आजच्या सरपंच निवडीवरून अनेक प्रकारच्या अफवांना उत आला होता. व काहींना वेगळाच चमत्कार होईल अशी अपेक्षा होती. मात्र सातच्या सात ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखल्याने विरोधकांचा मोठा भ्रमनिरास झाला. निजामपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमल नानासो कोळेकर, खिलारवाडीच्या शांताबाई शरद हिप्परकर, हणमंतगावच्या दिपाली तात्यासाहेब खांडेकर, तरंगेवाडीच्या जयश्री शरद खताळ, आगलावेवाडीच्या शांता हरीचंद्र हाके, बुरंगेवाडीच्या राजाक्का आर्जुन बुरंगे…

‘कोरोना’ उपचारांसाठी कामगारांना आर्थिक लाभ द्या

शेतकरी कामगार पक्षाची मागणी मुंबई ( २४ मे ) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना असाध्य आजारकाळात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पंचेवीस हजार रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेत  ‘ कोरोना’ चा या दुर्धर आजारांमध्ये समावेश करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या योजनेच्या यादीत ‘कोरोना’ या…