भारतीय शेतकरी कामगार पक्ष
३ रे अधिवेशन
शेगाव – १९५६
राजकीय ठरावाचा मसुदा
प्रस्तावना
पक्षाच्या दाभाडी अधिवेशना पासून लातूर अधिवेशनापर्यंतच्या काळात पक्षाला अंतरंगत झगड्याच्या अत्यंत कठीण प्रसंगातून जावे लागले आहे. सतत पाच वर्षे आपल्याला वैचारिक, संघटनात्मक व जनता आघाडीवर हा झगडा द्यावा लागला होता. शेवटी सर्व पक्षविरोधी कारवायांवर आपण मात केली व नव्या जोमाने व खंबीरपणे पुढे पाऊल टाकण्याचा निर्णय पक्षाच्या लातूर अधिवेशनात घेतला. लातूर अधिवेशनानंतरच्या काळात पक्षाने केलेली प्रगती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमानास्पद वाटेल अशीच आहे. दाभाडी अधिवेशनात पक्षाने मार्क्सवाद, लेनिनवादास देशातील चळवळीचे तत्त्वज्ञान म्हणून स्पष्टपणे मान्यता दिली व साम्राज्यवादीविरोधी राष्ट्रीय लढ्याची परंपरा पुढे चालविण्याच्या मार्गावर खंबीर पाऊल टाकले. देशातील परिस्थितीचे मूल्यमापन करून जनतेची लोकशाही देशात स्थापन करणे हे देशातील वर्गीय चळवळीचे उद्दिष्ट म्हणून जाहीर केले. ही घोषणा भारतात पक्षाने प्रथम केली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळानंतर ती अचूक असल्याचे प्रत्ययास आले आहे. दाभाडी अधिवेशनानंतर सांगली व लातूर अधिवेशनांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीत झालेले फेरबदल लक्षात घेऊन पक्षाने आपले धोरण जाहीर केले आहे. पण गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे फेरबदल झालेले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साम्राज्यवाद्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. साम्राज्यवादी राष्ट्र, चलनवाढ, शेती धंद्यातील फाजील उत्पादन आदी आर्थिक पेचप्रसंगांच्या भोवऱ्यात सापडले आहेत व त्यातून बाहेर पडण्याचा ते जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. कोरिया, इंडोचायना वगैरे आशियाई देशांतून युद्ध पेटविण्याच्या त्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत. साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोरीला आळा घालण्याइतपत जगातील तितावादी शक्तींत वाढ झाली आहे. सोव्हिएट युनियन, नवचीन व पूर्व युरोपमधील लोकशाही राष्ट्रे यांच्या शांततावादी धोरणास भारत, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, इजिप्त, सिलोन आदी राष्ट्रांनी वाढत्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. मागासलेल्या राष्ट्रांच्या व तेथील जनतेच्या पिळवणुकीवर साम्राज्यवाद्यांना जगविणाऱ्या बाजारपेठेशी चढाओढ करू शकेल व देशोदेशांतील परस्पर सहकार्य व हित करू शकेल, परस्पर उत्कर्ष साधू शकेल अशी सोव्हिएट युनियनने पुढाकार घेतलेली नवी जागतिक बाजारपेठ अस्तित्वात आलेली आहे. मागासलेल्या देशांना मदतीसाठी अगर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी साम्राज्यवादी बाजारपेठांतून नाक मुठीत धरून गेलेच पाहिजे अशी परिस्थिती झपाट्याने कमी होत आहे. साम्राज्यवाद्यांनी पुरस्कारिलेल्या लष्करी करारांना जगातील सर्व जनतेचा निकराचा विरोध होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत भारत, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, इजिप्त, सिलोन व काही प्रमाणात अरब राष्ट्रे साम्राज्यवाद्यांच्या जोखडाखालून बाहेर पडून आपले राष्ट्रीय सर्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करीत आहेत. सोव्हिएट युनियन व युगोस्लाव्हिया या राष्ट्रातील विरोधाचे वातावरण कमी झाले आहे व समाजवादी शक्ती परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर खंबीर एकजुटीच्या पायावर उभ्या राहत आहेत. अशा रीतीने जगातील समाजवाद, स्वातंत्र्य, शांतता यांचा पुरस्कार करणारी जनतेची ताकद वाढत आहे. याउलट साम्रज्यवादी युद्धखोर व त्यांचे हस्तक आर्थिक पेचप्रसंगाच्या भोवऱ्यात अडकून आचके देत आहेत. ते या अगतिकपणातून युद्धाचा भडका उडविण्याचा प्रयत्न करणार नाहीत असे नाही. पण ते शांततावादी शक्तींच्या वाढत्या ताकदीमुळे अतिशय कठीण आहे. त्यातच त्यांच्या मरणाचा धोका आहे याची त्यांना जाणीव आहे. राष्ट्रीय परिस्थितीतही असेच महत्त्वाचे फेरबदल घडून आले आहेत. भारत सरकारने पंचशिलेचा पुरस्कार करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शांततेचा पुरस्कार केला आहे. राष्ट्राराष्ट्रातील परस्पर सहकार्य व वाटाघाटींच्या मार्गाने देशोदेशांतील मतभेद मिटावेत असे धोरण जाहीर केले आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणामुळे जगातील शांततावादी आणि युद्धखोर यांच्या शक्तीतीतल तोल बदलला आहे. काँग्रेसने आणि लोकसभेने समाजवादी पद्धतीची समाजव्यवस्था निर्माण करणे हे उद्दिष्ट म्हणून जाहीर केले आहे. इंपीरियल बँक व आयुर्विमा कंपन्या यांचे राष्ट्रीयीकरण केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीतील हे महत्त्वाचे बदल लक्षात घेऊन, देशातील परिस्थितीचे मूल्यमापन करणे व निष्कर्ष काढणे आणि त्या निष्कर्षांच्या आधारावर देशातील श्रमजीवी चळवळीची दिशा ठरविणे आज अगत्याचे झाले आहे.
भारत सरकारच्या कार्याचा आढावा
गेल्या पाच वर्षांतील राष्ट्रीय परिस्थितीचा आढावा घेताना भारत सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कारकिर्दीचा आढावा घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे भारत सरकारचे व ते सरकार चालविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे स्वरूप समजण्यास सोपे होईल.
भारत सरकारचे परराष्ट्रीय धोरण
भारत सरकारची परराष्ट्रीय आघाडीवरील कारकिर्द स्वागतार्ह आहे, हे प्रथम स्पष्ट केले पाहिजे. पाच वर्षांपूर्वी भारत सरकार हे साम्राज्यवाद्यांच्या दडपणाखाली असलेले सरकार होते. भारत सरकारचे परराष्ट्रीय धोरण साम्राज्यवाद्यांना अनुकूल होते, एवढेच नव्हे, तर भारत सरकार साम्राज्यवाद्यांचे हस्तक सरकार आहे, असे वाटण्याइतपत परिस्थिती होती. परंतु आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत झालेल्या बदलामुळे भारत सरकारला परराष्ट्रीय धोरणात बदल करणे भाग पडले आहे. साम्राज्यवाद्यांचे वसाहतवादी युद्धखोर धोरण गेल्या पाच वर्षांत इतके उघडे पडले, की कुठल्याही लोकशाहीवादी नि स्वातंत्र्यप्रिय माणसास किंवा सरकारला त्याचे समर्थन करणे किंवा स्वस्थ राहून त्यास मूक संमती देणे अशक्य होऊन गेले आहे. सोव्हिएट युनियन व इतर लोकशाही राष्ट्रे यांनी साम्राज्यवाद्यांचे सर्व लष्करी करार व इंडोचायना, आफ्रिका व इजिप्त येथील धोरण जगाच्या चव्हाट्यावर उघडेनागडे करून मांडले. जगातील शांततावादी जनतेने साम्राज्यावाद्यांच्या युद्धखोर धोरणाविरुद्ध प्रचंड आवाज काढला. भारतीय जनतेने साठ वर्षांच्या लांब साम्राज्यवाद्यांविरुद्ध सतत लढा दिला होता. ती साम्राज्यवाद्यांच्या धोरणास कसा पाठिंबा देणार ? भारत सरकारच्या साम्राज्यवादीधार्जिण्या धोरणास विरोध होऊ लागला. जागतिक बाजारपेठेत व देशातील औद्योगिक क्षेत्रांत देशातील बड्या भांडवलदारांना परदेशी मक्तेदार व भांडवलदारांचे वर्चस्व असह्य होऊ लागले आहे. आशियातील सर्व जनतेने साम्राज्यवाद्यांविरुद्ध जोराची मोहीम उघडली. या सर्वाचा परिणाम म्हणून भारत सरकारला परराष्ट्रीय धोरणात बदल करणे भाग पडत गेले. याच वेळी सोव्हिएट युनियन, नवचीन व पूर्व युरोपमधील लोकशाही राष्ट्रे यांनी मागासलेल्या आशियायी देशांना परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर राष्ट्रीय विकासासाठी मदतीचा हात पुढे केला. आशियायी जनतेने या मदतीचे स्वागत केले. चीन - भारत सरकारच्या संयुक्त जाहीरनाम्यातून पंचशिलेचा जन्म झाला. लेनिनने सोव्हिएट युनियनच्या स्थापनेच्या वेळी पुरस्कार केलेल्या शांततामय सहजीवनाच्या तत्त्वाला कम्युनिस्ट राजवट नसलेल्या पहिल्या सरकारने ( भारत सरकारने ) जाहीरपणे मान्यता दिली. आशियातील व मागासलेल्या राष्ट्रातील भारत हे एक कम्युनिस्ट राजवट नसलेले मोठे राष्ट्र आहे. भारत सरकारच्या या धोरणाचा इतर आशियायी राष्ट्रांवर परिणाम होणे अटळ होते. भारत सरकारच्या या धोरणाचे आशियायी राष्ट्रांनी स्वागत केले. भारत सरकारला या धोरणात ब्रह्मदेश , इंडोनेशिया , सिलोन , इजिप्त या राष्ट्रांचा वाढता पाठिंबा मिळाला. बाडुंग परिषदेने हा पाठिंबा जास्त संघटित झाला आहे . आशिया व आफ्रिका खंडातील जनतेने पंचशिलेच्या तत्त्वावर शिक्कामोर्तब केले व साम्राज्यवाद्यांच्या वसाहतवादी धोरणास जबरदस्त धक्का दिला आहे . आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत भारत , इंडोनेशिया , इजिप्त , सिलोन या देशांतील सरकारांनी साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोर व वसाहतवादी धोरणास जो संघटित विरोध केला आहे , त्याला फार महत्त्व आहे . आतापर्यंत फक्त समाजवादी राष्ट्रातील सरकारे साम्राज्यवाद्यांना कडाडून विरोध करीत होती व त्यामुळे कम्युनिस्ट व बिगर कम्युनिस्ट सरकारांतील संघर्ष असे स्वरूप आले होते . ही परिस्थिती आता बदलली आहे . जगातील सर्व वसाहतवादीविरोधी स्वातंत्र्यप्रिय व लोकशाहीवादी जनता आणि त्यांची सरकारे एकीकडे व साम्राज्यवादी आणि फक्त त्यांचे हस्तक दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण होत आहे . साम्राज्यवादी आता अधिकाधिक एकाकी पडत आहे . युद्धखोर धोरण उघडपणे पुरस्कारण्याची साम्राज्यवाद्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे . ही गोष्ट इजिप्तने सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत स्पष्ट झाली आहे . इजिप्तला जगातील सर्व स्वातंत्र्यप्रिय जनतेने व सरकारांनी पाठिंबा दिला आहे . याविरुद्ध फक्त इंग्लंड , फ्रान्स , अमेरिका , स्पेन , पोर्तुगीज आदी देशांतील साम्राज्यवाद्यांचा व त्यांच्या हस्तकांचाच पाठिंबा राहिला आहे . भारत सरकारने सोव्हिएट युनियन व पूर्व युरोपमधील लोकशाही राष्ट्रे यांच्याशी व्यापारी व आर्थिक करार केले आहेत . त्याचप्रमाणे व्यापारी , सांस्कृतिक शिष्टमंडळांची अदलाबदल यामुळे जगातील समाजवादी देशांतील व भारतातील जनता अधिक जवळ येण्यास , या देशांतील जनतेत मित्रत्वाचे संबंध निर्माण होण्यास मदत झाली आहे . भारत सरकारच्या या धोरणास सर्व साम्राज्यवादी राष्ट्र विरोध करीत आहेत . अमेरिकेचे उपाध्यक्ष निक्सन व परराष्ट्र सेक्रेटरी डल्लेस यांनी भारत सरकारच्या तटस्थतेच्या धोरणावर अनैतिक ' असा शिक्का मारला आहे . गेल्या पाच वर्षांत अमेरिकेने भारताला ज्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याचे धोरण ठेवले होते त्यात बदल झाला आहे व या मदतीत यावर्षी कपात करण्यात आली आहे . मागासलेल्या देशांतील आर्थिक विकासासाठी अमेरिकेची मदत मिळत नाही तर युद्धखोरीसाठी , - गुलामगिरीसाठी अमेरिकन मदत मिळते हे जास्त स्पष्ट झाले. भारत सरकारचे हे धोरण स्वागतार्ह आहे ; पण त्याबरोबर या परराष्ट्रीय धोरणात दोषही आहेत . भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणात बराच डळमळीतपणा आहे . साम्राज्यवादी राष्ट्रांच्या वसाहतवादी व युद्धखोरीच्या धोरणास खणखणीत विरोध करण्याऐवजी राष्ट्राराष्ट्रांतील मतभेद शांततेने मिटावेत याकरिता या झगड्यांत स्वातंत्र्यप्रिय व शांततावादी राष्ट्रांची उघड बाजू घेण्याऐवजी त्रयस्थाची लवादाची भूमिका स्वीकारण्यावरच भारत सरकार समाधान मानीत आहे व तीच भूमिका टिकविण्याचा अट्टहास भारत सरकारने चालविला आहे . सरकारच्या याच डळमळीतपणातून कॉमनवेल्थचे सभासदत्व सांभाळणे , मलाया , सायप्रस , आल्जेरिया , गियाना वगैरे ठिकाणच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यांना स्पष्ट पाठिंबा न देता ' शांततेने प्रश्न मिटावेत ' एवढीच घोषणा करून स्वस्थ बसण्याचे धोरण पुढे येत आहे . भारत कॉमनवेल्थचा सभासद राहणे हा भारतीय स्वातंत्र्याचा अपमान आहे . भारतीय जनता कॉमनवेल्थचे सदस्यत्व मान्य करूच शकत नाही .याच संदर्भात गोवा प्रश्नाची भारत सरकारने परवड केली आहे , ती अक्षम्य आहे . भारत सरकारने गोमंतक स्वातंत्र्य चळवळीचा विश्वासघात केला आहे . गोमंतकातील स्वातंत्र्यप्रिय जनतेने जो स्वातंत्र्यसंग्राम चालविला आहे त्यास भारत सरकारने सक्रिय पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे .
पहिली पंचवार्षिक योजना व अर्थव्यवस्था
पहिली पंचवार्षिक योजना प्रामुख्याने लोककल्याणकारी राज्याचा पाया घालणारी योजना असा पुकारा करण्यात आला होता . वैधानिक लोकशाही शासनसंस्था हे साधन मानण्यात आले होते. शेती उत्पादनात वाढ , कालवे , वीजपुरवठा यांत वाढ व औद्योगिक विकासासाठी स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट म्हणून जाहीर करण्यात आले होते . अर्थव्यवस्थेतील विषमता वाढू नये , बेकारीला आळा घालावा अशा सूचना नियोजन समितीला देण्यात आल्या होत्या . शेती उत्पादनाची जी उद्दिष्टे म्हणून जाहीर करण्यात आली होती त्यापैकी १ ९५४-५५ साली अन्नधान्ये , गळीताची धान्ये यांची उद्दिष्टे गाठण्यांत यश आले आहे . १९५५-५६च्या अंदाजाप्रमाणे अन्नधान्याच्या उत्पादनात गेल्या वर्षापेक्षा थोडी घट होईल . कापसाचे १ ९५४-५५ सालचे उत्पादन उद्दिष्टापेक्षा जास्त होते . पण १ ९५५-५६चा अंदाज ४१.४ दशलक्ष गासड्या धरण्यात आला आहे . ५४-५५ पेक्षा कापसाचे उत्पादन ५-४ टक्क्याने घटणार आहे व उद्दिष्टापेक्षा साधारणपणे दहा गासड्यांनी कमी होणार आहे .
विशेषत : १९५३-५४ या वर्षी , अन्नधान्याच्या उत्पादनात १९४९ -५० च्या मानाने २१ % वाढ झाली होती . विशेषत : राजस्थान , हैद्राबाद , मध्य प्रदेश , प. बंगाल या राज्यांतून ही वाढ झाली होती . त्यापैकी ७५ % वाढ ही चांगल्या हवामानामुळे व हंगामामुळे झाली होती . शेती सुधारणेमुळे ही वाढ झालेली नाही त्यामुळे ही सगळी वाढ टिकाऊ स्वरूपाची आहे असे मानता येणार नाही , असा इशारा १९५३-५४ च्या नियोजन मंडळाच्या अहवालात देण्यात आला आहे . त्याचे प्रत्यंतर १९५४-५५ साली आले . १९५३-५४ पेक्षा १९५४-५५ साली अन्नधान्याच्या उत्पादनात ३० लक्ष टनाची घट दिसून आली .
औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत , बऱ्याच उद्योगधंद्यांच्या बाबतीत प्रगती झाली आहे . पण कापड व सूत याखेरीज इतर धंद्यांत योजनेचे उद्दिष्ट गाठण्यात येऊ शकले नाही . या योजनेच्या अवधीत १९७००००० एकर जादा जमिनीस पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात १९५४-५५ अखेर फक्त १०३००००० एकर जमिनीस पाणीपुरवठा करण्याचे काम झाले . उद्दिष्टापैकी चार वर्षांत ५२ टक्केच काम पूर्ण झाले आहे . ( Progress Report 54-55 Page 2 ) वीजपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी त्यात बरीच प्रगती झाली आहे . पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टाप्रमाणे शेतीसुधारणेच्या कामात प्रगती झाली नाही म्हणून नियोजन मंडळाच्या शेती सुधारणा मध्यवर्ती समितीने बिहार , पू . पंजाब , प . बंगाल , म्हैसूर , पेपसू , अजमीर , हिमाचल प्रदेश , विंध्य प्रदेश या राज्य सरकारना खास सूचना दिल्या आहेत.
एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या चालू रजिस्टरवर १९५६ जुलै महिन्याच्या अखेरीस ७९२००० बेकारांची नोंद झालेली होती . एक वर्षापूर्वी हा आकडा ६६०००० होता . १९५४ जुलैअखेर हा आकडा ५९०००० होता . नॅशन सँपल सर्वे १९५४ साली जी प्राथमिक पाहणी करण्यात आली त्यावरून प्रदेशातील शहरी बेकारांचा आकडा २,२४०,००० धरण्यात आला होता . सर्वसाधारणपणे देशातील शहरी बेकारांपैकी २५ टक्केच लोक एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजकडे नावें नोंदवितात . त्याआधारे १ ९ ५६ जुलैअखेर शहरी बेकारांचा आकडा ३१७०००० हा धरण्यात आला आहे . ( Times of India , 5th Sept. 1956 ) पंचवार्षिक योजनेचे सरकारी अर्थतज्ज्ञ श्री . महलनोबीस यांनी शहरी बेकार व अर्धबेकार यांचा अंदाज ५० लक्षाचा केला आहे . ( Free Press , 28 6-1956 ) शेतमजूर व त्याचबरोबर अवलंबून असलेल्यांची संख्या १० कोटींवर गेली आहे . देशातील कामगार व मालक यांच्यामधील झगड्यांची संख्या १९५५ अखेर १६३३ होती . यात ७२४००० कामगार गुंतले होते व संपामुळे ५३८५००० दिवस वाया गेले . १९५१ पासून हे प्रमाण सारखे वाढत आहे ( Report on currency and fi nance 1956 , P. 123 ) गेल्या पाच वर्षांत वस्तूंच्या किमतीत जे चढउतार झाले आहेत ते उल्लेखनीय आहेत . शेतीमालाच्या किमतीत सारखी चढउतार आहे , तर औद्योगिक मालाच्या किमती त्यामानाने स्थिर आहेत . The Downward trend in wholesale prices noticed since mid - April 1954 , contin ued till early June 1952. The general index recorded a fall of about 3 percent to 340 4 between March end and June 4 , 1955. This being the lowest since March 1948. ' Food Articles ' and Industrial raw material de clined by 6 percent and 3 percnet respec tively . Of the former wheat and gram re corded sharp fall of 20 and 11 percent re spectively under the pressure of new rubbi crop arrivals . In contrast to the decline in primary commodities indicates of ' Semi manufacture and Manufacture remained relatively ready during this period . The general downtrend , however , was reversed at the begining of June and uptrend which set in then continued through out the year . During the rising phase of prices from early June 53 to end of March 1956 the ' Food Articles ' group showed the sharpest rise of 30 percent with increase in prices of all commodities included in that group , ex cepting tea . Price of Jawar in particular re corded a very steep rise of 142 percent . Rise in Rice , wheat , Gram and Tur , prices were also large , being 28 , 53 , 67 and 41 percent respectively . ( Report on currency & Finance 1-9-56 , Page 20-21 ) याउलट क्षेत्रांतील भांडवलदारांच्या सरकारी नफ्याचे प्रमाण सारखे वाढते आहे . टॅक्सेशन , इन्क्वायरी कमिशनच्या अंदाजाप्रमाणे हे प्रमाण १ ९ ५१ साली शेकडा ८.७ होते . त्यापैकी कापड १०६ टक्के , चहामळे १४.५ टक्के , लोखंड पोलाद ११.९ टक्के होते . हे नफ्याचे प्रमाण या पाच वर्षांत कमी झाले नाही तर सारखे वाढत असल्याची कबुली सरकारीरीत्या अनेक वेळा देण्यात आली आहे . Encouraging trends in company profits and dividends ' the expectation of large scale deficit financing in the closing year of the First Plan as well as in the Second Plan Period , appear to have provided are main stimulas to the market ( Capital ) , the Inves tors seemed to be satisfied that even in the content of Government's decision to estab lish a socialist pattern of Society , there was considerable scope for private enterprise . Several forms of Government assistance to private enterprise including the provision of finance directly and through special insti tutions such as the Finance Corporations provided further evidence in this behalf ... Further it would appear that in view of the far reaching character of the New Com panies Act , especially in regard to the Man aging Agency system , there was ... a ten dency for buying of shares in order to retain control over management of companies . ( Report on Currency and Finance 56 ) ३१ डिसेंबर १९५३ रोजी सरकारी परराष्ट्रांकडून घेतलेली कर्जे व परराष्ट्रीय भांडवलदारांनी भारतात गुंतविलेले भांडवल मिळून ११३५.५७ कोटी रुपयांचे आहे . गेल्या दोन वर्षांत अंदाजे २५० कोटींनी ही रक्कम निमसरकारीरीत्या देशातील वाढली आहे . निमसरकारी रित्या देशातील उद्योगधंद्यात परकीय भांडवलदार कंपन्यांनी भारतात गुंतविलेल्या भांडवलाचे स्वरूप असे आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुधारलेल्या अंदाजाप्रमाणे २३६३.४ कोटी रुपयांचा खर्च धरण्यात आला होता . गेल्या पाच वर्षांत ( १ ९५५-५६ चे बजेट धरून ) २१२० कोटी रुपये खर्च झाले . यापैकी १११२.९ कोटी रुपये कराचे उत्पन्न आहे . २२ ९.९ कोटी रुपये परकीय मदत आहे . ७७७.५ कोटी रुपये तुटीच्या अंदाजपत्रकी पद्धतीने ( कर्ज उभारणे गंगाजळीतून रक्कम उचलणे , सरकारी कर्जरोखे विकणे ) उभारण्यात आले आहेत . योजनेत गुंतविल्या जाणाऱ्या भांडवलात राज्य सरकारकडून जादा करापासून २३०.३ कोटी रुपये गृहीत धरण्यात आले होते . १ ९ ५१ ते ५५ च्या काळात यापैकी फक्त ५३ कोटी रुपये उभारण्यात आले . ( Progress Report 1954-55 , Page 15 ) पंचवार्षिक योजनेच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नात १८ % वाढ झाली आहे व दरडोई उत्पन्न २५४ रुपयांवरून २८१ रुपयांवर गेले आहे , असा अंदाज धरला आहे . राष्ट्रीय उत्पन्न १०८०० कोटी रुपयांचे गृहीत धरले आहे . राष्ट्रीय उत्पन्नापैकी किती हिस्सा राष्ट्रीय विकासासाठी गुंतविण्यात आला हे पाहणे आवश्यक आहे. On a rough basis it appears that the rate of investment as percentage of na tional income increased from about five percent to..in 1950-51 to more than six half percent in the fourth year . It is expected that by the plan period this would have increased a little over seven percent . The total investment , in the economy on this basis over the five year period , would probably fall below the plan target of Rs . 3500-3600 / - crores , by Rs . 300-400 crores . ( Progress Report 1954-55 , Page 8 ) देशातील बड्या भांडवलदारांना पहिल्या पंचवार्षिक योजनेखाली भरपूर स्वातंत्र्य देण्यात आले होते . या बदल्यांत त्यांनी उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणात भांडवल ( २३०.३० कोटी रुपये ) गुंतवावे अशी अपेक्षा करण्यात आली होती ; पण ती अपेक्षा फोल ठरली आहे . १ ९५३-५४ वर्षाअखेरीस ९६ कोटी रुपयांचे भांडवल गुंतविण्यात आले होते . ( रिपोर्ट १९५३-५४ ) १९५४-५५ साली आणखी ५०-५५ कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत . यापैकी ९ कोटी रुपये सरकारी मदत व कर्जस्वरूपात देण्यात आले आहेत . ( रिपोर्ट ५४-५५ ) देशातील अर्थव्यवस्थेची पहिली पंचवार्षिक योजना संपल्यानंतरचे हे सर्वसाधारण चित्र आहे . वरील माहितीच्या आधारे देशातील आर्थिक परिस्थितीबाबतचे पंचवार्षिक योजनेच्या यशापयशाबाबतचे निष्कर्ष काढणे आवश्यक आहे . शेती व औद्योगिक उत्पादनात थोडीफार वाढ व झालेली गृहीत धरली , तरी ही वाढ टिकाऊ स्वरूपाची नाही . कारण ती कोणत्याही शेतीविषयक अगर औद्योगिक सुधारणांच्या धोरणाचा परिणाम म्हणून झाली नाही . शेती उत्पादनातील वाढ ही प्रामुख्याने नैसर्गिक कारणामुळे झाली आहे . तर औद्योगिक उत्पादनातील वाढ ही जुनी यंत्रसामुग्री कुवतीपेक्षा जास्त वापरून व कामगारांवर कामवाढ लादून साधण्यात आली आहे . शेतीमालाच्या किमतीतील चढउतार भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किती धोक्याचे आहेत हे सांगण्याची गरज नाही . निर्नियंत्रणानंतरच्या ताबडतोबीच्या काळात शेती उत्पादनाचे दर घसरले , त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च तर भरून निघाला नाहीच ; पण पुढच्या पिकाच्या लागवडीचा बोजा सोसण्याची कुवतही शेतकऱ्यांत राहिली नाही . त्यामुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा अधिक वाढला . याउलट हंगाम पालटून गेल्यानंतर या वर्षी शेतीमालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही . मात्र अन्नधान्याच्या दरवाढीमुळे कामगार , मध्यमवर्ग यांच्या राहणीचा खर्च वाढला आहे . या दरवाढीमुळे व्यापाऱ्यांना मात्र फायदा झाला . शेतकऱ्यांच्या कर्जाचे प्रमाण वाढले आहे . सरकारने गेल्या वर्षांत शेतकऱ्यांना उत्पादनखर्चासाठी लागणाऱ्या भांडवलाचा पुरवठा केला नाही हे रुरल क्रेडिट सर्वे कमिटीच्या पाच अहवालावरून स्पष्ट होते . शेतकऱ्यांच्या एकूण कर्जापैकी फक्त सहा टक्के सरकार व सहकारी सोसायटी यांच्याकडून मिळाले आहे . याउलट ९ ३ टक्के कर्ज दलाल , आडते व सावकार यांच्याकडून घेण्यात आले आहे . या कर्जाचा फार मोठा भाग तारणविरहित असिक्युअर्ड असल्यामुळे व्याजाच्या रूपात शेतकरी समाजाची फार मोठ्या प्रमाणात लूट झाली आहे . याचबरोबर शेतकऱ्यांची जमिनीवरून हकालपट्टी , कोर्टकचेऱ्या वगैरे संकटे त्यांच्यापुढे आहेतच . पंचवार्षिक योजनेखालील शेती सुधारणा धोरण हे प्रामुख्याने अनिश्चित होते . राज्य सरकारांना या बाबतीत मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले होते . पण सर्वसाधारणपणे श्रीमंत शेतकरी अर्थव्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी या धोरणाची दिशा होती . हे काँग्रेस शेतीसुधारणा कमिटीच्या अहवालावरून स्पष्ट होते . राज्य सरकारांनी शेतीसुधारणाबाबत निश्चित प्रयत्न केले नाहीत व जे केले तेथे गरीब व मध्यम शेतकऱ्यांचे जीवन अस्थिर केले आहे . या सर्व कायद्यांचा श्रीमंत शेतकरी थराने फायदा घेतला . नवीन शेतीसुधारणा कायद्याचा वापर करून कुळाची जमिनीवरून मोठ्या प्रमाणात हकालपट्टी करण्यात आली . त्यास आळा घालण्यास सरकारे व सरकारी कायदे असमर्थ ठरले आहेत . पंचवार्षिक योजनेतील औद्योगिक धोरण ( १९४८ चा औद्योगिक धोरणविषयक ठराव ) हे देशातील बड्या भांडवलदारांना व परदेशी भांडवलदारांना रान मोकळे करून सोडणारा जाहीरनामा होता . या धोरणात भांडवलदारांवर नियंत्रण येईल असा बदल करण्याचे आश्वासन दिले होते ; पण १ ९ ५६ पर्यंत त्यात काहीच बदल झाला नाही . यासाठी जो बदल करण्यात आला आहे , त्यामुळे भांडवलदारांना जास्त सवलती देण्यात आल्या आहेत . गेल्या पाच वर्षातील औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणजे देशी व परदेशी बड्या भांडवलदारांच्या नफ्यात बेसुमार वाढ , मक्तेदारीच्या वेगवेगळ्या धंद्यात प्रादुर्भाव , कामगारांच्या दैन्यावस्थेत वाढ व राष्ट्रीय औद्योगिकीकरणाला व राष्ट्रविकासाला अडथळा निर्माण होण्यात झाला आहे . या पाच वर्षांत देशातील परकीय भांडवलात झालेली वाढ राष्ट्रीय अर्थव्यवस्थेस धोक्याची आहे . ब्रिटिशांच्या राजवटीतही परकीय भांडवलाचा देशाच्या अर्थव्यवस्थेत जेवढा प्रवेश होऊ शकला नाही , त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात काँग्रेस राजवटीत परकीय भांडवलाने भारतात प्रवेश केला आहे . १ ९ ४८ साली ब्रिटिश व अमेरिकन भांडवल अनुक्रमे २०९.९ ५ कोटी व १७.९६ कोटी रुपये होते . ते १९५३ साली ३४७.०६ व ३०.९१ कोटी झाले . म्हणजे ब्रिटिश व अमेरिकन भांडवलात अनुक्रमे १३७.११ व १२.९ ५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे . गेल्या दोन वर्षांत ९ १ कोटी रुपये परकीय भांडवलाच्या आयातीस भारत सरकारने परवानगी दिली आहे . त्यात ब्रिटिश व अमेरिकन भांडवलच प्रामुख्याने आहे . रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे प्रसिद्ध झालेल्या India's & Foreign Liabilities Assets या पुस्तकात परकीय भांडवलाचे स्वरूप स्पष्ट केले आहे . Out of the total foreign controlled com panies numbering 565 with foreign con trolled capital of Rs . 129-30 crores , there were 313 in which non residents held 40 or more of the total ordinary share capital . In 123 companies , the entire lot of ordinary Shares was owned abroad while in other 107 companies , the foreigners exceeded 60 percnet . On the other hand 91 compa nies were controlled from abroad without any ownership of capital whatsoever . While in respect of other 110 companies the for eign ownership was less than 20 percent . These 201 companies in which the foreign ers held no share or held an insignificant amount for the most part had foreign con trolled managing Agents largly from United Kingdom . It appeared that in the case of nearly 50 percent of the companies con trolled from United Kingdom less than 40 percent of shares was owned by in that country . So that control was not exercised through the ownership of the shares . On the other hand in the case of other coun tries control was accompanied by concen tration of the ownership of shares in the relative countries ... ( Survey ... page 20-31 ) याचा अर्थ देशातील ५६५ कंपन्यांच्या एकंदर भांडवलावर परकीय भांडवलाचे नियंत्रण आहे . यापैकी ४७७ कंपन्यांवर ब्रिटिश वर्चस्व या कंपन्यांचे भांडवल २१३.७२ कोटी रुपयांचे आहे . देशी पब्लिक व प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचे भांडवल १ ९५१-५२ साली ६१८.७८ कोटि रुपयाचे होते . म्हणजे देशातील उद्योगधंद्यांत गुंतविलेल्या भांडवलापैकी २५ % भांडवलावर परकीयांचे वर्चस्व होते . त्याचबरोबर परकीय भांडवल तेल कारखाने , बँका , चहामळे , ज्यूट व खाणी वगैरे धंद्यांत गुंतविले आहे . यावरून परकीय भांडवलाचे वर्चस्व भारतीय अर्थव्यवस्थेवर किती आहे हे दिसून येते . हिंदुस्थान सरकार अजूनही परकीय भांडवलदारांची भारतात भांडवल गुंतविण्यासाठी मनधरणी करीत आहे . त्यासाठी खास सवलती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे . वरील भांडवलाचे वर्चस्व एकीकडे वाढत असता देशातील बड्या भांडवलदारांच्या नफ्यात बेसुमार वाढ झाली आहे , ही परिस्थिती लक्षात घेतल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचा किती मोठा भाग परकीय व देशी बड्या भांडवलदारांच्या घशात गेला व प्रत्यक्ष जनतेच्या पदरात किती पडला हे अजमावण्यास हरकत नाही . राष्ट्रीय उत्पन्नाची ही अधिकृत लूट एकीकडे चालली असता योजनेच्या नावाखाली खर्च होत असलेल्या रकमेचा कसा विनियोग चालला आहे हे लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभा यानी नेमलेल्या व पब्लिक अकौंटस कमिटीच्या अहवालावरून व ऑडिट रिपोर्टवरून स्पष्ट होते . प्रत्येक मोठ्या योजनेत वशिलेबाजी , लाचलुचपत व उधळपट्टी मोठ्या प्रमाणावर चालू आहे . दामोदर , हिराकुड , भाकरानानगल , ही तर डोळ्यांत तेल घालणारी उदाहरणे आहेत . राष्ट्रीय उत्पन्नात १८ टक्के वाढ झाली आहे व दरडोई उत्पन्न २५४ रुपयांवरून २८१ रुपयांवर गेले आहे असा जो सरकारचा दावा आहे तो किती स्वप्नाळू आहे हे समजण्यास हरकत नाही . राष्ट्रीय उत्पन्न वाढले तरी बेकारी वाढली , महागाई वाढली , शेतकऱ्यांची जमिनीवरून हकालपट्टी होण्याचा वेग वाढला , दरवर्षी दुष्काळाला तोंड देता येत नाही म्हणून लक्षावधी लोक देशोधडीला लागतात , कामगारांचे राहणीमान महाग झाले त्या प्रमाणात त्यांच्या वेतनात किंवा सुखसोयींत वाढ झाली नाही , सर्वसामान्य जनता दरिद्री झाली , या परस्परविरोधी परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा ? राष्ट्रीय उत्पन्न वाढणे म्हणजे भांडवलदारांचे नफे वाढणे हा एकच अर्थ निघू शकतो . पहिल्या पंचवार्षिक योजनेचा एकूण अर्थ म्हणजे धनिक अधिक धनवान झाले व गरीब दारिद्र्याच्या खाईत अधिक वेगाने लोटले गेले आहेत . देशातील अर्थव्यवस्थेचे पंचवार्षिक योजनेच्या समाप्तीनंतरचे स्वरूप वर सांगितल्याप्रमाणे आहे . पण पंचवार्षिक योजनेची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे . या पंचवार्षिक योजनेच्या कम्युनिटी प्रोजेक्टस् , नॅशनल डेव्हलपमेंट ब्लॉक्स , स्थानिक विकास योजना आखण्यात आल्या होत्या . या योजनांवर सरकारने साधारणपणे १०० कोटी रुपये गुंतविले आहेत . या योजनांखाली ग्रामीण आरोग्य , प्रौढ शिक्षण , ग्रामीण वाहतूक ( ॲप्रोच रोड ) , शालागृहे , सार्वजनिक करमणूकस्थाने वगैरेंचा समावेश करण्यात आला होता . ही कामे हाती घेण्यापूर्वीच स्थानिक श्रम सहकार्य व रोख रक्कम यांचा हिस्सा ठरविण्यात आला होता . या योजनेखाली जो खर्च झालेला आहे तो प्रामुख्याने कारभारविषयक खर्च आहे . या रकमेपैकी साधारणपणे २५ % रक्कम प्रत्यक्ष सार्वजनिक कामासाठी खर्च झालेली आहे असे कम्युनिटी प्रोजेक्टस्च्या हिशेबावरून दिसून येते . या योजनेखाली स्थानिक सहकार्य मिळविले जाते . ते दडपणाखाली मिळविले जाते , असा बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहे . असे असले तरी या योजनांचा स्थानिक स्वरूपात फायदा दिसून येतो . स्थानिक स्वरूपाच्या सामुदायिक अडचणींचे निवारण करणे काही प्रमाणात शक्य होते , असा अनुभव आहे . या योजनेखालचे व होणारे काम टिकाऊ स्वरूपाचे नसते . तसे करण्याचा प्रयत्नही झालेला नाही . त्याचबरोबर इंपीरियल बँक व कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण , कामगार विमा योजना ही सरकारची कामे स्वागतार्ह आहेत . कामगार विमा योजना अतिशय सदोष असली तरी त्याचा कामगारांना काही प्रमाणात फायदा मिळणे शक्य आहे . या एवढ्याच भांडवलावर पंचवार्षिक योजना संपूर्ण यशस्वी झाली असा सरकारतर्फे डांगोरा पिटण्यात येत आहे . कम्युनिटी प्रोजेक्ट व नॅशनल डेव्हलपमेंट ब्लॉक्स , स्थानिक विकास योजना , भारत सेवक समाज या योजना स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचे मोठे कुरण ठरले आहे . पण त्याच आधारावर या कार्यकर्त्यांना ग्रामीण विभागातील श्रीमंत शेतकरी थराला हाताशी धरणे शक्य झाले आहे . कारण या योजनेखाली ग्रामीण विभागापैकी मुख्यत : या थराला तगाई कर्जे , नियंत्रणाच्या काळात पत्रे , सिमेंट , लोखंड आदी उपयुक्त वस्तू प्रामुख्याने मिळाल्या आहेत . पंचवार्षिक योजनेचे खरे स्वरूप अजूनही जनतेच्या समोर आले नाही . ते मांडण्याची जबाबदारी विरोधी पक्षांनी मुख्यता टाळली आहे . आणि त्यामुळे समाजात नवे नवे भ्रम निर्माण करून काँग्रेसला आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय हित साधले असा काल्पनिक डांगोरा पिटणे शक्य झाले आहे .
दुसरी पंचवार्षिक योजना व औद्योगिक धोरण
गेल्या पाच वर्षांतील काँग्रेस सरकारच्या कारभाराचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस सरकारचे पुढील धोरण तपासणे आवश्यक आहे . त्या दृष्टीने दुसरी पंचवार्षिक योजना व त्यांत अनुसरलेले औद्योगिक धोरण तपासणे महत्त्वाचे आहे .
पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी झाली व त्याच पावलावर पाऊल टाकून दुसरी पंचवार्षिक योजना भव्य प्रमाणात आखली असल्याचा डांगोरा पिटण्यात आला आहे . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आकार भव्य आहे यात वादच नाही . कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेखाली ६२०० कोटी रुपये गुंतविण्याची योजना आहे . पहिल्या योजनेपेक्षा हा आकडा दुप्पट आहे .
राष्ट्रीय उत्पन्न २५ टक्क्यांनी वाढविणे , मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन जलद औद्योगिकीकरण करणे , काम मिळविण्याची संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे , संपत्तीच्या वाटणीतील विषमता कमी करणे व संपत्तीचे समान वाटप करणे , ही उद्दिष्टे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत गृहीत धरली आहेत . या उद्दिष्टांपैकी जलद औद्योगिकीकरण व शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या मार्गावर नेणे , हे मुख्य उद्दिष्ट मानले आहे . या योजनेप्रमाणे सरकारीरीत्या ४८०० कोटी रुपये ( मध्यवर्ती सरकार २५५ ९ कोटी व राज्य सरकार २२४१ कोटी ) गुंतविण्यास येणार आहेत . उद्योगपती २४०० कोटी रुपये गुंतवतील अशी अपेक्षा आहे . सरकारी भांडवल खालीलप्रमाणे गुंतविण्यात येणार आहे . १. शेती व कम्युनिटी डेव्हलपमेंट ५६८ कोटी रुपये २. कालवे व वीजपुरवठा ९१३ कोटी रुपये ३. उद्योगधंदे व खाणी ८ ९ ० कोटी रुपये ४. वाहतूक १३८५ कोटी रुपये ५. सार्वजनिक हित ९ ४५ कोटी रुपये ६. इतर ९९ कोटी रुपये एकूण ४८०० कोटी रुपये वरील रकमेपैकी ३८०० कोटी रुपये भांडवल नवीन योजनांत गुंतविण्यात येणार आहे व १००० कोटी रुपये भांडवल विकास योजनांचा चालू कारभारविषयक खर्च म्हणून खर्च होईल असा अंदाज आहे . उद्योगधंदे व वाहतूक यावर पहिल्या योजनेतील खर्चापेक्षा अनुक्रमे ३ ९ ७.२ व १४.८७ टक्के जादा खर्च धरण्यात आला आहे . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी लागणारे ४८०० कोटी रुपये भांडवल खालीलप्रमाणे उभारण्यात येईल . १. कराचे उत्पन्न ८०० कोटी रुपये २ . कर्ज योजना १२०० कोटी रुपये ३. रेल्वे व विकास योजना विषयक शिल्लक - ३०० कोटी रुपये ४. परकीय मदत कर्ज ८०० कोटी रुपये ५. तुटीची अंदाजपत्रक १३०० कोटी रुपये पद्धती ६. तरतूद नसलेली ४०० कोटी रुपये एकूण ४८०० कोटी रुपये दुसऱ्या योजनेचा हा ढोबळ आराखडा आहे . वरील आराखड्याचे विवेचन करण्यापूर्वी या योजनेत औद्योगिकीकरणावर विशेष भर दिला असल्याने ते औद्योगिक धोरण काय आहे हे समजावून घेतले पाहिजे . भारत सरकारने १ ९ ४८ च्या एप्रिलमध्ये आपले औद्योगिक धोरण जाहीर केले होते . शस्त्रास्त्रे व शस्त्रसाहित्य , रेल्वे , अटॉमिक एनर्जी यावर सरकारची मक्तेदारी राहील व लोखंड , पोलाद , कोळसा , विमान निर्मिती , बोट बांधणी , टेलिफोन , वायरलेस व खनीज तेल या धंद्यांच्या विकासाची जबाबदारी सरकारची राहील . पण या धंद्यांत खाजगी कारखान्यांनाही वाव असेल हे धोरण होते . याशिवाय सर्व औद्योगिक क्षेत्र खाजगी भांडवलाला मोकळे ठेवण्यात आले होते . ३० एप्रिल १ ९ ५६ रोजी भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरणविषयक ठराव केला आहे व दुसऱ्या योजनेच्या काळातील आपले धोरण जाहीर केले आहे . या धोरणाप्रमाणे मूलभूत उद्योगधंदे सार्वजनिक मालकीच्या विभागात घेण्याचे सरकारने ठरविले आहे व या धंद्यात नवीन निघणारे कारखाने सरकारी मालकीचे राहतील . मात्र राष्ट्रहितासाठी उद्योगपतींनाही सध्या चालू असलेले कारखाने वाढविण्यास अगर नवीन कारखाने काढण्यास मुभा देण्यात येईल . सहकारी पद्धतीवर निघणाऱ्या धंद्यांनाही वाव देण्यात येईल . या ठरावात उद्योगधंद्यांच्या तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत . पहिल्या यादीत सरकारची खास जबाबदारी असलेले उद्योगधदे घालण्यात आले आहेत . दुसऱ्या यादीत जे धंदे घालण्यात आले आहेत , त्या उद्योगधंद्यांत सरकारी व खाजगी भांडवलाला मोकळे ठेवण्यात आले आहे . ग्रामीण लहान उद्योगधंद्यांना सरकार खास मदत करणार आहे . व्यापारीक्षेत्रातही सरकार प्रवेश करणार आहे . औद्योगिक धोरणाचा हा सारांश आहे . १९४८ चा ठराव बदलणार आहोत असा सरकारने दिलासा दिला होता . पण प्रत्यक्ष जो बदल करण्यात आला आहे तो विशेष दखल घेण्यासारखा झाला नाही . पहिल्या यादीत जे उद्योगधंदे घालण्यात आले आहेत त्यात १ ९ ४८ च्या ठरावापेक्षा जास्त काही नाही . १ ९ ४८ च्या ठरावाप्रमाणे ज्या धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात आले होते , ते धंदे दुसऱ्या यादीत आहेत . पूर्वी खाजगी भांडवलासाठी जे उद्योगधंद्याचे क्षेत्र मोकळे ठेवण्यात आले होते ते तसेच ठेवले आहे . मग बदल म्हणजे पोलाद , खाणी व तेल या धंद्यांत सरकारने आपले क्षेत्र ठरवून ठेवले आहे एवढाच होतो . त्याचबरोबर या धंद्यात सध्या जे खाजगी भांडवल आहे , त्याला खास संरक्षण व शाश्वती देण्यात आली आहे . या ठरावात खालीलप्रमाणे धोरणाचे स्पष्टीकरण केले आहे . 8 ) Industries in the first catagory have been listed in schedule ' A ' of this resolu tion , All new units in these industries , save where their establishment in the private sector has already been approved , will be set up only by the state . This does not pre clude the expansion of the existing pri vately owned units or the possibbility of the state securing the co - operation of the pri vate enterprise in establishment of new units when the national interest so re quire ..... 9 ) Industries in the second catagory will be those listed in schedule ' B ' with a view to accelerating their future develop ment . The state will increasingly establish new undertakings in these industries . At the same time private enterprise will also have the opportunity to develop in this field , either on its own or with State participation. 10 ) All remaining industries will fall the third category , and it is expected that their development will be undertaken ordinarily through the initiative and enterprise of the private sector , through it will be open to the state to start any industry even in this cat egory . It will be the policy of the state to fa cilitate and encourage the development of these industries in the private sector , in ac cordance with the programme formulated in successive Five Year Plans , by ensuring the development of transport of power and other services and by appropriate fiscal and other measures . The State will con tinue to foster institutions to provide finan cial aid to these industries and special as sistance will be given to enterprises organised on co - operative lives for industrial and agricultural purposes . In suitable cases , the State may also grant financial assistance to private sector such assis tance especially when the amount involved in substantial will preferably be in the form of participation equity Capital , through it may also be in part in the form of debenture capital .
11 ) The Govt . of India however recognise , that it should in general be de sirable to allow such undertakings to de velop with as much freedom as possible consistent with the targets and objectives of the national plan . When there exist in the same industry both privatly & publicaly owned units it would continue to be the policy of the State to give fair and non dis criminatory treatment to both of them . contd ... वरील उताऱ्यावरून औद्योगिक धोरणाची बरीचशी कल्पना येईल . विशेषत : मूलभूत उद्योगधंद्यांतील लोखंड पोलाद धंद्यात टाटा कंपनी प्रामुख्याने आहे . टाटा कंपनीच्या कारखान्याला खास संरक्षण देण्यात आले आहे . इतकेच नव्हे , तर त्या कारखान्याच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून व परकीय भांडवलदारांकडून कर्ज व मदत मिळवून देण्यात सरकारने पुढाकार घेतला आहे . टाटा कंपनीच्या ( पोलाद कारखाना ) हितासाठी जो राजकीय पक्ष प्रयत्न करील त्यास निवडणुकीसाठी मदत देण्याचा ठराव टाटा कंपनीने या वर्षी केला आहे . सरकारने त्या उपकाराची परतफेड काँग्रेस फंडाला मदत करण्याचे ठरवून केली आहे व अमेरिकन बड़े भांडवलदार जसे राजकीय पक्ष उघडपणे विकत घेतात तसा पायंडा भारतात पाडण्याचे पुण्य टाटा कंपनीने बांधून घेतले आहे . दुसऱ्या यादीतील धंद्यांत खासगी भांडवलाला सरकारी कारखान्याची चढाओढ करण्याची सवलत देण्यात आली आहे . इतर सर्व धंद्यात खाजगी भांडवलाला संपूर्ण मोकळे रान ठेवण्यात आले आहे . इतकेच नव्हे , तर त्या धंद्यांना सर्व प्रकारे साहाय्य दिले पाहिजे , असे नमूद करून त्याची तरतूद पंचवार्षिक योजनेत केली आहे . सार्वजनिक मालकी विभागात सरकारतर्फे काही कारखाने काढण्यात येणार आहेत . याशिवाय जुन्या औद्योगिक धोरणात फारसा बदल करण्यात आलेला नाही . उद्योगपतींना पूर्ण स्वातंत्र्य व शाश्वती देण्यात आली आहे . याप्रमाणे योजिलेल्या सार्वजनिक मालकी विभागातील उद्योगधंदे शेवटी खाजगी भांडवलाच्या मेहरबानीवर जगविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .
देशाचे औद्योगिकीकरण व वाहतूक याकडे तथाकथित लक्ष देताना देशातील शेती उत्पादनातल्या मुख्य व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . शेतीसुधारणेसाठी पहिल्या योजनेतील तरतुदींपेक्षा ( ३५७ कोटी रुपये ) ५१.१ टक्के जादा रकमेची तरतूद ( ५६८ कोटी रुपये ) करण्यात आली आहे . असे जरी असले तरी एकंदर योजनेतील शेती व्यवसायाच्या खर्चाचा हिस्सा ३.३ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे . खर्चाचे प्रमाण हे क्षणभर बाजूला ठेवले तरी एकंदर शेती धोरण देशातील शेती व्यवसायाला उपकारक नाही . पहिल्या योजनेच्या काळात शेती उत्पादन वाढविण्यासाठी मूलभूत धोरण घ्यावयास पाहिजे होते व ज्या उपाययोजना करावयास हव्या होत्या त्या पार्श्वभूमीवर या योजनेतील तरतूद अगदी निराशाजनक आहे . दुसऱ्या योजनेत शेती व्यवसाय मूलभूतरीत्या विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न झाला नाही . गरीब शेतकऱ्यांना व कुळांना जे आर्थिक स्वास्थ्य मिळावयास हवे होते त्याची किमान शाश्वतीसुद्धा योजनेत देण्याचा प्रयत्न झाला नाही . याउलट जमिनीवरून हकालपट्टी , गरीब शेतकऱ्यांना भासणारे भांडवलाचे दुर्भिक्ष , सावकारांकडून त्यांची होणारी पिळवणूक या प्रश्नावर राज्य सरकारांनी दिशा दाखविण्यास दुसरी योजना असमर्थ ठरली आहे . दुसऱ्या योजनेतील शेती अर्थव्यवस्थेबाबतच्या योजना प्रयोगावस्थेतल्याच आहेत . निश्चित धोरण कोणतेच नाही . शेती उत्पादनाबाबतचे उद्दिष्ट ठरविण्यात राज्य सरकारे व मध्यवर्ती सरकार यांच्यात मतभेद आहेत . सहकारी शेती , सहकारी पद्धतीवर शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीमालाची खरेदी - विक्री , वेअरहाऊस अगर शेतीमालाची प्रतवारी लावण्याबाबतची तरतूद या सर्व प्रश्नांवर या पाच वर्षांच्या काळात फक्त प्राथमिक अशा काही योजना घेतल्या जाणार आहेत . याउलट प्राथमिक सहकारी शेतीच्या प्रश्नावर सरकारच्या मनात अजूनही संशय आहे . त्याचबरोबर शेती व्यवसायाचा जो मूलभूत प्रश्न शेतीमालाला योग्य दर देणे , या प्रश्नाकडे या योजनेत पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे . शेतीमालाचा उत्पादनखर्च , शेतकऱ्यांचे जीवनमान याचा विचार करून किमती ठरवल्या पाहिजेत . ठराविक दरापेक्षा खाली किमती घसरल्या तर सरकारने किमान दराने शेतीमाल खरेदी केला पाहिजे . पण या योजनेत या प्रश्नावर पूर्णपणे स्तब्धता स्वीकारली आहे . मध्यवर्ती सरकारतर्फे नुकतेच एक सरकारी शिष्टमंडळ नवचीनमधील शेतीसुधारणेच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आले होते . शिष्टमंडळातर्फे श्री . थापर यांनी प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे . त्यात त्यांनी तेथील प्रयत्नांचा अहवाल दिला आहे . नवचीनमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किमान दराची शाश्वती देण्यात येते व जादा उत्पादन सरकार खरेदी करते . शेती उत्पादनाचे दर ठरविण्यात आले आहेत . भवचीनचे सरकार ज्या गोष्टी करू शकते त्या गोष्टी आम्हाला भारतात का करता येऊ नयेत , असा रोख सवाल त्यांनी आपल्या अहवालात भारत सरकारपुढे ठेवला आहे . शेती मालाला योग्य किमती देणे हा भारतीय शेतीव्यवस्थेचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे . तो सोडविल्याशिवाय भारतातील शेतीव्यवस्था विकासाच्या मार्गावर नेणे कठीण आहे . भारतातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या ताब्यात त्यांना वर्षभर काम मिळेल अशी जमीन नसते . त्यांचे उत्पादन त्यांना किफायतशीर पडत नाही व त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारणे कठीण आहे . कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कसण्याची मालकी देऊन त्यांना सहकारी शेतीच्या पद्धतीत आणले पाहिजे . पण तो प्रयत्न या योजनेच्या काळात फक्त प्रयोगादाखल होणार आहे . शेतकऱ्यांना हंगामी लांबमुदतीचा भांडवलपुरवठा करण्याचा प्रश्न शेतीव्यवसाय सुधारण्याच्या मार्गावरील महत्त्वाचा प्रश्न आहे . रिझर्व्ह बँकेतर्फे रुरल क्रेडिट सर्व्ह कमिटी नेमण्यात आली होती . त्या कमिटीच्या अहवालात शेतकऱ्यांना लागणाऱ्या कर्जापैकी फक्त ६ टक्के सहकारी सोसायट्या व सहकारी यंत्रणा यांच्याकडून मिळते . बाकीचे ९ ३ टक्के कर्ज सरकार , दलाल , अडते यांच्याकडून मिळते , असे म्हटले आहे . रिझर्व्ह बँकेने १० कोटी रुपये शेतकऱ्यांना लांब मुदतीची कर्जे देण्यासाठी राखून ठेवले आहेत . या योजनेतही सहकारी क्षेत्रासाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे . भारतातील शेतीव्यवसायाचा व्याप पाहिल्यावर ही तरतूद म्हणजे टिटवीने समुद्र आटविण्याचा आटापिटा करण्यासारखे आहे . शिवाय सहकारीक्षेत्रातील आजची यंत्रणा पाहता ज्या गरीब शेतकन्यांना भांडवलाची आवश्यकता असेल त्यांना ही मदत न मिळता सहकारी क्षेत्रात वर्चस्व असलेल्या गावातील श्रीमंत शेतकऱ्यांनाच प्रामुख्याने मिळणार आहे . सरकारच्या सहकारी खाते मंत्र्यांची परिषद जुलै महिन्यात भरली होती . या परिषदेत कम्युनिटी डेव्हलपमेंटचे कमिशनर श्री . एस . के.डे यांनी सहकारी क्षेत्रातील यंत्रणेबाबत काढलेले हताश उद्गार पाहण्यासारखे आहेत . " Shri SK Day , Administrator Commu nity Project speaking at the conference had said that unless disparitage between privileged and the under previleged was re moved , co - operation could not do anything in the Project Area in regard to co - opera tion so far as those , who were in greatest need of co - operation were kept out of the movement . Whatever facilities given by the Gov ernment - could not be taken advantage of by the under previliged " He said ..... ( Free Press Journal .. 3 -7-56 ) ज्या कम्युनिटी प्रोजेक्टचा एवढा गाजावाजा करण्यात येत आहे , त्या विभागातील ही परिस्थिती आहे . रुरल क्रेडिट सर्व्ह कमिटीच्या अहवालात सोसायट्यांच्या कारभाराचे काही मासले देण्यात आले आहेत . त्यांत सावकार , खेड्यातील व्यापारी , जमीनदार , अडते , हे को - ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीचे सभासद आहेत असे काही प्रकार त्यांना दिसून आल्याचे म्हटले आहे . गरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी चळवळ देशात सुरू करण्यात आली आहे . ती प्रामुख्याने गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे यांच्या हातात देण्यात आली आहे . त्यामुळे सहकारी चळवळीचा विकास होण्याची शक्यता नाही . सहकारी शेतीचे प्रयोग आतापर्यंत फसले याचे मुख्य कारण हेच आहे . सहकारी क्षेत्रातील कारभाराबाबत या कमिटीच्या अहवालात खालील इशारा देण्यात आला आहे . With a through reforms of the opera tions of the co - operative credit structure and in particular the primary credit struc ture , which its policys can only stimulate but not bring about , it would not be possible for the Reserve Bank to ensure that the whole of the credit Provided by it is actually transmitted to where it is intended and not diverted in varying degress to needs other than rural and purposes other than agricul ture . Even more difficult is that it to ensure without such reorganisation that the credit reaches the medium and small cultivators since much of the larger part . He is at present outside co - operation itself . अर्थशास्त्रज्ञांनी वरील इशारा दिला आहे . पण इशाऱ्याकडे या योजनेत लक्ष देण्यात आले नाही . रिझर्व्ह बँकेने या शिफारशीचा स्वीकार केला असला तरी प्रत्यक्ष ही यंत्रणा रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत येत नाही . वरील प्रश्नाशिवाय ग्रामीण जीवनाचे अनेक प्रश्न आहेत . त्या प्रश्नांकडे फक्त वरवर पाहून चालणार नाही . ग्रामीण आरोग्य , शिक्षण , घरबांधणी , पाणीपुरवठा , वाहतूक या प्रश्नांचा अर्धवट विचार केला आहे . कम्युनिटी प्रोजेक्टस् , नॅशनल डेव्हलपमेंट ब्लॉक्स , स्थानिक विकास योजना यांच्यामार्फत जनतेचे सहकार्य उभारून , जनतेला त्या सार्वजनिक कार्यास प्रवृत्त करून हे प्रश्न सोडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे . ग्रामीण जनतेला आपल्या जीवनाची शाश्वती मिळू शकत नसल्याने सार्वजनिक हिताच्या योजनांवरसुद्धा जो उत्साह त्यांच्यात दिसून यावयास पाहिजे तसा दिसून येत नाही . हे सहकार्य सहकारी व ग्रामीण पुढाऱ्याच्या दबावाखाली मिळविण्यात येत आहे ; पण पुरेसा होत नाही . झाला तर त्याची गती टिकत नाही . शिवाय या योजनेखाली सुधारणा केल्या जातात त्या टिकविण्याचा प्रयत्न होत नाही . वृक्षारोपण सप्ताह , आरोग्य सप्ताह , ग्रामसुधारणा सप्ताह ही त्याची उदाहरणे आहेत . ग्रामीण मजुरांच्या जीवनाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे . या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा मार्ग या योजनेत दाखविला नाही . यानंतर भांडवल उभारणीच्या प्रश्नाकडे वळणे जरूर आहे . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सरकारीरीत्या ४८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत . त्यापैकी ८०० कोटी रुपये कराच्या मार्गाने उभारले जावयाचे आहेत . सध्याच्या कराने ३५० कोटी रुपये या योजनेसाठी मिळतील व जादा कर वसूल करून ४५० कोटी रुपये उभारले जावयाचे आहेत . कर चौकशी मंडळाच्या शिफारशीप्रमाणे हे कर प्रामुख्याने जनतेच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर बसविण्यात येणार आहेत . या मंडळाच्या मते जनतेने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत ; शिवाय जादा उत्पादनाचा तोच हमखास मार्ग आहे . एकीकडे सर्वसाधारण समाजाचे जीवनमान खालावले आहे . बेकारी वाढली आहे . शेतीमालाच्या अस्थिर दरामुळे शेतकऱ्यांचे जीवन अस्थिर झाले आहे . जनतेची क्रयशक्ती घटली आहे . अशा परिस्थितीत परत गरजा कमी करा असा सल्ला देण्यात आला आहे . या शिफारशीचा स्वीकार करून या योजनेत नवीनच जादा कर बसवून भांडवल उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे . चुकीच्या अंदाजपत्रकी पद्धतीने ( कर्जरोखे विकणे , कर्ज उभारणे ) १२७० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत . यामुळे सध्या होत असलेली चलनवाढ अधिक वेगाने होणार आहे . परकीय भांडवलाचा प्रश्नही तितकाच धोक्याचा आहे . भारताची अर्थव्यवस्था परकीय भांडवलावर किती अवलंबून ठेवावयाची ? गेल्या आठ वर्षांत परकीय भांडवल ( ब्रिटिश व अमेरिकन ) मोठ्या प्रमाणात वाढत आहे . त्या भांडवलाने आपला व्याप व वर्चस्वही वाढविले आहे . या योजनेच्या काळात हे वर्चस्व वाढतच राहणार आहे . सरकारच्या भांडवलनिर्मितीच्या व करपद्धतीच्या धोरणामुळे पंचवार्षिक योजनेत गृहीत धरलेले उद्दिष्ट साध्य होणार आहे का ? देशातील विषमता कमी होण्यासाठी या धोरणाचा उपयोग होणार आहे का ? अर्थव्यवस्था खंबीर पायावर उभी करण्याची ताकद या धोरणात आहे काय ? या सर्व प्रश्नांची निश्चित होकारार्थी उत्तरे देण्याचे धाडस नियोजन समिती किंवा अर्थशास्त्रज्ञही करीत नाहीत . कर चौकशी मंडळाचे मत नमुन्यादाखल पाहण्यासारखे आहे . The tax system can certainly assist in this ( reducing inequalities ) process , by the recognition of the fact that the distribution of income is not immutable but is capable of adjustment of definite emphasis is directed towards it in fiscal system . But such emphosis should be based on a realistic appraisal of what the tax system can , at any time , achiever , in the direction of less ening inequalities and , secondly , how far the process can be carried without undue adverse repurcussions on private produc tive efforts and interprise . A tax policy aimed at lessening in equalities through reducing incomes at the higher levels is only form high fiscal opera tions may assume in this sphere . An impor tant complementary aspect lies in the part that public expenditure for economic devel opment ( e.g. agriculture and irrigation ) and expansion of social services like education and health , may play in strengthening the position of weaker sections of the community . Increase in inequalities in parts of economy and in certain rages of incomes has occured despite a considerable steep ening of the progression in income tax . Widening of taxation of wealth and property is also a possible mean of reduc ing inequalities . As a serious limitation gov erning the full exploitation of the tax instru ment for this purpose , must however be mentained . This arises from the fact that if any considerable addition is to be made to public revenues and we have already stresed the need for such addition same contribution must come from the masses of the population through taxes which have a wide base . The need to extend taxation to the masses would in turn , limit the increase in progression in tax system which may otherwise be brought about by suitable charges . In direct and indirect taxation . ( Vol . 1. pages 146-147 ) कर चौकशी मंडळाचे हे विचार मासलेवाईक आहेत . उत्पन्नावर मर्यादा घालून अगर जादा कर बसवून विषमता कमी करता येईल ; पण त्यामुळे उद्योगपतींच्या विकासाला आळा बसेल व त्याचबरोबर श्रीमंतांवर वाढते कर बसविताना गरीब जनतेकडूनही योग्य हिस्सा मिळाला पाहिजे असे म्हटले आहे . उत्पन्नावरील कर वाढवूनही विषमता काही प्रमाणात वाढली आहे , असेही मंडळाने कबूल केले आहे . शिवाय विषमता कमी करण्यासाठी , गरीब जनतेच्या उन्नतीसाठी खास प्रयत्न केले पाहिजेत , असेही म्हटले आहे . याचा अर्थ , त्या करपद्धतीत विषमता कमी होण्याची आशा नाही . याउलट या मंडळाच्या शिफारशीप्रमाणे सामान्य जनतेवरील कराचा बोजा वाढणार असल्यामुळे विषमता पुन्हा जास्त प्रमाणात वाढेल . बेकारी कमी करण्यासाठीही या योजनेतील आर्थिक धोरणाचा फारसा फायदा होणार नाही किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतविले जाणार म्हणून कामगारांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल तीही शक्यता कमी आहे . सार्वजनिक मालकी विभागातील कारखान्यांत भांडवल खूप गुंतविण्यात येणार असले तरी त्यासाठी कामगारांची संख्या मोठी लागणार आहे . शिवाय या कारखान्यात कसबी कामगारांची गरज लागणार आहे . इतर धंद्यांत जे भांडवल गुंतविण्यात येणार आहे त्यापैकी मोठा भाग सध्याच्या कारखान्यांचे अद्यावतीकरण ( रेशनलायझेशन - मॉडर्नायझेशन ) करण्यासाठी लागणार आहे . नवीन कारखाने त्यामानाने कमी लागणार आहेत . बेकारांचा सध्याचा आकडा व दरवर्षी त्यात पडणाऱ्या भरीचा विचार केला तर या योजनेच्या कारकिर्दीत बेकारीत भर पडणार आहे . या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होईल , की या योजनेत जी उद्दिष्ट मानण्यात आली आहेत ती गाठण्यात भरीव यश मिळणे कठीण आहे . तरी पण राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे , असा अंदाज करण्यात आला आहे आणि तो काँग्रेसच्या अर्थाप्रमाणे खरा आहे . कारण भांडवलदारांचे उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न , भांडवलदारांचे हित म्हणजे राष्ट्रीय हित हाच अर्थ काँग्रेसला मान्य आहे . पंचवार्षिक योजनेच्या वरील विवेचनाचा विचार केल्यास तिच्या फलश्रुतीचा अंदाज बांधणे कठीण होणार नाही . शेती उत्पादनात वाढ करणे व देशातील शेतीव्यवस्था विकासाच्या मार्गावर नेणे , शेती अर्थव्यवस्था स्थिर करणे , औद्योगिकीकरणाचा पाया घालणे ही उद्दिष्टे या योजनेत स्वीकारण्यात आली होती . ही उद्दिष्टे साधण्यात सरकारला यश आले नाही हे स्पष्टपणे कबूल करणे भाग पडते . नियोजन समितीच्या वेगवेगळ्या अहवालांतून या अपयशाची कारणमीमांसा काहीफार प्रमाणात विशद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . वैधानिक लोकशाहीच्या कारभारात नियोजनाचे कार्य व अंमलबजावणीचे कार्य मंदगतीने चालते , देशी बड्या भांडवलदारांनी पुरेसे सहकार्य दिले नाही , अपेक्षित अशी बाहेरची मदत वेळेवर मिळाली नाही , आवश्यक अशा माहितीचा अभाव , तंत्रज्ञांचा अभाव या गोष्टींमुळे या योजनेच्या कार्यात अपयश आले आहे , असे सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे . पण या गोष्टी म्हणजे खरे पाहता , या अपयशाची मूलभूत कारणे नाहीत . नियोजनाची काँग्रेस सरकारची मूलभूत भूमिकाच चुकीची आहे . देशाच्या संपत्तीचा व ताकदीचा योग्य अंदाज न घेता नोकरशाहीच्या साहाय्याने वेगवेगळ्या कामाची यादी करणे म्हणजेच नियोजन , अशी नियोजन मंडळाने भूमिका घेतली होती व ती भूमिका अजूनही तशीच आहे ! खऱ्या अर्थाने लोकशाही नियोजन हा या योजनेचा पायाच नव्हता . जनतेच्या आशाआकांक्षा व्यक्त करण्याची व त्यांचा प्रभाव नियोजनावर असण्याची जी आवश्यकता आहे ती मुळातच धुडकावण्यात आली होती आणि त्यामुळेच या योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यात जनतेत सहकार्याची , उत्साहाची व पुढाकार घेण्याची जी वृत्ती वाढावयास हवी होती ती वाढू शकली नाही . शेती उत्पादन वाढविणे व शेतीव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर नेणे हे उद्दिष्ट मानण्यात आले होते . पण यासाठी मार्ग मात्र अत्यंत धरसोडीचा व चुकीचा स्वीकारला होता . शेतीव्यवस्थेचा वस्तुनिष्ठ विचार न करता अनेक कायद्यांची निर्मिती सरकारने केली . जहागिरदार , जमीनदार , मालगुजार , खोत , तालुकादार वगैरे सरकार व प्रत्यक्ष जमीन कसणारे शेतकरी यांमधील दलाल नाहीसे करण्यासाठी म्हणून जे अनेक कायदे करण्यात आले , त्यात प्रत्यक्ष त्यांच्या हिताचा प्रथम विचार करून या कायद्यातून पळवाटा काढण्याची त्यांना संधी देण्यात आली . त्यामुळे जमिनीवरून कुळांची हकालपट्टी करण्यास त्यांना सवलत मिळाली व अनेक निमित्ताने व प्रकारे जमिनीवर पुन्हा आपली मालकी टिकविणे त्यांना शक्य झाले आहे . शेतीप्रधान अशा मागासलेल्या देशात शेती अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी शेती उत्पादनास योग्य किंमत , त्याची योग्य खरेदी - विक्री या प्रश्नाकडे सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले . त्यामुळे उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना जो उत्साह आवश्यक असतो तो निर्माण करणे सरकारला अशक्य झाले आणि त्यामुळे शेती उत्पादनात टिकाऊ स्वरूपाची वाढ करणे सरकारला शक्य झाले नाही . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालाच्या प्रस्तावनेच्या तिसऱ्या परिच्छेदात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात समाजवादी समाजपद्धती निर्मितीचा पाया घालण्यात आला आहे , असे म्हटले आहे . त्याचबरोबर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची दिशा समाजवादी समाजपद्धतीचे निर्माण करण्याकडे राहील असे म्हटले आहे . " These values or basic objectives have recently been summed up in the phrase ' Socialistic pattern of society essantially , this means that the basic eriterian for deterining the lines of advance must not be prival profit but social gain and that the pattern of development and the structure of socio - economic relation should be so planned that they result not only in appricialble increase in national in come and employment but also in greater equality in income and wealth . " ( Page 22 ) नियोजन मंडळाच्या मताप्रमाणे आर्थिक समानता निर्माण करण्याचा जो उद्देश गृहीत धरण्यात आला आहे तो पहिल्या योजनेत यशस्वी झाला नाही , दुसऱ्या योजनेच्या काळात यशस्वी होण्याची शक्यता नाही , हे दोन्ही योजनांचे परीक्षण करताना स्पष्ट झाले आहे . समाजवादी समाजपद्धती निर्माण करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण करावी लागते ती न करता समाजवादाची भाषा सध्याचे सरकार व काँग्रेस यांच्यामार्फत सतत उच्चारली जाते . ती मूलभूत फसवी आहे . मागासलेली व परावलंबी अर्थव्यवस्था असलेल्या देशांतून समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने दोन अवस्थांतून जावे लागते . पहिल्या अवस्थेत देशाच्या अर्थव्यवस्थेवरील साम्राज्यवादी , सरंजामदारी व मक्तेदारी भांडवलदार यांचे वर्चस्व नष्ट करणे व राज्यव्यवस्था खऱ्या अर्थाने लोकशाहीची निर्माण करणे ही कामे पार पाडावी लागतात . या अवस्थेतून जाताना समाजवादी समाजपद्धतीचा पाया घालणे शक्य आहे . यापैकी खऱ्या अर्थाने एकही कार्य पूर्ण होऊ शकले नाही . त्याचप्रमाणे दुसऱ्या योजनेतही हे कार्य पूर्ण होण्याची शक्यता नाही . नवचीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षाही मागासलेली व साम्राज्यवादी व मक्तेदार भांडवलदार यांचे वर्चस्व असलेली होती . पण जनतेच्या हाती ती सत्ता येताच प्रथम मूलभूत उद्योगधंदे , मोठ्या बँका , उद्योगधंदे , रेल्वे यांचे राष्ट्रीयीकरण करून राष्ट्राच्या जनतेच्या मालकीचे केले . जमीनदारी नाहीशी करून कसणाऱ्यांची जमीन या सूत्राची अंमलबजावणी केली आहे . त्यामुळे समाजवादी समाजव्यवस्थेचा भक्कम पाया घालणे त्यांना शक्य झाले आहे . जनतेच्या हाती खरीखुरी सत्ता असल्यामुळे समाजवादाच्या दिशेने खंबीर पावले टाकणे शक्य झाले आहे . नवचीनने गेल्या पाच वर्षांत शांततामय मार्गाने भांडवलदारी कारखाने सरकारी क्षेत्रात आणून सोडले आहेत . नवचीनच्या या घटनेच्या १० व्या कलमात याबाबतचे सरकारचे कर्तव्य स्पष्ट केले आहे . " The policy of the state towards capi talist industry and commerce is to use , re strict and transform them the state makes use of the positive side of capitalist indus try and commerce which are benificial to national welfare and the peoples livelyhood , restrict their negative side , which are not benificial to national welfare and the peoples livelyhood , encourage and guide their transformation into various forms of state capitalist economy , gradu ally replacing capitalist ownership , with ownership by the whole people and thus by means of control exercised by the adminis trative or gove of the state the leadership given by the state sector of economy and supervision by the workers ( P. 17 , Report on the first five year plan of peoples repub lic of China ) राज्यसत्तेची समाजवादी समाजरचना निर्माण करण्याची ही जबाबदारी भारत सरकारचे नियोजन मंडळ कोठेच मान्य करीत नाही . याउलट सरकारी कक्षेतील उद्योगधंदे व उद्योगपतींचे खाजगी उद्योगधंदे यांना समान वागणूक देऊ इच्छिते . याचा अर्थ असा होतो , की हे नियोजन प्रामुख्याने भांडवलदारांना संरक्षण देणारे आहे आणि त्यामुळे या नियोजन पद्धतीने उलट भांडवलदारांची अर्थव्यवस्थेवरील पकड जास्त मजबूत होते . " A democratic system of planning esehews direct commandeering of re sources and it operates mainly through the price mechanism . There are broadly speaking , two types of techniques through which the objective in view have to be at tained firstly . There is the over all regulation of economic activity . Through fiscal and monetary policy and secondly , there are devices like export and import liceneing of industries or trades , price controls and allo which influence and regulate economy activity in particular sectors of cation sub - sectors of economy . There has been of late a good deal of discussion as to whether planning should can fine itself to the former type of cantrol or whether it should extend to the latter type also overall fiscal and monetary descriptive , it would appear can go a long way towards regulat and differential taxation can assist in ing the cbb and flow of economic activity channelting resources at the margin in cer tain directions . There is little doubt , how ever , that a caupreheusive plan which aims at raising the investment in national economy substantially and has a defenit order of priorites in view cannot be seen through or the basic of merely of overall fis cal and monetary control , the second type of control mentianed above is thus in es capable . " ( P. 38 , second five year plan ) नियोजनाचा हा दृष्टिकोन पूर्णत : भांडवलदारी आहे . आर्थिक अरिष्टाचे संकट टाळण्यासाठी भांडवलदारी राजवट असलेली सरकारे अर्थव्यवस्थेत मर्यादित हस्तक्षेप करतात . प्रवेश करतात . त्यातून सरकारी भांडवलदारी निर्माण होते . करपद्धती , आयात - निर्यात व्यापार व इतर आर्थिक व व्यापारी मार्गाने औद्योगिकीकरणाचा पाया घालण्यासाठी साधनसंपत्ती निर्माण करण्याची भाषा ही औद्योगिकीकरणाचा सर्व बोजा सर्वसामान्य जनतेवर लादणे हा आहे . बडे भांडवलदार या बोजापासून मोकळे राखले जातात . हे मध्यवर्ती सरकारच्या करवसुलीच्या सालोसालच्या अंदाजावरून स्पष्ट होते . मध्यवर्ती - राज्य सरकार यांच्या उत्पन्नाचा फक्त १९ टक्के हिस्सा नफ्यावरील कर , कॉर्पोरेशन टॅक्स वगैरे करांतून मिळतो . इतर सर्व उत्पन्न सर्वसामान्य जनतेवरील करांतून मिळते . वरील नियोजन धोरण हे देशात समाजवादी समाजपद्धतीचा पाया घालण्यास असमर्थ आहे . याच धोरणातून औद्योगिक धोरणाचा जन्म झाला आहे . त्यामुळे उद्योगपती व बडे भांडवलदार यांच्या संरक्षणाची तरतूद त्यात करण्यात आली आहे . सरकारी कक्षेतील उद्योगधंद्यांचे एकंदर औद्योगिक क्षेत्रात जे वर्चस्व असावयास हवे ते या धोरणातून निर्माण होणार नाही आणि त्यामुळे खाजगी उद्योगधंद्यांचा समाजवादी समाजरचनेच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेण्याची नियोजन मंडळाची व काँग्रेसची योजना ही जनतेची दिशाभूल करणारी योजना आहे . भारताची अर्थव्यवस्था मागासलेली आहे . साधारणपणे ७० टक्के जनता शेती व तत्सम व्यवसायावर अवलंबून आहे . अशा परिस्थितीत औद्योगिकीकरणाला संपूर्ण वाव मिळण्यासाठी सबंध शेती व्यवसाय नव्या पायावर बसविला पाहिजे व शेती व्यवसायातील सरंजामी व जमीनदारी संबंध नष्ट करून ' कसणाऱ्यास जमीन ' या तत्त्वावर शेती संबंध बसविले पाहिजेत . प्रत्यक्ष कसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोकीवर जमीनदारी , तालुकादारी , जहागिरदारी असे वेगवेगळे थर बसलेले आहेत . या थरांना उखडून काढण्याठी गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेले प्रयत्न इतके धरसोडीचे व अपुरे आहेत , की या प्रयत्नातून शेतीव्यवसायाचे हित न होता अनेक गुंतागुंती निर्माण झाल्या आहेत . सरंजामदार , जमीनदार , तालुकादार यांना नुकसानभरपाई देण्यात आली व ती शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसली आहे . तिची पूर्तता झाल्याशिवाय हे संबंध पूर्णत : संपणार नाहीत . जमीनदार , सरंजामदार वगैरे सरंजामी थराचे राज्य सरकारवर व काँग्रेस कमिट्यांवर इतके दडपण आहे , की हे संबंध नष्ट करणारे कायदे राज्य विधिमंडळात आणून संमत करून घेणे अशक्य होऊन बसले आहे .याउलट या कायद्यातून जमीनदारांना इतक्या पळवाटा राखण्यात आल्या आहेत , की या कायद्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांस उपयोग करून घेणे अत्यंत कठीण झाले आहे . त्यामुळे काँग्रेसला गेल्या पाच वर्षांत हे कार्य पूर्ण करता आले नाही ; नव्हे , काँग्रेस पूर्ण करू शकत नाही . राष्ट्रीय औद्योगिकीकरणाचा पाया घालण्यासाठी शेतीव्यवस्थेची जी पुनर्घटना करावयास पाहिजे त्यासाठी काँग्रेस प्रभावी यंत्रणा उभी करू शकणार नाही . कारण काँग्रेसच्या मध्यवर्ती पुढारीपणावर जसे बड़े भांडवलदार यांचे वर्चस्व आहे तसे प्रांतिक पुढारीपणावर कमीअधिक प्रमाणात जमीनदार , सरंजामदार यांचे वर्चस्व आहे . शेती प्रश्नावर या दोन हितसंबंधांचा संघर्ष गेली आठ वर्षे सतत चालू आहे . शेती व्यवसायातील सरंजामी हितसंबंध नाहिसे करणे बडे भांडवलदार यांच्या हिताचे आहे . पण जनतेची प्रभावी शक्ती निर्माण होऊ नये म्हणून सरंजामी हित संबंधांना आपल्या हितसंबंधांत सामावून घेणे हे बडे भांडवलदार यांचे धोरण आहे ; आणि त्या प्रमाणातच हा दडपशाही राजकारणाचा खेळ शेती व्यवसायाच्या धोरणात चालू आहे . आणि त्यामुळे सरंजामी हितसंबंध कमी केले पाहिजेत , ही जरी नियोजन मंडळाची घोषणा असली तरी प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी होणे लांबणीवर पडत आहे . हे सरंजामी हितसंबंध तातडीने निकालात काढून जमिनीची मालकी शेतकऱ्यांस मिळवून देणे व सहकारी तत्त्वावर शेतीची पुनर्घटना करणे हे आज तातडीचे कार्य आहे . सरंजामी हितसंबंधांचे अवशेष शिल्लक ठेवून सहकारी शेतीव्यवस्थेची भाषा बोलणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे . या प्रयत्नातून काँग्रेसला समाजवादी समाजरचनेचा पाया घालता येणे अशक्य आहे . वरील पार्श्वभूमीवर काँग्रेसची समाजवादाची भाषा मूलत : फसवी आहे . काँग्रेस आपल्या अपयशाचे खापर लोकशाहीवर फोडीत आहे . इतर समाजवादी राष्ट्रांचे यश हे तेथील एकपक्षीय राज्यव्यवस्थेमुळे शक्य झाले आहे , असा खोडसाळ प्रचार काँग्रेसमार्फत केला जात आहे . या दोनही गोष्टी बरोबर नाहीत . त्या त्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीत साम्राज्यवादी भांडवलदार व सरंजामदार यांच्या हातून राजसत्ता मिळविण्यासाठी क्रांतिकारक मार्ग अवलंबावे लागले असले तरी खरीखुरी समाजक्रांती कमीअधिक प्रमाणात शांततावादी मार्गाने यशस्वी करणे शक्य झाले आहे . सध्याच्या परिस्थितीत तर ही गोष्ट अधिक शक्य आहे . पण मूलत : राजसत्तेची भांडवलदार व सरंजामदार यांच्या वर्चस्वाखालून मुक्तता केली पाहिजे व जनतेच्या हाती खरीखुरी सत्ता मिळाली पाहिजे . काँग्रेसच्या समाजवादी धोरणात नेमका याच गोष्टीचा ठळक अभाव आहे . याउलट लोकशाही व शांततावादी मार्ग या शब्दांच्या किंवा घोषणांच्या बुरख्याखाली वर्गसमन्वयी धोरणांचा पुरस्कार करण्यात येत आहे . समाजव्यवस्थेत भांडवलदारी हितसंबंध सांभाळून समाजवाद आणणे अशक्य आहे .
लोकशाहीविरोधी राज्यकारभार
भारताच्या राज्यघटनेत वैधानिक लोकशाही ( Parlamentary democracy ) हे स्वीकारण्यात आले आहे त्याचप्रमाणे संघराज्याची कल्पना स्वीकारली आहे . गेल्या पाच वर्षांतील काँग्रेसचा कारभार या दोन्ही सूत्रांच्या विरोधी झाला आहे . एवढेच नव्हे , तर तो लोकशाहीविरोधी झाला हे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे . संघराज्याची योजना घटनेत प्रथमत : स्वीकारली असली तरी या योजनेला मूठमातीच देण्याचे प्रयत्न काँग्रेस करीत आहे . घटनेत प्रथमत : राज्य सरकारच्या कक्षेतील जे विषय नमूद करण्यात आले होते त्यावर मध्यवर्ती सरकारचे अतिक्रमण पद्धतशीरपणे करणे व राज्यसत्तेचे केंद्रीकरण करणे हे काँग्रेसच्या कार्यक्रमांचे स्वरूप झाले आहे . संघराज्याची कल्पना घटनेत स्वीकारताना देशातील भिन्न भाषिक समाजांना आपल्या सार्वत्रिक विकासाला पूर्ण वाव मिळाला पाहिजे हे तत्त्व काँग्रेसने मान्य केले होते . पण या तत्त्वाला मूठमाती देऊन वेगवेगळी घटक राज्ये म्हणजे करण्यात येणारे प्रादेशिक घटक आहेत ही तत्त्वशून्य व लोकशाहीविरोधी भूमिका काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत आस्तेकदम स्वीकारण्यास व ती अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे . काँग्रेसने एकदा स्वीकारलेली भूमिका सोडली हाच फक्त दोष नसून सध्या स्वीकारलेली भूमिका ही राष्ट्रघातकी आहे . देशाचा सार्वत्रिक विकास रोखून धरणारी आहे . या भूमिकेस सबंध देशातून जनतेचा निकराचा विरोध झाला आहे . आंध्र , मुंबई व बंगाल , ओरिसा , कर्नाटक , महाराष्ट्र यांच्या सरहद्दीचे प्रश्न यावर तुफान चळवळ जनतेने उभारली . पण सरकारने पोलिसी राज्याच्या साहाय्याने ती दडपून टाकली आहे . काँग्रेसच्या लोकशाहीवादी कारभाराचा हा ताजा अनुभव आहे . वैधानिक लोकशाही हे सूत्र घटनेत स्वीकारण्यात आले असले तरी काँग्रेस सरकारचा कारभार या सूत्राशी पूर्णपणे विरोधी आहे . गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला निम्म्यापेक्षा कमी मते मिळाली असली तरी विधिमंडळे व लोकसभा यांतून प्रचंड बहुमत मिळाले आहे . या बहुमताच्या जोरावर सर्व वैधानिक मार्गांचे उघडउघड उल्लंघन करणे हा काँग्रेस सरकारचा रोजचा उपक्रम झाला आहे . काँग्रेसची मंत्रिमंडळे ही हुकूमशाही पद्धतीने कारभार हाकीत असून विधिमंडळे व लोकसभा यांना काँग्रेसच्या राजवटीत मंत्रिमंडळाच्या धोरणास ' जी हुकूम ' म्हणणारी सभामंडळे हे स्वरूप आले आहे . लोकमताचा राजसत्तेवर प्रभाव पाडणे हे कार्य करणे या सार्वभौम संस्थांना अशक्य होऊन बसले आहे . ब्रिटिशांच्या कारकिर्दीत तयार झालेली नोकरशाही अधिक बलिष्ठ झाली आहे . त्यामुळे या राज्यकारभारात वशिलेबाजी , लाचलुचपत , कारभारातील दिरंगाई हे नित्याचे अनुभव होऊन बसले आहेत . काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे नोकरशाही मोकाट झाली असून जनमताची कदर करणे अगर जनमताचा प्रभाव पाडणे अशक्य झाले आहे . गेल्या पाच वर्षांत कामगार , शेतकरी , मध्यमवर्ग यांनी आपल्या जीवनाच्या स्थैर्यासाठी अनेक वेळा चळवळी केल्या . पण प्रत्येक चळवळ ही सरकारविरोधी कृत्य आहे असा शिक्का मारून ती सर्व पोलिसी उपायांनी चिरडून टाकण्याचा काँग्रेस सरकारने शिकस्तीचा प्रयत्न केला आहे . जनतेला आपले मागणे सरकारपुढे मांडणे हे सुद्धा अशक्य करून सोडले आहे . जनतेला घटनेने चळवळ संघटित करण्याचे , आपले मत संघटित बनविण्यासाठी प्रचार , संघटनास्वातंत्र्य दिले आहे . ते काँग्रेस सरकारने जनतेच्या हातून हिरावून घेण्याचा चंग बांधला आहे . अशा त - हेने राज्ययंत्रणेवर लोकमताचा प्रभाव पडणे अशक्य होऊन बसले आहे . लोकशाहीवादी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस सरकारने जनतेच्या चळवळीचे सर्व लोकशाही मार्ग बंद करून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे . चळवळी , सभा , निदर्शनाचा सौम्य सनदशीर प्रकार बेसनदशीर व अराजकीय ठरविला आहे . इतकेच नव्हे , तर या चळवळी दडपून टाकण्यासाठी अतिरेकी उपायांचा अवलंब करण्यास पोलिसांना उत्तेजन दिले आहे . मुंबई राज्यात गेल्या पाच वर्षांत ११०० वेळा गोळीबार करण्यात आला ही सरकारची कबुली हेच दाखविते , की काँग्रेस राजवटीत लोकशाहीच्या विकासाला वाव नाही . उलट हुकूमशाही , नोकरशाही व पोलिसी राज्यालाच काँग्रेसने उत्तेजन दिले आहे .
काँग्रेस सरकारचे स्वरूप
काँग्रेस सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कारकिर्दीचा आढावा पहिल्या पंचवार्षिक योजनेतील धोरण व योजनेची फलश्रुती , सरकारचे परराष्ट्रीय धोरण , दुसरी पंचवार्षिक योजना व औद्योगिक धोरण यांचे विवेचन केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारचे स्वरूप काय आहे याविषयी निदान करणे अगत्याचे आहे . १९४७ ऑगस्टमध्ये ब्रिटिशांकडून सत्तास्वीकार केल्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आहेत . काँग्रेसने प्रथम लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला होता . अवडी अधिवेशनानंतर समाजवादी समाजपद्धतीचा स्वीकार केला असल्याचे जाहीर केले आहे . या धोरणास लोकसभेची मान्यता मिळविली आहे . इंपीरियल बैंक , आयुर्विमा कंपन्या यांचे राष्ट्रीयीकरण केले आहे . नियोजनाच्या कार्यास सुरुवात करून देशाचे औद्योगिकीकरण घडवून आणण्याचा संकल्प जाहीर केला आहे . राष्ट्रीय विकास घडवून आणणारे समाजवादी युग सुरू करणारी देशातील अकर्तुम कर्तुम एकच शक्ती म्हणजे काँग्रेस , हा दावा काँग्रेसने केला आहे . दाभाडी ठरावात काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे हस्तक असलेले सरकार असे काँग्रेस सरकारच्या स्वरूपाविषयी निदान केले होते . वरील पार्श्वभूमीवर हे निदान आज कितपत बरोबर आहे हे तपासून पाहणे आवश्यक आहे . काँग्रेसचा लोककल्याणकारी राज्याचा दावा प्रथमच निकालात निघाला आहे . गेल्या पाच वर्षांत परकीय भांडवलदारांना व देशातील बड्या भांडवलदारांना त्यांना हवे तेवढे कामगार व सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे . इतकेच नव्हे , तर त्यांच्या अर्थव्यवस्थेस पोषक असा उद्योगधंद्यास सार्वजनिक मालकी विभाग निर्माण करण्याची १९५६ च्या औद्योगिक धोरणविषयक ठरावात तरतूद करून त्या लुटीचा कारभार तसाच चालू देण्याची शाश्वती दिली आहे . परकीय भांडवलाचे वर्चस्व पूर्वीपेक्षा वाढविण्यास वाव दिला आहे . परकीय भांडवलाची मनधरणी अजूनही चालू आहे . सरकारचे करवसुलीचे धोरण प्रामुख्याने सर्वसामान्य गरीब जनतेच्या उरावरच नाचते आहे . काँग्रेसचा राज्यकारभार नोकरशाही , वशिलेबाजी , लाचलुचपत , उधळपट्टी यांनी बुजबुजला असून जास्त लोकशाहीविरोधी होत आहे . देशातील सत्तेचे केंद्रीकरण झपाट्याने चालू आहे . कामगार , शेतकरी , शेतमजूर यांच्या जीवनावर होत असलेले दैनंदिन हल्ले वाढत आहेत . ग्रामीण गावगुंड , श्रीमंत शेतकरी व काँग्रेसचे हस्तक यांची पुंडाई वाढत आहे . मध्यमवर्ग बेकारी , महागडे जीवन , घराची टंचाई , शिक्षणाचा वाढता खर्च या संकटात सापडला आहे . देशातील विषमता पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढली आहे . वेगवेगळ्या उद्योगधंद्यांत नव्या नव्या मक्तेदारी निर्माण होत आहेत . या सर्व घटनांचा काय अर्थ लावायचा ? अर्थव्यवस्था स्थिर आहे असा लावायचा का ? देशातील अर्थव्यवस्थेवरील परदेशी व देशातील बड्या भांडवलदारांची पकड सैल झाली असा लावायचा ? समाजवादी समाजपद्धतीचा हाच पाया काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच द्यावी लागतात . सध्याच्या काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे या परिस्थितीत राष्ट्रीय विकासाकडे लक्ष देऊन बदल घडवून आणण्याची शक्यता आहे काय ? काँग्रेसमध्ये प्रामाणिक , लोकशाहीवादी , पुरोगामी विचारांचे लोक आहेत . त्याची ताकद वाढविल्यास ही शक्यता आहे . असे मत काही ठिकाणी ऐकू येते . पण राज्यपुनर्रचनेच्या प्रश्नावर या प्रामाणिक लोकांचा काँग्रेसमधील सत्तालोलुप , भांडवलशाहीधार्जिण्या गटाने कसा धुव्वा उडविला ते उदाहरण अगदी ताजे आहे . पंचवार्षिक योजनेत भांडवलदारांवर नियंत्रणे असावीत अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना नेहरूनी अमृतसर काँग्रेसमध्ये काय उत्तर दिले आहे हे या सर्व गोष्टींचा एकच अर्थ आहे की , ही धोरणे अमलात आणणारे काँग्रेस सरकार देशातील बड्या भांडवलदारांच्या वर्चस्वाखाली आहे आणि ते तसे राहणार आहे. मग परराष्ट्रीय धोरणातील स्वागतार्ह बदल , इंपीरियल बँक , विमा कंपन्या यांचे राष्ट्रीयीकरण , मूलभूत उद्योगधंदे वाढविण्याचे धोरण , समाजवादी समाजपद्धतीचा काँग्रेसने चालविलेला पुकारा याचा अर्थ काय लावायचा , असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो . भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणात जे स्वागतार्ह बदल झाले आहेत त्याचे प्रथमच पक्षाने स्वागत केले आहे . पण शांततेचा पुकारा करणाऱ्या साम्राज्यवाद्यांपासून अलगता दाखविणाऱ्या परराष्ट्रीय धोरणाचा अर्थ कसा लावायचा ? भारताचे परराष्ट्रीय धोरण वेगवेगळ्या देशांतील मतभेद मिटविण्यासाठी त्रयस्थाची भूमिका घेणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे , हे परराष्ट्रीय धोरणाचे विवेचन करताना प्रथमच सांगितले आहे . साम्राज्यवाद्यांच्या गटापासून भारत सरकार बाजूला येत आहे , हा त्याचा तात्कालिक परिणाम स्वागतार्ह असला तरी याच धोरणामुळे गोव्याच्या प्रश्नात भारत सरकारला काही करता येत नाही , अशी अवस्था निर्माण झाली आहे . हेही सत्य आहे , कार्यशील तटस्थतेचे धोरण भारतास कायमचे हितावह होईल अशी खात्री नाही . तरीसुद्धा जागतिक भांडवलशाही साम्राज्यवाद्यांपासून भारताला बाजूला परराष्ट्रीय धोरण , काँग्रेसवर व सरकारवर आज असलेले देशी बड्या भांडवलदारांचे वर्चस्व या विरोधाभासाची संगती कशी लावायची ? जगातील सर्व भांडवलदार व साम्राज्यवादी श्रमजीवी जनतेची पिळवणूक करण्यासाठी व मागासलेल्या राष्ट्रांची लूट करण्यासाठी आपसात या लुटीची वाटणी करून घेण्याच्या तत्त्वावर एकजूट करतात ; पण त्यांच्यात अंगभूत अंतर्विरोध असतो ; या लेनिनच्या सिद्धांतात ही संगती लागते . जगातील समाजवादी शक्तींची ताकद वाढत आहे . मागासलेल्या देशांवर वर्चस्वाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे . वसाहतींवर व मागासलेल्या देशांवर पूर्वीच्या तंत्राने व लष्करी सत्तेच्या जोरावर वर्चस्व टिकविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे . भांडवलदारी देशांतील अर्थव्यवस्था आर्थिक पेचप्रसंगाच्या भोवऱ्यात सापडत आहे . यामुळे बुडणाऱ्या जहाजावरील आपला जीव वाचविणाऱ्या उतारूसारखी , जगातील भांडवलदारांची व साम्राज्यवाद्यांची परिस्थिती झालेली आहे . साम्राज्यवाद्यांचे प्रमुख राष्ट्र अमेरिका या तर जहाजास पत्रे ठोकून तरते ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे , अगतिक उतारू आपला जीव वाचविण्यासाठी मिळेल ते साधन शोधून पटकविण्याच्या उद्योगात आहे . भारतातील मक्तेदार भांडवलदारांची या उतारूसारखी परिस्थिती आहे . ब्रिटिश भारतातून निघून गेल्यानंतर त्यांची परंपरा पुढे चालविण्याची यांना संधी मिळाली . पण एकंदर जागतिक भांडवलाचीही अगतिक अवस्था झाल्याने भारतातील बड्या भांडवलदारांना आपल्या बचावाचे वेगवेगळे धोरण स्वीकारले पाहिजे . १९४७ नंतरच्या काळात या भांडवलदारांनी अमेरिका व इंग्लंडमधील दोस्तांची वारेमाप स्तुती करण्याचे सत्र चालू केले होते . भारतीय लोकशाहीचे अमेरिका हे एकच आशास्थान असल्याचा बकवा सुरू होता . पण अमेरिकन साम्राज्यवादी यांनी भांडवलदारांच्या उद्योगधंद्यांच्या विकासासाठी मदत करण्याचे नाकारून देशी भांडवलदारांना अमेरिकन पक्का माल विकणारे दलाल एवढीच भूमिका देऊ केली . फक्त लष्करी सुधारणेसाठी मदत करण्याचे धोरण स्वीकारले . त्यामुळे देशी बड्या भांडवलदारांची मोठी कुचंबणा झाली आहे . त्यातून कार्य तटस्थतेच्या धोरणाचा जन्म झाला आहे . त्यामुळे भारताच्या परराष्ट्रीय धोरणास ते उघड विरोध करीत नाहीत . याचा अर्थ देशातील बडे भांडवलदार राष्ट्रीय प्रवृत्तीचे झाले असा होऊ शकत नाही . ते आपल्या बचावाचे धोरण स्वीकारीत आहेत . या धोरणाच्या आधारावर देशातील जनतेची लूट अधिकाधिक करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे . काँग्रेस सरकारचा समाजवाद कसा आहे हे पहिल्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे व दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमुळे स्पष्ट होते . समाजवादाच्या तत्त्वास ( डॉक्टरीन सोशालिझम ) चिकटून न राहता देशातील परिस्थितीवर आधारलेली समाजवादी समाजपद्धती शांततामय अहिंसात्मक मार्गाने निर्माण करावयाची आहे , असा काँग्रेसतर्फे पुकारा करण्यात येतो . काँग्रेसचा हा प्रचार फसवा आहे . समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी दुसऱ्या देशाची नक्कल केली पाहिजे किंवा रक्तमय क्रांती झाली पाहिजे , असा कोणाचा अट्टहास असण्याचे कारण नाही . शांततामय मार्गाने समाजवादी समाजव्यवस्था निर्माण झाली तर ती जनतेला हवीच आहे . तशी यावी अशी जनतेची अपेक्षाही असते . अमक्याच पद्धतीने समाजवाद निर्माण होतो हाही चुकीचा दावा आहे . भांडवलदारी पिळवणूक नाहीशी करून समाजशक्तीच्या विकासाचा मार्ग खुला करणे व समाजाची सर्वांगीण उन्नती करणे हे समाजवादी समाजव्यवस्थेचे सूत्र स्वीकार केला नाही . उलट भांडवलशाहीचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने प्रथमपासून आजतागायत केला आहे . भांडवलदारांचे हित म्हणजेच राष्ट्रहित असे समीकरण मानणारी काँग्रेस व त्यांचे सरकार समाजवादी समाजपद्धतीची निर्मिती करू शकेल असा पोकळ विश्वास बाळगणे व्यर्थ आहे .
देशापुढील मुख्य समस्या व लोकशाही चळवळीची दिशा
आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून , भारतात स्वतंत्र व स्थिर अर्थव्यवस्था , राष्ट्रविकासाचा पाया घालणारे औद्योगिकीकरण , शेती व्यवसायातील मूलभूत सुधारणा , सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आखणे या गोष्टी घडवून आणण्याच्या कार्यात काँग्रेस सरकार अयशस्वी झाले आहे हे स्पष्ट झाले आहे . भारतातील अर्थव्यवस्था परकीय भांडवलाच्या वर्चस्वाखालून मुक्त करणे , देशात जलद औद्योगिकीकरण करणे , बेकारी नाहीशी करणे , शेती अर्थव्यवस्थेची घडी बसविणे व एकंदर समाजास उत्कर्षाप्रत नेणे , या देशापुढील समस्या आहेत . देशातील बड्या भांडवलदारांचे वर्चस्व असलेले काँग्रेस सरकार या गोष्टी करू शकत नाही . कारण बड्या भांडवलदारांच्या वर्चस्वास धक्का देण्याचे कार्य काँग्रेस सरकारला करता येणे कठीण आहे . भारतातील उद्योगधंद्यांचे राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने नियंत्रण करणे व ती सर्व ताकद राष्ट्रविकासाच्या कामासाठी वापरणे आवश्यक आहे . भारतातील जुन्या सरंजामी पद्धतीची शेती अर्थव्यवस्था बदलून सहकारी शेती पद्धतीची शेती व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे . भांडवलदारांच्या प्रचंड नफ्यामुळे देशातील उत्पादन ताकद भांडवलशाहीच्या भोवऱ्यात अडकून पडली आहे . ती मुक्त करून देशात वाया जाणाऱ्या श्रमशक्तीला कामाला लावण्याच्या दृष्टीने जनतेस काम मिळण्याची विपुल संधी निर्माण करणे व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुखी करणे आवश्यक आहे . भारत हा मागासलेल्या अर्थव्यवस्थेचा देश आहे . देशातील ६९ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे . रेल्वे , विमानवाहतूक व काही मूलभूत उद्योगधंद्यांच्या कारखान्यांवर सरकारची मालकी प्रस्थापित झाली असली तरी औद्योगिक क्षेत्रात बडे भांडवलदार व त्यांचे परकीय भागीदार यांचे वर्चस्व आहे . आजच्या काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली चाललेल्या राज्ययंत्रणेवर बडे भांडवलदार , सरंजामदार , जमीनदार यांचे वर्चस्व आहे . काँग्रेसने समाजवादी समाजपद्धतीचा पुरस्कार केला आहे . भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली समाजवादाच्या दिशेने काँग्रेस सरकार वाटचाल करू शकणार नाही ही गोष्ट गेल्या आठ वर्षाच्या अनुभवाने स्पष्ट झाली आहे . देशातील उत्पादनशक्तीच्या मार्गात बडे भांडवलदार , सरंजामदार , जमीनदार यांचा अडथळा आहे . हा अडथळा निग्रहाने दूर केल्याशिवाय समाजवादाच्या दिशेने पाऊल उचलणे अशक्य आहे . काँग्रेस समाजवादाच्या रोखाने जाऊ शकणार नाही किंवा काँग्रेसचा मार्ग यशस्वी होणार नाही , हे फक्त नकारार्थी सांगून भागणार नाही तर समाजवादाची दिशा निश्चितपणे भारतीय जनतेस सांगण्याची आज आवश्यकता आहे . भारतातील शेतीव्यवसायाची पुनर्घटना करून औद्योगिकीकरणाचा पाया घालणे व उत्पादनसाधनांची सामुदायिक मालकी प्रस्थापित करणे ही समाजवादाची घोषणा आहे . पण ही घोषणा समाजाला सांगून अर्थबोध नीट होणार नाही तर या दिशेने वाटचाल करणे म्हणजे प्रत्यक्ष काय केले पाहिजे हे स्पष्ट केले पाहिजे .
शेती व्यवसाय
भारतातील शेतीव्यवसाय फक्त मागासलेला आहे , इतकेच नव्हे , तर ही शेतीव्यवस्था सरंजामी हितसंबंधांवर आधारली आहे . राबणाऱ्या शेतकरी व शेतमजूर जनतेच्या राबणुकीवर सरंजामदार , जमीनदार हे रक्तशोषक जगत आहेत . हे रक्तशोषण थांबले पाहिजे , तरच शेतीव्यवसायात राबणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची खरी श्रमशक्ती पिळवणुकीपासून मुक्त होईल व शेतीच्या उत्पादनसामर्थ्याचा विकास करणे शक्य होईल . सरकार व प्रत्यक्ष कसणारा शेतकरी यामधील सर्व मालकीहक्क नुकसानभरपाई देऊन नाहीसे करणे , शेतजमीनधारणेची कमाल मर्यादा घालणे , खंडकरी शेतकऱ्यास कुळाचे हक्क सुरक्षित करणे , खंडाचे प्रमाण करणे , पुढील दहा वर्षांत सहकारी शेतीव्यवस्था निर्माण करणे , ही दिशा आखली आहे . ही योजना वरवर पाहताना मोहक दिसते . या योजनेचा जो तपशील आहे तो पाहिल्यास कुळांची हकालपट्टी , शेतीव्यवसायाशी संबंध नसलेल्या जमीनदारवर्गाचा शेतीव्यवसायात प्रवेश , लहान व गरीब शेतकऱ्यांचे उच्चाटन या मार्गाने भांडवलदारांना अनुकूल अशी श्रीमंत शेतकरी थराचे वर्चस्व असलेल्या शेतीव्यवसायाची घडी बसणे सोपे होणार आहे आणि एवढे झाल्यानंतर सहकारी शेतीची योजना याचा अर्थ अशा श्रीमंत शेतकऱ्यांची सहकारी शेती असा होणार आहे . ग्रामीण भागात बेकार शेतमजुरांचा आधीच ३० % असलेला विभाग अधिक मोठा होणार आहे . शेतीसुधारणेच्या प्रश्नावर बड़े भांडवलदार , सरंजामदार व जमीनदार यांच्यात संघर्ष आहे . या संघर्षाचे स्वरूप मध्यवर्ती सरकार व राज्य सरकार यांच्यातील शेतीसुधारणेबाबतच्या संघर्षात दिसून येते . सरंजामी हितसंबंधाची जपणूक करणारी शक्ती मूलत : कमकुवत असल्यामुळे बड्या भांडवलदारांशी ती मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न करीत आहे . याउलट सरंजामी हितसंबंध निकालात काढताना श्रमजीवी जनतेची - गरीब शेतकरी , शेतमजूर - यांची ताकद वाढू नये यासाठी बडे भांडवलदार या सरंजामी हितसंबंधांच्या पाठीराख्यांना चुचकारून आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यातूनच जमीनदारांना नुकसानभरपाई , स्वतः कसण्यासाठी जमीन मागण्याची सवलत , शेतीसुधारणा कायद्यातील पळवाटा , शेती सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करण्याची बडे शेतकऱ्यांचे हित जपणारी यंत्रणा नसणे या सवलती जमिनदारांना देण्यात आल्या आहेत . या कक्षेत राहूनच शेती सुधारणा कायदे केले जात आहेत . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची दिशाही तीच आहे. समाजवादी शेतीचा पाया घालावयाचा असेल तर शेतीव्यवसायातील सरंजामी संबंध तर निकालात काढलेच पाहिजेत ; पण शेतीव्यवसायात श्रीमंत शेतकऱ्यांचा विभाग वाढविणे , या मार्गाने भांडवलदारी हितसंबंध निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे . तरच प्रत्यक्ष शेतकरी व सरकार यांच्यामधील मालकी संबंध नाहीसे करून कसणाऱ्याची जमिनीवर मालकी प्रस्थापित झाल्याबरोबर सहकारी शेतीव्यवस्थेचा पाया घालणे सोपे होणार आहे याहून श्रीमंत शेतकऱ्यांचा विभाग हा सहकारी शेती योजनांचा मोठा विरोधक व अडथळा ठरणार आहे . गेल्या पाच वर्षात सहकारी शेतीचे जे प्रयोग करण्यात आले त्यापैकी बहुसंख्य अयशस्वी झाले , त्याचे मुख्य कारण हेच आहे हे सिद्ध झाले आहे . जमीनदारी नाहीशी झाल्यानंतर सहकारी शेतीच्या उद्योगास लागण्याची शिफारस नियोजन मंडळाने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत केली आहे , या यांत्रिक पद्धतीने सहकारी शेतीचा प्रयोग यशस्वी होणार नाही . गेल्या २५ वर्षांतील सहकारी चळवळीच्या अनुभवामुळे भारतीय शेतकरी चळवळीविषयी उदासीन झाला आहे . सहकारी जीवन हे यांच्या हिताचे आहे , जीवनमान सुधारणारे आहे , उत्पादनवाढ करणारे आहे , उत्पादनशक्ती वाढविणारे आहे , हे पटावयाचे असेल तर सहकारी यंत्रणेवरील जमीनदार , व्यापारी , दलाल , सावकार व श्रीमंत शेतकरी यांचे वर्चस्व कमी करून गरीब शेतकरी व शेतमजूर यांचे वर्चस्व प्रस्थापित केले पाहिजे . या सूत्राच्या साहाय्याने सहकारी चळवळ तीव्र करून टप्प्याटप्प्यानी पूर्ण करावी लागेल . सहकारी शेतीचे पंचवार्षिक योजनेत दिलेले तीन मार्ग- ( १ ) जमिनीची सहकारी मालकी ( २ ) जमीन कसण्याची सहकारी व्यवस्था ( ३ ) सहकारी यंत्रणेकडे जमीन भागीदारीच्या स्वरूपात देणे- सुचविले आहेत . ही सहकारी शेतीची योजना यांत्रिक आहे . इतकेच नव्हे , तर ग्रामीण समाजास व विशेषत : जमिनीचे पिढीजात आकर्षण असलेल्या शेतकरी समाजास सबंध सहकारी शेतीयोजनेविषयी उदासीन करणारी आहे . या योजनेत शेतकरी स्वेच्छेने , उत्साहाने , तळमळीने भाग घेऊ शकणार नाही . त्यासाठी जमीन कसणे , भांडवल पुरवठा , शेतीमालाची विक्री असे शेतीव्यवसायाच्या कार्यक्षेत्रातील विभाग वेगळे घेऊन सहकारी जीवनाची सुरुवात करणे व क्रमाक्रमाने या तिन्ही विभागांचे एकसूत्रीकरण ( Consolidation ) करणे हा मार्ग सहकारी चळवळीचा , सहकारी शेतीचा व राष्ट्रीय विकासाचा मार्ग ठरणार आहे . प्रत्यक्ष कसत असलेल्या लहान व गरीब शेतकऱ्यांचे लहान लहान गट करून सहकार्याने शेती करणे आणि त्यासाठी सर्व मदत करणे हा मार्ग प्रथम स्वीकारावा लागेल. वरील पद्धतीने शेतीव्यवसायाच्या विकासाच्या मार्गातील सरंजामी हितसंबंधांचा अडथळा निकालात निघेल व भांडवलदार हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता कमी होईल . पण त्याचबरोबर जमीन व तेथे राबणारा शेतकरी यांची उत्पादनक्षमता वाढविणे ही सर्वांचे एकमत आहे . पण अंमलबजावणीबाबत दुसरी महत्त्वाची बाजू आहे . या प्रश्नावर घोषणेत काँग्रेसच्या योजनेत अनेक दोष आहेत . जमिनीची सुधारणा , पाणीपुरवठा , बी व खते , अवजारे यांचा पुरवठा , भांडवल साहाय्य , शेतीमालाला योग्य किंमत या गोष्टी झाल्या पाहिजेत , अशी सर्वांची भूमिका आहे . नियोजन मंडळानेही या भूमिकेस कमीअधिक पाठिंबा दिला आहे . पण या योजनेची अंमलबजावणी मात्र नोकरशाही पद्धतीची आहे . कारण या योजनेची सर्व अंमलबजावणी कम्युनिटी प्रोजेक्ट यंत्रणेवर सोपविली आहे . ही यंत्रणा जनतेस सहकार्य , उत्साह निर्माण करू शकत नाही हा अनुभव आहे . *शेतीधंद्याला लागणाऱ्या सर्व भांडवलाची सरकारने सहकारी योजनेमार्फत स्वीकारली शेतीधंद्याला लागणाऱ्या सर्व भांडवलाची जिम्मेदारी सरकारने सहकारी योजनेमार्फत पाहिजे . त्याच्याबरोबर शेतीमालाच्या खरेदी - विक्रीचीही जबाबदारी याच पद्धतीने सरकारने घेणे अवश्य आहे . या दोन्ही बाजूंची जबाबदारी जर घेतली तर शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न सोडविणे सोपे होणार आहे . ग्रामीण जनतेची क्रयशक्ती वाढणार आहे . औद्योगिकीकरणाची गती वाढविण्यासाठी कच्चा माल पुरविणे व पुरेसे गिहाईक मिळणे या दोन्ही गोष्टी साधणार आहेत .* शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न- बिगरशेती व्यवसायातील गिहाईकांना ( कामगार , मध्यमवर्ग ) अन्नधान्य महाग घ्यावे लागेल व कच्चा माल महाग होईल व पर्यायाने सर्व जनतेवर वाढती महागाई लादली जाईल , असा युक्तिवाद हितसंबंधी लोकांकडून येतो . त्याप्रमाणे शेती उत्पादन खरेदी करून ठेवणे कठीण आहे , असा युक्तिवाद पुढे येतो . या दोनही भूमिका चुकीच्या आहेत . शेतीमालाला योग्य किंमत याचा अर्थ शेतीमालाचा उत्पादनखर्च व शेतकऱ्याचे किमान जीवनमान विचारांत घेऊन शेतीमालाच्या किमती ठरविणे असा आहे . पाणीपुरवठा , अवजारे , खते , बी व इतर भांडवलाचा पुरवठा स्वस्तात व सरकारी तत्त्वावर करून शेतीमालाचा उत्पादनखर्च कमी करणे शक्य असते . प्रथमावस्थेत या उत्पादनखर्चाचा काही भाग मदत स्वरूपात दिल्यास किमान किमती ठरविणे शक्य आहे . शेतीमालाच्या किमतीच्या स्थिरतेमुळे उत्पादनवाढीला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया स्थिर करता येईल . शेतीसुधारणेची कोणतीही योजना यांत्रिक व नोकरशाही पद्धतीने यशस्वी होणार नाही . त्या योजनेस समग्र शेतकऱ्यांचा सक्रिय पाठिंबा असावा लागतो . विकास योजना अगर लोकसाहाय्यक सेना या संघटनांमार्फत हे काम होणार नाही . प्रत्यक्ष शेतीजीवनाशी खऱ्या अर्थाने निगडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांना या भूमिकेवर सहभागी करून घेतले पाहिजे .
औद्योगिकीकरण
भारतात उद्योगधंद्यांची वाढ झाली नाही . देशाचे प्रचंड प्रमाणावर औद्योगिकीकरण होण्याची आवश्यकता आहे . हे सर्वमान्य आहे . भारतातील उद्योगधंद्यांचे स्वरूप संमिश्र आहे . रेल्वे , विमानवाहतूक , अणुउत्पादन वगैरे धंद्यांवर सरकारची पूर्ण मालकी व मक्तेदारी प्रस्थापित झाली आहे . लोखंड , पोलाद , सिमेंट , मोटार , खाणी , खते वगैरे धंदे खाजगी उद्योगपतींच्या मालकीचे व मक्तेदारीचे आहेत . सरकारने हे उद्योगधंदे १९४८ व १९५६ च्या औद्योगिक धोरणविषयक ठरावाने सरकारी विभागासाठी राखून ठेवले आहेत व इतर उपभोग्य वस्तूंचे उद्योगधंदे जवळजवळ पूर्णांशाने खाजगी मालकी व मक्तेदारांच्या ताब्यात आहेत . याशिवाय इतर अनेक लहान उद्योगधंदे आहेत . सरकारने सहकारी पद्धतीवर कारखाने निघावेत म्हणून प्रयत्न चालविले आहेत . साखर धंद्यात अशा काही प्रयोगांना मूर्त स्वरूप आले आहे . राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काही कारखाने आहेत . या क्षेत्रात समाजवादाच्या दिशेने वाटचाल करणे याचा अर्थ औद्योगिक क्षेत्रात खाजगी मालकी व मक्तेदारी विरुद्ध सामायिक व मोठ्या प्रमाणावरील उत्पादन हा संघर्ष आहे . प्रचंड औद्योगिकीकरणाच्या मार्गात खाजगी मालकी व मक्तेदारी ही मोठी धोंड आहे . भांडवली व मक्तेदारी मालकीचा पाया ' नफा हा आहे . याउलट राष्ट्राचे सामुदायिक हित व उत्पादनात वाढ हे समाजवादी औद्योगिकीकरणाचे उद्देश आहेत . भारतातील औद्योगिक क्षेत्रात देशातील मक्तेदार व त्यांचे परकीय साथीदार यांचे वर्चस्व आहे . परकीय भांडवलाच्या वाढत्या वर्चस्वामुळे ' इण्डिया लिमिटेड ' छापाचे पण परकीय भांडवलाचा , अधिकाराचा ( management ) प्रभाव असलेले कारखाने निघत आहेत . भारतीय उद्योगपतींनाही औद्योगिकीकरणाचा विकास व्हावा हे मान्य आहे . पण त्याचबरोबर त्यांना सरकारी नियंत्रण अगर राष्ट्रीय विकासाच्या गरजा लक्षात घेणारे नियोजन नको आहे . काँग्रेसने देशाचे औद्योगिकीकरण जलद व्हावे म्हणून प्रयत्न चालविले आहेत . सरकारी व खाजगी मालकी विभाग असे उद्योगधंद्यांचे दोन भाग करून मूलभूत उद्योगधंद्यांचे क्षेत्र सरकारने स्वत : साठी राखून ठेवले आहे . खाजगी मालकीसाठी त्यांनी जे क्षेत्र सोडले आहे त्यात त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे . उत्तेजनाची तरतूद आहे . पण त्याचबरोबर करपद्धती , चलनी मार्ग , व्यापारविषयक धोरण या मार्गाने नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा मानस आहे . राज्ययंत्रणेवर देशातील बडे भांडवलदार यांचे जे वर्चस्व आहे त्यामुळे हे सरकारी मार्ग हितकारक ठरतील अशा त - हेने राबविण्याची कारस्थाने करणे त्यांना शक्य आहे . क्रांतिकारक मार्गाने सर्व मूलभूत उद्योगधंद्यांवर सामुदायिक मालकी प्रस्थापित करण्याचा मार्ग स्वीकारलाच पाहिजे अशी आजची गरज नाही .राज्ययंत्रणेवर जनतेची खरीखुरी लोकशाही सत्ता प्रस्थापित झाल्यास शांततामय मार्गाने समाजवादी पाया औद्योगिकीकरण साधणे शक्य आहे . औद्योगिक क्षेत्रात मक्तेदारी व खाजगी भांडवलाचा प्रभाव औद्योगिकीकरण अशक्य आहे . त्यासाठी या क्षेत्रातील मक्तेदारीचे उच्चाटन करणे व सामुदायिक मालकी प्रस्थापित करणे हे पहिले कर्तव्य आहे . या मक्तेदारीवर नियंत्रण ठेवण्याचे सरकारचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत हे नियोजन मंडळाने कबूल केले आहे . देशात समाजवादी औद्योगिकीकरणाचा पाया घालावयाचा असेल तर औद्योगिक क्षेत्रातील मक्तेदारी भांडवलदारीचा अर्थव्यवस्थेवर वाढत राहिलेला वरचष्मा एकदम मर्यादित केला पाहिजे व मूलभूत उद्योगधंदे उभारणीच्या कामास वेगाने लागले पाहिजे . खाजगी उद्योगपतींना पोषक असा सरकारी उद्योगधंद्यांचा विभाग सुरू करून व खाजगी उद्योगपतींना त्यांच्या क्षेत्रात पूर्ण स्वातंत्र्य , संरक्षण व शाश्वती देऊन औद्योगिकीकरणाचा वेग , आकार वाढविणे अशक्य आहे . मूलभूत उद्योगधंद्यांत सरकारी कारखान्यांचे वर्चस्व प्रस्थापित करणे व मक्तेदारीच्या वर्चस्वाला कडक आळा घालणे हे पहिले कर्तव्य आहे . हे करीत असताना खाजगी मक्तेदारीचे मूलभूत उद्योगधंदे यावर सरकार व उद्योगधंद्यातील भागीदार यांचा संयुक्त कारभार प्रस्थापित करणे आवश्यक आहे . या मार्गाने मूलभूत उद्योगधंद्यांवर सरकारी मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे . मूलभूत उद्योगधंद्यांच्या विकासाला प्रथम स्थान दिले पाहिजे त्याचबरोबर मूलभूत उद्योगधंदे व इतर उपभोग्य वस्तूंचे कारखाने यांचा तोल सांभाळला पाहिजे व एकसूत्रीकरण केले पाहिजे . मूलभूत उद्योगधंद्यांच्या कारखान्यांतून निर्माण होणारी यंत्रसामुग्री पूर्णपणे पुरविण्याची योजनाबद्ध व्यवस्था झाली पाहिजे . अशी व्यवस्था न झाल्यामुळे डिझेल इंजिन्स , पंप्सचे उत्पादन कमी करणे भाग पडले आहे , असा अनुभव आहे . हा अनुभव समाजवादी पद्धतीच्या नियोजनात येता कामा नये . मूलभूत व जड धंदे , उपभोग्य वस्तूंचे मोठे कारखाने व लहान उद्योगधंदे असे औद्योगिक क्षेत्रातील विभाग आहेत . यापैकी पहिल्या भागावर पूर्णत : सरकारी मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणे ही पहिली व तातडीची गरज आहे . दुसऱ्या विभागात खाजगी भांडवलाला वाव देत असताना मूलभूत उद्योगधंद्यांना पोषक अशी उत्पादन व्यवस्था निर्माण केली पाहिजे . लहान उद्योगधंदे सरकारी पद्धतीवर निघतील व स्थानिक कच्चा माल वापरणे व स्थानिक गरजा भागविणे हे त्यांचे क्षेत्र राहील . औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागांचे कार्यक्षेत्र ढोबळमानाने निश्चित करून त्यांचे एकसूत्रीकरण करणे हा समाजवादी औद्योगिकीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे . औद्योगिकीकरणाच्या कार्यक्रमात कारखान्यांतून काम करणाऱ्या कामगारांना कारभारात भाग घेता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे . कामगारांना ही जबाबदारी पार पाडण्यास बौद्धिक व संघटितरीत्या समर्थ करणे ही आवश्यक गोष्ट आहे . समाजवादी औद्योगिकीकरणाचा पाया घालण्याची जबाबदारी कामगार विभागाने उचलण्याची भाषा ' उत्पादन वाढवा ' या घोषणांनी यशस्वी होणार नाही . तर तशी प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण केली पाहिजे . कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील शिक्षण देऊन तज्ज्ञ करणे व त्यांच्या संघटनेचे सामर्थ्य वाढविणे हा समाजवादाचा पाया आहे . भारतात औद्योगिकीकरणाच्या प्रचंड कार्यक्रमासाठी भांडवलाचा तुटवडा आहे अशी फार मोठी तक्रार आहे . आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर वाढते कर , परकीय मदत व कर्जे हाच भांडवल मिळविण्याचा मार्ग आहे असे सांगण्यात येते . हा दृष्टिकोन पूर्णत : भांडवली आहे . यात समाजवादी दृष्टिकोनाचा मागमूसही नाही . भांडवलनिर्मितीसाठी परकीय मदत किंवा कर्जे घेऊ नयेत असा त्याचा अर्थ नाही . पण एकतर ही मदत परस्पर सहकार्य या तत्त्वावर आधारली पाहिजे व दुसरे मुख्यतः भांडवल निर्मितीसाठी राष्ट्रीय संपत्तीवरच अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे . राष्ट्रीय संपत्तीचा फार मोठा भाग नफ्याच्या स्वरूपात उद्योगपतींच्या खिशात जातो . हा नफा राष्ट्रीय औद्योगिकीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वापरणे हा खरा महत्त्वाचा मार्ग आहे . यासाठी देशातील भांडवलाचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँका संस्थांवर सरकारी कारभारविषयक मालकी प्रस्थापित केली पाहिजे . खाजगी उद्योगपती , बँकांतील भागीदार यांनी गुंतविलेल्या भांडवलावर मर्यादित नफा , किमान व्याजाच्या तत्त्वावर देऊन राहिलेला सर्व भाग औद्योगिकीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरणे शक्य आहे . राष्ट्रीय औद्योगिकीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आजची यंत्रणा पूर्णपणे निरुपयोगी आहे . नोकरशाही व यांत्रिक पद्धतीने हे कार्य यशस्वी होणार नाही . उद्योगधंद्यांच्या सर्व अंगांचा बारकाईने अभ्यास करणारे , राष्ट्रीय हिताचा विचार करणारे व त्याबरोबरच कामगारांच्या प्रचंड शक्तीला उत्तेजन देऊन सहकार साधणारी यंत्रणा , कामगारांचे लोकशाही नियंत्रण असलेला कारभार या गोष्टी निर्माण करणे ही औद्योगिकीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्याची दुसरी बाजू आहे . शेतीव्यवसायातील सरंजामी व भांडवली हितसंबंध निकालात काढून सहकारी शेतीचा पाया घालणे , जमीनसुधारणा व शेतीधंद्याचे वाढते .औद्योगिकीकरण व मूलभूत उद्योगधंद्यात सामुदायिक मालकी प्रस्थापित करून औद्योगिक विकासाचा सुसूत्र कार्यक्रम आखणे म्हणजे समाजवादी समाजपद्धतीचा पाया घालणे होय . मक्तेदार , भांडवलदार , जमीनदार , सरंजामदार यांचे वर्चस्व असणारी काँग्रेस या दिशेने जाऊ शकणार नाही . शेतीव्यवसायातील सरंजामी हितसंबंध वरवर नाहीसे होऊन त्यांची जागा भांडवली हितसंबंध घेतील . उद्योगधंद्यांचा आकार वाढेल ; पण राष्ट्रीय गरजेचा त्यात विचार न होता भांडवली हितसंबंधाचे वर्चस्व राहील . आजची राज्ययंत्रणा , पिळणाऱ्या वर्गाचे हित साधणे व त्याचे स्थान बळकट करणे हेच काम करीत आहे . सत्तेचे केंद्रीकरण करून नोकरशाहीचा राज्यकारभार निर्माण करण्यात आला आहे . लोकमताचा या यंत्रणेवर प्रभाव पडणे कठीण झाले आहे . वैधानिक लोकशाहीचा वापर प्रामुख्याने श्रीमंत वर्गाच्या सोयी साधण्यात करण्यात येत आहे . निवडणूक कायदे त्याच पद्धतीने करून जनतेच्या एकजुटीचा प्रयत्न सर्व साधनांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे . देशातील बड्या भांडवलदारांचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत . जनतेचे प्रभावी मत प्रत्यक्ष व्यवहारात पडू शकेल अशी शासनसंस्था निर्माण केली पाहिजे . हे महान कार्य कोण करणार ? जनतेच्या हाती खरीखुरी सत्ता आल्याशिवाय हे कार्य होणे अशक्य आहे . लोकमताचा प्रचंड पाठिंबा असलेले , जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे , समाजवाद , शांतता या धोरणाची कास धरणारे जनतेचे खरेखुरे लोकशाही सरकारच देशाला महान अडचणीतून सोडविण्याचा मार्ग आखू शकले . शासनसंस्थेचा जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी वापर करण्याचे कार्य अशाच सरकारला शक्य आहे . नजीकच्या भावी काळातील देशापुढील ही मुख्य समस्या आहे . पण ताबडतोबीने ही गोष्ट घडणे शक्य आहे . कार त्यासाठी जी पूर्ण तयारी होणे आवश्यक आहे ती झाली आहे काय ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आज नकारार्थीच द्यावी लागतात . जनतेचे लोकशाही सरकार निर्माण करण्याची शक्यता निर्माण होण्यासाठी जनतेचा विश्वास व प्रचंड पाठिंबा संघटित करून , जनतेची लढाऊ एकजूट उभारून जनतेचे निर्णायक प्रतिनिधित्व करणारा पक्ष असण्याची आवश्यकता आहे .. भांडवलदारांचे व त्यांचे वर्चस्व असलेल्या राज्ययंत्रणेचे जनतेच्या जीवनावर जे दैनंदिन हल्ले होतात ते परतवून लावण्याची त्या पक्षात ताकद व प्रभावी नेतृत्व हवे . या गोष्टी असल्यास वैधानिक लोकशाहीच्या रिंगणातसुद्धा बड्या भांडवलदारांचा पराभव करणे शक्य आहे . जागतिक भांडवलशाहीचा व साम्राज्यशाहीचा डोलारा डळमळीत होत चालला आहे . त्यामुळे भारतातील भांडवलशाहीचा जागतिक आधार लुळा पडत चालला आहे . जनतेच्या प्रचंड एकजुटीच्या जोरावर भांडवलशाहीवर मात करणे शक्य आहे . भारतातील भांडवलशाहीचा करण्यासाठी वर सांगितलेली परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी जनतेचे हित साधू शकणारे , देशात समाजवाद व समृद्धी आणू इच्छिणारे लढाऊ पराभव पक्ष यांनी संयुक्त रीत्या स्वीकारली पाहिजे . खंबीर विरोधी संयुक्त आघाडी उभारली पाहिजे . ही आजची निकडीची गरज आहे . देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ताकदीकडे बोट दाखवून निराशेचा सूर काढणारे लोक देशात नाहीत असे नाही . उलट काँग्रेसचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी व स्वत : ला पुरोगामी म्हणवणाऱ्यांपैकी काही लोकांचे हेच म्हणणे आहे की , देशात जनतेचे प्रभावी नेतृत्व स्वीकारून काँग्रेसची जागा घेणारा दुसरा पक्ष नसल्यामुळे व ताबडतोबीने असा पक्ष ताकदवान होण्याची शक्यता कमी असल्याने काँग्रेसने काही स्वागतार्ह पवित्र टाकले आहेत . काँग्रेसमध्ये लोकशाहीवादी , समाजवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणारे प्रामाणिक लोक आहेत . त्यांना पाठिंबा देऊन त्यांची ताकद वाढविण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा व काँग्रेसच लढाऊ करावी . देशात समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करावी . हेच विचार जनतेपुढे मांडण्याचा हली प्रयत्न केला जात आहे . ही विचारसरणी म्हणजे राजकीय बुद्धिवाद्यांचे ज्वलंत उदाहरण आहे . काँग्रेसमध्ये पुरोगामी विचारांचे लोक नाहीत असा त्याचा अर्थ नव्हे . पण त्यांची ताकद भांडवलदारांच्या राजकीय पक्षाच्या चौकटीत वाढणे अशक्य आहे . गटारात गंगा नेऊन सोडण्याचा हा प्रयत्न आहे . आज काँग्रेसखेरीज समाजवादाचा या ना त्या स्वरूपात पुरस्कार करणारे अनेक पक्ष आहेत . त्यांच्या कामाची व्याप्ती , ताकद सर्व देशभर पसरली नाही ही गोष्ट सत्य आहे . त्या राजकीय पक्षांत वैचारिक एकवाक्यता नाही हीही गोष्ट खरी आहे . पण जनतेच्या चळवळीत प्रत्यक्ष आघाडीवर असणाऱ्या पक्षांत ही वैचारिक एकवाक्यता व खंबीर एकजूट निर्माण होणे शक्य आहे . जनतेच्या मनात समाजवादाचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे . भांडवलदारी विचारसरणीचे उघडपणे प्रतिपादन करण्याची काँग्रेसची किंवा कोणत्याही प्रतिगामी पक्षाची ताकद राहिली नाही . एकजुटीची भावना पूर्वीपेक्षा आज मोठ्या प्रमाणात बळावत आहे . दुसरीही गोष्ट तितकीच सत्य आहे की , गेल्या पाच वर्षांत कामगार , शेतकरी , मध्यमवर्ग आदी सर्वसामान्य जनतेने , काँग्रेस सरकारच्या , भांडवलदारांच्या , जमीनदारांच्या लोकशाहीविरोधी धोरणांना निकराने विरोध केला आहे . गेल्या पाच वर्षांत भाषिक राज्याच्या चळवळीची तीव्रता वाढली आहे . इतकेच नव्हे , तर या चळवळीपुढे काँग्रेस सरकारला माघार घ्यावी लागली आहे . आंध्र निर्मितीनंतर देशातील बहुसंख्य राज्ये भाषिक तत्त्वावर निर्माण करणे काँग्रेसला भाग पडले आहे . राज्यप्रमुख नाहीसे झाले आहेत . जनतेच्या एकजुटीचा व चळवळीचा हा प्रचंड विजय आहे . या सर्व घटनांचा विचार केल्यास देशातील जनतेची लढाऊ ताकद उभारून खंबीर काँग्रेसविरोधी लोकशाही आघाडी निर्माण करणे शक्य आहे . हा प्रयत्न यशस्वी करण्याची जबाबदारी मार्क्सवाद लेनिनवादावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांनी संयुक्तपणे स्वीकारली पाहिजे .
वेगवेगळ्या वर्गाचे स्वरूप व परस्परसंबंध
लोकशाही चळवळीतील आपल्या धोरणांची अंमलबजावणी करताना समाजातील वेगवेगळे वर्ग व थर यांच्या स्वरूपाविषयी व त्यांच्या परस्परसंबंधांविषयी बारकाईने विचार केला पाहिजे . त्या परस्परसंबंधांचा विचार करूनच लोकशाही चळवळीचे पवित्रे टाकले पाहिजेत. कामगार , ग्रामीण मजूर , गरीब व मध्यम शेतकरी , श्रीमंत शेतकरी , जमीनदार , मध्यमवर्ग , छोटे कारखानदार व बडे मक्तेदार , भांडवलदार आणि कारखानदार अशी या थरांची सर्वसाधारण रूपरेषा आहे .
कामगार
भारतातील औद्योगिक कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . त्याचप्रमाणे त्यांचे स्वरूपातही बदल होत चालला आहे . गेल्या चाळीस वर्षांत एक पाय खेड्यात व एक पाय कारखान्यात असे देशातील कामगारवर्गाच्या मोठ्या विभागाचे स्वरूप होते . पण ग्रामीण अर्थव्यवस्था जास्तीत जास्त उद्ध्वस्त होत चालल्याने कामगारांचे खेड्याकडील आकर्षण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे . विशेषत : मोठ्या औद्योगिक केंद्रातील कामगारांच्या स्वरूपातील बदल उल्लेखनीय आहे . शेतीव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात भर घालणे व तोंडमिळवणी करणे कामगारांना शक्य होते . कारण शहरी जीवन हेच जीवनाचे कार्यक्षेत्र अशी अवस्था इतके दिवस नव्हती . पण गरीब शेतकऱ्यांना व शेतमजुरांना ग्रामीण विभागात काम मिळणेच कठीण होत चालल्यामुळे याच थरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या कामगारांना शहरी जीवन हेच उपजीविकेचे साधन झाले आहे . त्यामुळे ते जीवन स्थिर करण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे महत्त्वाचा आहे . या सर्व परिस्थितीमुळे कामगारांना संघटनेची , एकजुटीची जाणीव जास्त प्रमाणात होत आहे . ट्रेड युनियन संघटना हे त्यांच्या जीवनाचे हत्यार म्हणून कामगार या संघटनेकडे पाहू लागला आहे . कामगार संघटनांतील फूट नाहीशी करण्यासाठी कामगारांचा वाढता पाठिंबा मिळाला आहे. कामगारांच्या पिळवणुकीच्या तंत्रास सरकारने कायदेशीर स्वरूप दिले आहे . कामगारांचा संपाचा हक्क दिवसेंदिवस अधिक प्रमाणात हिरावून घेतला जात आहे . कामगारांना कंटाळवाण्या कोर्टबाजीच्या तंत्रातून सक्तीने जावे लागत आहे . कामगारांच्या प्रतिनिधींच्या बाबत कामगारांची गळचेपी केली जात आहे . कामगारांच्या लढाऊ संघटनांना कायदेशीर प्रतिनिधित्व मिळू न देण्याबाबत अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत . कामवाढ लादून अधिक उत्पादन करा , हा लकडा सतत कामगारांच्या मागे लावला जात आहे ; पण कामगारांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न मालक अगर सरकार यांच्याकडून होत नाही . कामगारांच्या राजकीय जागृतीची पातळी वाढली आहे , हे वेगवेगळ्या राजकीय चळवळीत गेल्या पाच वर्षांत कामगार मोठ्या संख्येने उतरला यावरून दिसून येते . पण असे दिसूनही कामगारांचे प्रतिनिधित्व कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारी इन्टक करते आहे . कामगारांच्या लढाऊ संघटनांना खच्ची करण्याचे मालक व सरकार यांचे प्रयत्न सतत चालू असतात . या लढाऊ संघटनांना कामगारांचे कायदेशीर प्रतिनिधित्व मिळू नये व इंटकलाच ही संधी मिळावी म्हणून मालक व सरकार यांचे प्रयत्न चालू असतात . त्यामुळे कोर्टबाजीच्या दैनंदिन प्रश्नासाठी नाइलाजाने इंटकचे पुढारीपण पत्करावे लागत आहे . इंटकचे कामगारवर्गाचे प्रतिनिधित्व काढून घेण्यासाठी लढाऊ कामगार संघटनांनी आपल्या कामाच्या तंत्रात बदल करण्याची आवश्यकता आहे . कामगाराना सध्याच्या कामगार संबंध कायद्याखाली कामगारांना ज्या सवलती मिळतात त्या मिळविण्याचा प्रयत्न या संघटनांनी केला पाहिजे . त्यासाठी कोर्टबाजी ही काही प्रमाणात सध्या तरी अटळ आहे . त्यासाठी पद्धतशीर व सतत परिश्रमाची आवश्यकता आहे . पण हे करीत असताना संघटनेची ताकद शिथिल होणार नाही , कोर्टबाजी हेच कामगार संघटनेचे कार्य होणार नाही इकडेही लक्ष दिले गेले पाहिजे . कामगारवर्ग हा जनतेचा कट्टर लढाऊ व आघाडीचा विभाग आहे असे फक्त म्हणून चालणार नाही , तर त्यासाठी कामगार , शेतकरी यांची एकजूट घडवून आणण्याचे योजनापूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत .
ग्रामीण मजूर
औद्योगिक कामगार व ग्रामीण मजूर यांच्या संबंधांस व दोस्तीस महत्त्व आहे . ग्रामीण मजूर व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या दहा कोटीपर्यंत जाते . कामगार व ग्रामीण मजूर हा एकंदर लोकसंख्येचा तिसरा हिस्सा आहे . जुन्या सरंजामी शेतीव्यवस्थेतून निर्माण झालेला व सध्या वाढत असलेला भूमिहीन शेतमजूर आणि सामाजिक परंपरेमुळे अस्पृश्य भूमिहीन व ग्रामीण उद्योगधंदे व व्यवसाय ( बलुते ) निकालात निघत चालल्यामुळे होणाऱ्या बेकारांचा ग्रामीण मजूर या थरात समावेश होतो . या थरात गणल्या जाणाऱ्या वरील विभागाच्या स्वरूपात थोडीफार भिन्नता असली तरी आज शेतीव्यवसायात मिळणाऱ्या मोलमजुरी शिवाय या सर्वांना जीविताचे दुसरे साधन नाही . खेड्यापाड्यांतून विखुरलेला , असंघटित , अशिक्षित , धार्मिक व सामाजिक भावनांनी पछाडलेला असा हा थर आहे . अजून या विभागावर पराभूत मनोवृत्तीचा पगडा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे . खेड्यातील श्रीमंत शेतकरी , व्यापारी , सावकार , गावगुंड या सर्वांकडून त्याची पिळवणूक होते आहे . बहुतांश खेड्यांतून हा अल्पसंख्य असल्यामुळे व संघटनेची जाणीव कमी असल्यामुळे या थरावर हे वर्चस्व टिकून राहते . भारतातील सर्व थरांपेक्षा या थराकडे अधिक दुर्लक्ष केले जात आहे . या विभागाला संघटित व जागृत करणे , हे काम कठीण असले तरी ते आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचे कार्य आहे . या विभागास संघटित केल्यास ग्रामीण विभागातील लढाऊ शक्ती म्हणून लोकशाही चळवळीच्या आघाडीवर हा थर येऊ शकेल .
गरीब व मध्यमवर्ग शेतकरी
ग्रामीण समाजाच्या निम्मा समाज या थरात गणला जातो . खंडाने शेती करणारा किंवा स्वत : ची थोडीफार जमीन असणारा असा हा थर आहे . त्यांना रावणुकीसाठी पुरेसे क्षेत्र नसते . जमिनीची अशाश्वती , जमिनीची अपुरी साधने , शेतीमालाच्या अस्थिर व अयोग्य किमती , अपुरे भांडवल , वाढता खर्च अशा या घातचक्रात हा थर सापडला आहे . जमिनीच्या पारंपरिक आकर्षकपणामुळे दुसरीकडे काम करण्याची कोणतीही संधी मिळत नसल्याने तो जमिनीला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो . पण शेतीव्यवसाय किफायतशीर करण्याचे त्राण राहिले नसल्यामुळे दिवसेंदिवस या थराचे जीवन हलाखीचे होत चालले आहे . भांडवलाच्या व शेती अवजारांच्या गरजेमुळे खेड्यातील सावकार , व्यापारी व श्रीमंत शेतकरी यांचे या थरावर वर्चस्व असते . मध्यम शेतकऱ्याची परिस्थिती या गरीब शेतकऱ्यापेक्षा थोडी बरी असते . मालकीची किंवा खंडाने केलेली साधारणपणे याला काम मिळेल एवढी जमीन या थरातील शेतकऱ्यांकडे असते . पण शेतीउत्पन्नाचा वाढता खर्च , शेतीमालाच्या अस्थिर किमती , भांडवलाचा अभाव यामुळे या थराचे जीवन अतिशय जिकिरीचे होऊन गेले आहे . या विभागातील शेतकऱ्यावर श्रीमंत शेतकरी , गावगुंड , व्यापारी यांचे वर्चस्व कमी असते . त्याचबरोबर गरीब शेतकरी व शेजमजूर यांच्याशी याचे संबंध सहानुभूतीचे असतात . त्यामुळे खेड्यातील समाजाची ( शेतमजूर , गरीब व मध्यम शेतकरी ) एकजूट करून त्यांचे ग्रामीण जीवनातील स्थान बळकट करण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा आहे .
श्रीमंत शेतकरी
भांडवलाचा देशातील अर्थव्यवस्थेत प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हा थर ग्रामीण अर्थव्यवस्थेत निर्माण होत आहे . काँग्रेसच्या कारकिर्दीत जमीनदारांचा एक विभाग ' स्वत : जमीन कसणारा ' या नावाखाली या थरात सामील होत आहे . येत्या पाच वर्षांत ही गती वाढणार आहे . श्रीमंत शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीचे प्रमाण जास्त असते . त्यांचे वार्षिक जीवन खेड्यांतील इतर विभागांपेक्षा स्थिर असते.खेड्यातील व्यापारी , सावकार , सरकारी अधिकारी यांच्याशी यांचे संबंध सलोख्याचे असतात . या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण जीवनातील सर्व सार्वजनिक व्यवहारावर यांचे वर्चस्व कमीअधिक प्रमाणात असते . जेथे बाकीचा शेतकरी व शेतमजूर असंघटित असतो , तेथे श्रीमंत शेतकरी , व्यापारी , सावकार , गावगुंड व गावकामगार यांच्या आघाडीचे सर्व ग्रामीण जीवनावर प्रभुत्व असते . श्रीमंत शेतकरी मुख्यत : आपला शेतीव्यवसाय शेतमजुरांच्या साहाय्यावर चालवितो . गेल्या काही वर्षांत भांडवलदारी पद्धतीच्या शेतीचा स्वीकार या थराने वाढत्या प्रमाणात सुरू केला आहे . त्यामुळे शेतीची यांत्रिक अवजारे , शेतीच्या नवीन पद्धतीचा अंगीकार यांनी केला आहे . पण यामुळे शेतीमालाचे अस्थिर दर , शेतीअवजारांच्या व खताच्या वाढत्या त्यांचा तुटवडा हे प्रश्न प्रामुख्याने या थरासमोर असतात . काँग्रेसच्या श्रीमंत शेतकरी अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या धोरणामुळे काँग्रेसला हा थर ग्रामीण विभागातील आधारस्तंभ वाटतो . त्याचप्रमाणे लँड मोर्गेज बँक , सहकारी सोसायट्या , तगाई , सरकारी खतपुरवठा योजना , यामुळे श्रीमंत शेतकऱ्यांचा प्रामुख्याने थोडाफार फायदा झाला आहे . त्यामुळे या थरात काँग्रेसविषयी थोडेफार प्रेम असते . पण शेतकऱ्यांकडून कच्चा माल स्वस्तात मिळविणे हे भांडवलदारांच्या नफ्याचे एक कारण असते . त्यामुळे शेतीमालाच्या अस्थिर परिस्थितीमुळे भांडवलदार व संयुक्त शेतकरी यांचा संघर्ष अटळ असतो . त्याचबरोबर शेतमजुरांकडून कमी मजुरीत काम करून घेणे या थराचे उद्दिष्ट असल्यामुळे खेड्यातही हा संघर्ष असतो . पण गरीब मध्यम शेतकरी व शेतमजूर यांची प्रभावी एकजूट असल्यास त्या एकजुटीच्या जोरावर हा संघर्ष कमी करणे शक्य आहे . मजुरीच्या व इतर प्रश्नावर समझोता होणे शक्य असते. म्हणूनच शेतीव्यवसायाच्या आणि ग्रामीण जीवनाच्या सर्व प्रश्नांवर समग्र शेतकऱ्यांची भाडवलदार , सावकार , आडते , गावगुंड यांच्याविरुद्ध एकजुटीची आघाडी निर्माण करणे शक्य असते .
जमीनदार
भारतातील जमीनदार व जहागिरदार यांच्या स्वरूपात झपाट्याने बदल होत आहे . गेल्या पाच वर्षांत जमीनदारी स्वरूपाचे काही दुय्यम हक्क नुकसानभरपाई देऊन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे . उत्तर प्रदेशात जमीनदारी नुकसानभरपाई देऊन नाहीशी करण्याचा कायदा झाला आहे . मुबई राज्यात कसणाऱ्या शेतकऱ्यांना ठराविक किंमत जमीनदारांना देऊन जमिनी खरेदी करण्याचा हक्क देण्यात आला आहे . सरकारच्या या प्रश्नामुळे भांडवली अर्थव्यवस्थेत जमीनदारांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील वर्चस्व मान्य नाही हे सिद्ध होते . पण या जमीनदारांना भांडवली अर्थव्यवस्थेचे पाईक करण्याचा झपाट्याने प्रयत्न चालला आहे . त्यांना हवी तेवढी जमीन देण्यास मुभा दिली जात आहे व इतर जमिनीबद्दल भरपूर मोबदला देऊन त्यांच्या भांडवलाची व्यवस्था करण्यात येत आहे . सरकारच्या या धोरणामुळे या मध्यम जमीनदारांचा एक विभाग श्रीमंत शेतकरी म्हणून पुढे येऊ लागला आहे , तर बडे जमीनदार व जहागिरदार भांडवलदारांचे दोस्त म्हणून औद्योगिक व व्यापारी क्षेत्रात शिरत आहेत .
मध्यमवर्ग
शहरी बुद्धिजीवी , ग्रामीण समाजातून शिकून पुढे आलेले शिक्षक , कारकून , औद्योगिक क्षेत्रातील कसबी कामगार , लहान शहरी व्यापारी यांचा या थरात समावेश करावयास हरकत नाही . शहरी मध्यमवर्गावर भांडवली लोकशाही , तिच्या परंपरा , हिंदी वर्णाश्रमाची जुनाट परंपरा यांचे संस्कार कमीअधिक प्रमाणात अजून आहेत. त्याचबरोबर आज त्या थराची आर्थिक परिस्थिती केविलवाणी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे . संघटना , चळवळ या गोष्टींचे या थरात वावडे असते . पण गेल्या पाच वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे . मध्यमवर्ग निदान आपल्या मागण्यांसाठी चळवळीत उतरत आहे . अजून त्याला राजकीय पक्षाचे वावडे आहे . पण ही परिस्थितीही बदलणे शक्य आहे . यांच्या संघटनांवरही सरकारचे दडपण वाढत्या प्रमाणात येत आहे . या थरातील भांडवली मनोवृत्तीची असलेली कमीअधिक जळमटे काढण्याचा प्रयत्न झाला आहे . या थरात एकंदर श्रमजीवी जनतेच्या चळवळीबाबत सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्यास हा जनतेच्या आघाडीत सामील झाल्याशिवाय राहणार नाही .
लहान कारखानदार
स्वत : च्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली उद्यागधंदे छोट्या प्रमाणात चालविणारा हा भाग आहे . या धंद्यात ठेवी अगर कर्ज या पद्धतीने भांडवल जमविले जाते . पण प्रामुख्याने एक अगर भागीदारीत असलेल्या काही छोट्या भांडवलदारांचे कारखान्यांवर नियंत्रण असते . या कारखान्यांतून मुख्यत : जीवनावश्यक वस्तू निर्माण होतात . कच्चा माल , यंत्रसामुग्री , कामचलाऊ भांडवल यासाठी या थराला मोठे भांडवलदार व त्यांचे काही कारखाने यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून राहावे लागले . आणि त्या बड्या भांडवलदारांचे या छोट्या कारखानदारांवर नियंत्रणही असते . या धंद्याचा विकास वाढत्या मक्तेदारीमुळे अडून बसतो . या धंद्यांना मदत सरकारकडून फायनान्स कॉर्पोरेशनसारख्या संस्था काढण्यात आल्या आहेत . पण एकंदर नोकरशाही यंत्रणेवर बड़े भांडवलदार यांचे जे वर्चस्व आहे , त्यामुळे व त्यांच्या हितास पोषक नाहीत असे उद्योगधंदे काढण्यासाठी ही मदत प्रत्यक्ष यांच्या पदरात पडणे मुष्कील आहे . या थराला आवश्यक ते संरक्षण मिळाले पाहिजे .
बडे भांडवलदार व मक्तेदार , कारखानदार
कामगार , शेतकरी , शेतमजूर , मध्यमवर्ग या सर्व थरांची पिळवणूक करणारा व सबंध देशाच्या अर्थव्यवस्थेवर शासनसंस्थेवर आपल्या भांडवलातील मक्तेदारीच्या जोरावर वर्चस्व गाजविणारा हा विभाग आहे . संख्येने अगदी कमी असून राष्ट्रीय उत्पन्नाच्या सगळ्यात जास्त विभागाचा उपयोग हा थर घेत असतो . देशातील पेढीवाल्या भांडवलदारांतून निर्माण झालेला हा मुख्य थर आहे . परकीय भांडवलदारांच्या मदतीवर व त्यांचा काही ठिकाणी एजंट म्हणून हा पुढे येत आहे . जहागिरदार , बडे जमीनदार व संस्थानिकांतील काही लोक या थरांत सामील होत आहेत . परदेशी भांडवलदारांची मदत घेऊन या थराने भारतातील वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांत मक्तेदारी निर्माण करण्याचा झपाट्याने प्रयत्न चालविला आहे . बोटवाहतूक , साखर कारखाने , लोखंड , पोलाद , सिमेंट , ज्यूट , मोटार वगैरे धंद्यांत यांची मक्तेदारी प्रस्थापित झाली आहे . यापैकी काही क्षेत्रांत सरकार प्रवेश करणार असल्यामुळे या मक्तेदारीस शह मिळेल अशी अपेक्षा होती . पण या धंद्यातील लोकांचे सहकार्य घेऊनच सरकारी कारखानेही या मक्तेदारांच्या मेहरबानीवर जगणार आहेत . या मक्तेदारांचा औद्योगिक क्षेत्रातील प्रभाव वाढणार आहे . काँग्रेसला उघडउघड आर्थिक मदत देऊन काँग्रेसवर यांनी वर्चस्व गाजविले आहे . त्याचप्रमाणे स्थानिक स्वरूपात इंटकमधून काम कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करून कामगारांच्या म्हणून मानल्या जाणाऱ्या संघटनाही आपल्या हस्तक करण्याचा प्रयत्न या थराने पद्धतशीरपणे चालविलेला असतो . बडे भांडवलदार , मक्तेदार , कारखानदार व त्यांचे परकीय साथीदार हे खऱ्याखुऱ्या राष्ट्रीय विकासाचे विरोधक आहेत . देशात भांडवलाचा तुटवडा आहे , या सबबीवर करातील सवलती , राशनलायझेशन , व्यापारविषयक सवलती मिळवून देशाची लूट या थराने चालविली आहे . या थराचे वर्चस्व नष्ट करणे व देशातील उत्पादनशक्ती राष्ट्रीय विकासासाठी वापरणे हे जनतेच्या लोकशाही सरकारचे मुख्य कार्य आहे . ताबडतोबीच्या काळात या थराच्या वर्चस्वाला निकराचा विरोध करणे हे लोकशाही आघाडीचे महत्त्वाचे कार्य आहे . त्यासाठी कामगार , शेतमजूर , शेतकरी , मध्यमवर्ग यांना त्यांच्या हिताच्या प्रश्नावर व लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी एकत्र आणून आघाडी केली पाहिजे . देशातील वेगवेगळ्या वर्गाचे व विभागांचे स्वरूप लक्षात घेऊन मार्क्सवादी पक्षांनी पिळल्या जाणाऱ्या विभागांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन त्यांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला पाहिजे .
पक्षकार्याची रूपरेषा
आतापर्यंत केलेल्या विवेचनाच्या प्रकारात शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीची रूपरेषा आखली पाहिजे . लोकशाही चळवळीत मार्क्सवादी लेनिनवादी विचारसरणीवर निष्ठा ठेवणारा पक्ष या नात्याने शेतकरी कामगार पक्षावर विशिष्ट जबाबदारी येते . ती कटाक्षाने पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे . राजकीय धोरण बरोबर आखणे एवढेच काम झाले म्हणून समाधान मानता येणार नाही , तर लोकशाही चळवळीचे जे उद्दिष्ट ठरविले जाते ते विशिष्ट धोरणाच्या कक्षेत साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे . लोकशाही चळवळीत स्थानिक स्वरूपाचे किंवा तात्कालिक स्वरूपाचे प्रश्न निर्माण होतात . त्या प्रश्नांकडे विशिष्ट धोरणातून पाहिले पाहिजे व त्या प्रश्नांबाबत आपला पवित्रा ठरविला पाहिजे . पण साधारणपणे लोकशाही चळवळीतील आपल्या कार्यपद्धतीची व कार्याची रूपरेषा ठरविणे आवश्यक आहे . अर्थात चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी अचूक पाऊल उचलण्याच्या दृष्टीने लवचिकपणा हा असावाच लागतो . काँग्रेस सरकारच्या स्वरूपाविषयी धोरणांविषयी विवेचन वर केलेच आहे . काँग्रेस सरकारच्या धोरणाकडे पाहिले तर हे स्पष्ट होईल , की देशातील बड्या भांडवलदारांचे , भांडवलशाही समाजव्यवस्थेचे संरक्षण करीत असता आपण भांडवलशाहीचे विरोधक आहोत , समाजवादी समाजपद्धतीचे पुरस्कर्ते आहोत , असा भास निर्माण करून जनतेच्या मनात नवे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे . कम्युनिटी प्रोजेक्टस् , नॅशनल डेव्हलपमेंट ब्लॉक्स वगैरे योजना व समाजवादी समाजपद्धतीचा स्वीकार केला असल्याचा प्रचार ही त्यांची प्रभावी हत्यारे आहेत. कम्युनिटी प्रोजेक्टस्ची योजना अमेरिकन तज्ज्ञांच्या पोतडीतील खास हत्यार आहे . काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे रक्षणकर्ते सरकार आहे असा घोषणावजा प्रचार करून या हत्याराचा प्रभाव कमी होणार नाही , तर याच योजनांच्या अंमलबजावणीतून सरकारी धोरणाचे खरे स्वरूप उघड करणे शक्य असते . मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने जनतेचे अगदी थोडे का असेना हित होत असेल अशी कोणतीही योजना फक्त भांडवलदारांची योजना म्हणून फेटाळता कामा नये . भांडवलशाहीचे पुरस्कर्ते जनतेचे तत्कालिक समाधान करण्यासाठी दैनंदिन प्रश्नावर काही योजना पुढे आणतात . जनतेच्या चळवळीचा तो प्रभाव असतो . त्याचा फायदा अवश्य घेतला पाहिजे व जनतेच्या अंतिम हिताच्या योजनेसाठी जनतेची लढाऊ तयारी केली पाहिजे , या दृष्टीने कम्युनिटी योजनेकडे पाहिले पाहिजे . त्या योजनांच्या कार्यात आवश्यक तो भाग घेऊन जनतेच्या दैनंदिन अडचणी निवारण्यासाठी जेथे जेथे शक्यता असेल तेथे तेथे आपण पुढाकार घेऊन जनतेच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पंचवार्षिक योजनेच्या कार्यक्रमाबाबतही आपले सर्वसाधारण धोरण व कार्याची दिशा अशीच राहिली पाहिजे . पंचवार्षिक योजना फक्त दोषपूर्ण आहे अशी एकांगी भूमिका घेणे अनिष्ट आहे . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत , जनताभिमुख नियोजनाचा अभाव , देशी व परदेशी भांडवलदारांना संरक्षण व शाश्वती , शेतीव्यवसायाच्या पुनर्घटनेकडे दुर्लक्ष , अर्थव्यवस्थेतील तोल राखण्याच्या धोरणाचा अभाव , बेकारीबाबतच्या मूलभूत प्रयत्नांचा अभाव , हे प्रमुख दोष आहेत . पण त्याचबरोबर भांडवली पद्धतीने औद्योगिक उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे . सार्वजनिक मालकी विभागात काही मूलभूत उद्योगधंद्यांतील कारखाने निघणार आहेत . कालवे व वीजपुरवठा याबाबत काही प्रगती होणार आहे याही गोष्टीकडे लक्ष दिले गेले पाहिजे . सार्वजनिक मालकी विभागात पोलाद - लोखंड यांचे कारखाने निघणार आहेत ही गोष्ट त्यांतील दोष पत्करूनही स्वागतार्ह आहे . राष्ट्राच्या फायद्याची आहे . या योजनांतून काही राष्ट्रीय स्वरूपाचे फायदे होणार आहेत . म्हणून पंचवार्षिक योजनेकडे संपूर्ण विरोधाच्या भूमिकेतून पाहणे एकांगीपणाचे ठरणार आहे . या योजनेतून जनतेचा जेथे फायदा होणार आहे तेथे पाठिंबा देऊन पंचवार्षिक योजनेतील दोषांविरुद्ध झगडणे आवश्यक आहे . या प्रश्नावर जनतेची मागणी स्पष्ट करून त्यासाठी आवश्यक ती चळवळ उभारणे व लोकमताचा प्रयत्न करणे आवश्यक आहे . लोकशाही चळवळीच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे . राज्यपुनर्रचनेच्या प्रश्नावर जनतेची प्रभावी चळवळ चिरडून टाकण्याचा सरकारने शिकस्तीचा प्रयत्न केला असला तरी शेवटी आंध्र , कर्नाटक , तामिळनाडू , केरळ वगैरे भाषिक राज्ये निर्माण करणे सरकारला भाग पडले आहे . जनतेच्या चळवळीचा हा प्रचंड विजय आहे . जनतेच्या चळवळीपुढे मान तुकविताना सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे धोरण काँग्रेसने मोठ्या प्रमाणात यशस्वी केले आहे . सरहद्दीचे प्रश्न गुंतागुंतीचे करून राज्याराज्यात संघर्ष आणि अविश्वासाचे मूळ ठेवले आहे . सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवलदारांचा बालेकिल्ला मुंबई महाराष्ट्र राज्यात येऊ नये म्हणून द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण केले आहे . मराठी व गुजराथी संघर्षाच्या जोरावर मुंबईची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचे कारस्थान रचले आहे . या प्रश्नावर भांडवलदारांना व त्यांच्या काँग्रेसला तात्कालिक यश मिळाले आहे . देशातील सर्व भाषिक समाजांना समान पातळीवरून आपल्या विकासाचा प्रयत्न यशस्वी करता यावा , राज्यकारभारावर जनतेचा प्रत्यक्ष प्रभाव पडणे शक्य व्हावे म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण व भाषिक तत्त्वावर घटक राज्ये निर्माण करणे आवश्यक आहे . याच भूमिकेवरून संयुक्त महाराष्ट्र व महागुजराथ राज्याची निर्मिती करणे आवश्यक आहे . गुजराथी जनतेचा या प्रश्नावर वाढता पाठिंबा मिळत आहे . आपल्या पक्षाची या प्रश्नावर विशिष्ट जबाबदारी आहे . जनतेच्या एकजुटीच्या चळवळीच्या साहाय्याने महागुजराथ व संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यास सरकारला भाग पाडणे आवश्यक आहे . सरहद्दीचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे . वेगवेगळ्या राज्यांत सरहद्दीवर जे अल्पसंख्य भाषिक समाज निर्माण झाले आहेत , त्यांची अवस्था अस्पृश्यासारखी झाली आहे . त्यांच्या मागणीस पाठिंबा दिला पाहिजे . निवडणुकीचे व एकंदर वैधानिक लोकशाहीकडे ( पार्लमेंटरी डेमॉक्रसी ) आपला प्रचार व भांडवलशाहीचे स्वरूप उघड करणे हा एखाद्या अंकुचित धोरणातून पाहणे इष्ट नाही . या निवडणुकीत जनतेचे प्रतिनिधित्व मिळविणे व या लोकशाहीच्या तंत्रात जनतेवर काँग्रेस सरकारकडून जे दैनंदिन हल्ले होत आहेत त्यांना निकराचा प्रतिकार करणे व जरूर तर त्या सत्तेचा वापर जनहितासाठी करणे , या दृष्टिकोनातून या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे . या प्रयत्नास जनता चळवळीचा प्रचंड पाठिंबा मिळविण्याचे कार्य आपण जोमाने केले पाहिजे . तरच भांडवलशाहीचा पराभव करणे शक्य आहे . शेतकरी कामगार पक्षाने वरील दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे . पक्षाने संघटनात्मक ताकद या प्रश्नावर आवश्यक तेवढी वाढविली पाहिजे व निवडणुकीत पक्षातर्फे निवडले जाणारे प्रतिनिधी जनतेच्या हक्कांचे राखणदार आहेत , या दृष्टीने त्यांची निवड पक्षाने केली पाहिजे . हे क्षेत्र लोकसभा , विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था यांतून व्यापलेले आहे . त्या दृष्टीने या सर्व क्षेत्रांचा बारकाईने अभ्यास करून योग्य पावले टाकली पाहिजेत .
संयुक्त लोकशाही आघाडी
याच संदर्भात काँग्रेसविरोधी संयुक्त लोकशाही आघाडीचा विचार केला पाहिजे . काँग्रेसशी येत्या निवडणुकीत परिणामकारक मुकाबला झाल्यास सर्व लोकशाही पक्षांनी आपली ताकद संघटितपणे एकत्रित केली पाहिजे . ही गोष्ट बहुतेक सर्व पक्षांना मान्य झालीच आहे . पण या प्रयत्नात अजून अडचणी येतात . वेगवेगळ्या पक्षांत परस्परविश्वास , सहकार्य व वैचारिक समझोता झाल्यास ही आघाडी निर्माण होणे व बळकट होणे शक्य आहे . अशी आघाडी घाईघाईने अगर यांत्रिक पद्धतीने करणे बरोबर होणार नाही , त्यामुळे काही टप्प्यांनी ही आघाडी आज शक्य आहे . त्या प्रयत्नांचा विचार करून पाऊल टाकणे आवश्यक आहे.ही आघाडीची कल्पना फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित करणे योग्य होणार नाही . अर्थात निवडणुकीसाठी आघाडी ही भावी प्रयत्नांचा आधार म्हणून केली पाहिजे . देशात काँग्रेसच्या वर्चस्वास शह द्यावयाचा झाल्यास जनतेच्या लोकशाही चळवळीच्या आधारावर अशी राजकीय पक्षांची संयुक्त आघाडी झाली पाहिजे . या जनतेच्या लढ्यात या आघाडीची व्याप्ती शिरली पाहिजे . गेल्या काही वर्षांत या प्रयत्नास जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला आहे . त्यामुळेच ही आघाडी निर्माण करताना अतिशय जबाबदारीच्या या प्रयत्नास अपयश आले तर जनतेची फार निराशा होते . त्यामुळे जनतेच्या या आघाडीबद्दल फक्त अपेक्षा न वाढविता प्रत्यक्ष टिकाऊ स्वरूपाचे पाऊल टाकले पाहिजे . अशा प्रकारची आघाडी ही राजकीय पक्षांची आघाडी आहे . हे लक्षात ठेवले पाहिजे . वैचारिक मतभेद असल्याने या पक्षांच्या कामाच्या पद्धतीतही फरक असण्याची शक्यता आहे . त्यामुळे अशा आघाडीत येणाऱ्या पक्षांचे परस्परसंबंध मैत्रीचे , विश्वासाचे व सहकार्याचे राखण्याबाबत खास प्रयत्न केले पाहिजेत . अशी आघाडी निर्माण झाली पाहिजे म्हणूनच या भूमिकेस शेतकरी कामगार पक्षाने सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे . आणि प्रयत्नही केले आहेत . अशा आघाडीचा पाया म्हणून मार्क्सवाद - लेनिनवादावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांना संयुक्तपणे प्रयत्न करता यावेत म्हणून अशा पक्षांची आघाडी होणे आवश्यक आहे . अशी भूमिका पक्षाने प्रथमपासून मांडली आहे . अजूनही या प्रयत्नास भरीव यश आले नाही . पण या प्रयत्नास आज परिस्थिती अनुकूल होत आहे . पक्षाने हे प्रयत्न चिकाटीने चालविले पाहिजेत . वरील सर्वसाधारण धोरणांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जरूर अशा संघटनेच्या आघाडीवर आपल्या कामाची रूपरेषा आखली पाहिजे . श्रमजीवी जनतेचे संघटित सामर्थ्य वाढविण्यासाठी जनसंघटनांची किती आवश्यकता आहे हे नव्याने सांगण्याचे कारण नाही . पण या आघाडीवर चिकाटी व लवचीकपणा आवश्यक आहे . तो नाही हे कबूल केले पाहिजे . कामगार , शेतकरी , मध्यमवर्ग व विद्यार्थी या आघाडीवर काम करताना आपली कामाची रूपरेषा खालीलप्रमाणे राहिली पाहिजे
कामगार आघाडी
कामगार आघाडीवरील आपले काम संघटित नाही . काही केंद्रांतून कामगार एकजुटीचे आपण केलेले प्रयत्न कामगार संघटना कार्यक्षम करू शकल्या नाहीत . गेल्या पाच वर्षांतील या आघाडीवरील अनुभवाचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे . काही केंद्रांतील आपले कार्य विशेष अनुकरणीय आहे .कामगारांची एकजूट ही घोषणा आज नव्याने देण्यात येत नाही . एकजुटीच्या प्रयत्नास कामगारवर्गाचा वाढता पाठिंबा मिळत आहे . पण एकजुटीच्या संघटना कार्यक्षम करणे हे काम कठीण आहे . पण तितकेच ते अगत्याचे आहे . कारण वेगवेगळ्या विचारांचा व नेतृत्वाचा प्रभाव असलेले हे कामगार व त्या क्षेत्रातील कार्यक्षेत्रे एकत्र येतात . त्यांना संघटनेत आणताना फक्त वैचारिक एकजूट किंवा उद्दिष्टाबाबत एकमत असून भागत नाही . त्यांच्यात संघटनात्मक एकजुटीची जाणीव हवी असते . तरच एकजुटीच्या कामगार संघटना कार्यक्षम होतील . कामगारांच्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नावर राजकीय पक्ष व काही ठिकाणी कामगार संघटना जागृत असत नाहीत . त्यामुळे कामगार संघटनांकडून व राजकीय पक्षांकडून ज्या नेतृत्वाची कामगार अपेक्षा करतात ते मिळत नाही . गेल्या १-२ वर्षांत कामगारांच्या स्वयंस्फूर्त चळवळीकडे पाहिले म्हणजे ही गोष्ट स्पष्ट होईल . असे झाले म्हणजे कामगारांच्या प्रश्नावर कामगार लढा यशस्वी होण्याची शक्यता असताना योग्य डावपेचाऐवजी लढ्याचा विचका होतो . शेतकरी कामगार पक्षाने आपल्या कार्यक्षेत्रात तरी हे दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे . मालक , मजूर संबंध व राजकीय चळवळ हेच ट्रेड युनियन संघटनांचे कार्य आहे , असा चुकीचा समज या क्षेत्रात पसरलेला आहे . या प्रश्नाशिवाय आरोग्य , शिक्षण , सहकारी सोसायट्या , सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न असे अनेक प्रश्न कामगारांपुढे असतात . याही प्रश्नांवर ट्रेड युनियन संघटनांनी कामगारांचे नेतृत्व व मार्गदर्शन करावे , अशी कामगारांची रास्त अपेक्षा असते . या कार्यात ट्रेड युनियन संघटनांनी विशेष लक्ष न घातल्यामुळे कामगारांच्या मनाची परिस्थिती द्विधा होते . या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी कामगार वेगळ्या नेतृत्वाची किंवा संबंधांची कास धरतात व त्यामुळे कामगारांचे ट्रेड युनियन चळवळीतील नेतृत्व व इतर प्रश्नांवरील नेतृत्व यात अंतर पडते . कित्येक वेळी ट्रेड युनिवनव्यतिरिक्त नेतृत्वाचा प्रभाव कामगारांवर पडतो व कामगार चळवळीला धोका निर्माण होतो . म्हणून या प्रश्नावरसुद्धा युनियन संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले पाहिजेत . काँग्रेस सरकारने केलेल्या कामगारविषयक कायद्यांमुळे कोर्टबाजी हे एक कामगार संघटनेचे आवश्यक पण जिकिरीचे काम होऊन बसले आहे . पण कामगार चळवळीच्या विकासासाठी हे काम चोख रीतीने करण्याची आवश्यकता आहे . कामगार आघाडीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कक्षेत फार अडचणी येतात . युनियनच्या हिशेबाच्या तांत्रिक कामात व दैनंदिन कोर्टाच्या जिकिरीच्या कामात विशेष गम्य असत नाही . त्यामुळे कामगार संघटनांच्या प्रतिनिधित्वास घातक परिणाम होतो . या आघाडीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कामाची चिकाटी व आवड निर्माण झाली पाहिजे . पण त्याचबरोबर कोर्टबाजी व कार्यकर्त्यांची कामे हेच युनियनचे काम होता कामा नये . कामगार संघटनेचा लढाऊपणा व ताकद टिकविण्यासाठी राजकीय जागृतीचा प्रयत्न या बाजूवर प्रयत्नपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे . कामगार - शेतकरी एकजुटीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे . ही घोषणा मूर्त स्वरूपात उतरविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे . विशेषत : ग्रामीण भागातील औद्योगिक केंद्रातून हा प्रयत्नलौकर यशस्वी होण्याची शक्यता असते . ट्रेड युनियनच्या क्षेत्रात पक्षाने आपले कार्यकर्ते वाढविणे आवश्यक आहे . कामगारांतील सुशिक्षिता कार्यकर्त्यांचा या दृष्टीने उपयोग होईल . पण शेतकरी थरातील सुशिक्षित तरुणांना या आघाडीत काम करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे . अशा कार्यकर्त्यांना निवडून कामगार आघाडीवर कार्यप्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी व बौद्धिक तयारी करून घेतली पाहिजे .
शेतकरी आघाडी
लोकशाही चळवळीत शेतकरी आघाडीवरील कामाला अतिशय महत्त्व आहे . देशातील सर्वात मोठा समाज म्हणजे शेतकरी . पण या समाजात संघटनेचा अभाव असल्यामुळे राज्ययंत्रणेवर या समाजाचा प्रभाव पडणे कठीण होते . अशा परिस्थितीत विरोधक जमीनदार व भांडवलदारांचे हस्तक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मिरवतात . हे लोक शेतकरीवर्गाच्या हितासाठी झगडतील ही अपेक्षा करणे व्यर्थ असते . या वर्गाचा राज्ययंत्रणेवर प्रभाव पडून या वर्गाचे दैनंदिन जीवन सुखी करावयाचे असेल व राष्ट्राच्या भवितव्याचा पाया घालावयाचा असेल तर शेतकरी समाजास संघटित करून त्याची राजकीय जागृती वाढविली पाहिजे . त्यांच्यावर होणारे दैनंदिन हल्ले परतवून लावण्यास त्यांना समर्थ केले पाहिजे . या आघाडीवरील कामाचा व्याप व ताण अतिशय प्रचंड आहे . पण ते अतिशय लवचीकपणे व चिकाटीने करण्याची आवश्यकता आहे . हंगामी काम करणे हा शेतकऱ्यांच्या स्वभावातील दोष या आघाडीवरील कार्यकर्त्यांतही प्रामुख्याने येतो . तो काढून टाकून योजनापूर्वक सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे . ग्रामीण समाजातील वेगवेगळे थर , त्यांचे स्वरूप व त्यांचे परस्परसंबंध यांचे विवेचन पूर्वी केलेलेच आहे . स्थानिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून तेथील चळवळीच्या प्रश्नावर योग्य पाऊल टाकले पाहिजे . एखादे खेडे अगर खेड्याचा समूह हा एक घटक असतो . स्थानिक परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या थरांचे तेथे वर्चस्व असते . वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात . सामाजिक , आर्थिक व धार्मिक परंपरेतून वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले असतात . त्यामुळे वेगवेगळ्या थराचे भिन्न त - हेने संबंध प्रस्थापित झालेले असतात . तेव्हा या स्वरूपाची योग्य उकल करून कामाची गती वाढविली पाहिजे . किसान सभा ही या आघाडीवरील जनसंघटना आहे . या आघाडीला ट्रेड युनियन चळवळीचे स्वरूप येणे अगत्याचे आहे . किसान सभेच्या कामात सातत्य , नियोजन हवे आहे . त्याचप्रमाणे त्या आघाडीवर पूर्ण वेळ देऊन कार्य करणाऱ्या शेतकरी कार्यकर्त्यांची गरज आहे . ग्रामीण मजुराच्या स्वरूपाचा विचार केल्यानंतर किसान सभेच्या कक्षेत या ग्रामीण मजुरांची स्वतंत्र संघटना निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे . विशेषत : मोठ्या प्रमाणावर जमीनदार , श्रीमंत शेतकरी जेथे शेती करतात तेथे या संघटनांची फार आवश्यकता आहे . ती भरून काढली पाहिजे . शेतीमालाला योग्यतर भांडवलाचा पुरवठा , शेती आवश्यक अवजारे व खते यांचा पुरवठा , कुळांना संरक्षण , जमिनीची सुधारणा , पाणीपुरवठा हे सर्व शेतीव्यवसायातील जनतेचे प्रश्न आहेत . काही थरांची निकड कमीअधिक असेल ; पण या प्रश्नावर समग्र शेतकऱ्यांना संघटित करणे आवश्यक आहे व या प्रयत्नांतूनच समग्र शेतकऱ्यांची एकजूट घडून येणे शक्य आहे . सहकारी शेतीची पद्धती अमलात आणण्याचाही प्रश्न गरीब , मध्यम शेतकरी , शेजमजूर या सर्वांच्या हिताचा आहे . यातून शेतीव्यवसायातील कमीअधिक असलेली संकटे नाहीशी होण्यास थोडीफार मदत होईल व शेतीव्यवसायातील सर्व जनतेची खंबीर एकजूट घडून येणे शक्य आहे . काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत शेतीप्रश्नावर अनेक कायदे करण्यात आले आहेत . या कायद्यांची गुंतागुंत इतकी करण्यात आली आहे , की खुद्द राज्ययंत्रणेतील लोकांनाही कित्येक वेळा यातील गम्य कळत नाही . शेतकरी आघाडीवर वरील कायद्यांच्या गुंतागुंतीमुळे शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न निर्माण होतात . परस्परविरोध निर्माण होतो . कित्येक वेळा हा विरोध शेतकरी संघटनेला घातक ठरतो . शेतकरी आघाडीवरील कार्यकर्त्यांना या कायद्यांचे स्वरूप ढोबळमानाने माहीत असावयास पाहिजे . तसा प्रयत्न केला पाहिजे . या कायद्यांतून व सरकारच्या शेती सुधारणा योजनांतून शेतकऱ्यांच्या तात्कालिक अडचणी दूर करणे शक्य असते . शेती सुधारणा योजनेतून शेतकऱ्यांच्या तात्कालिक अडचणी दूर करणे शक्य असते . शेतीप्रश्नावरील कायदा व तथाकथित सुधारणा यांतील दोषांविरुद्ध झगडण्याची जितकी आवश्यकता आहे तितकीच या सुधारणा योजनांचा अभ्यास करून दैनंदिन सामुदायिक प्रश्नाच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे . शेतकऱ्यांचे आर्थिक व राजकीय प्रश्न किंवा सहकारी प्रयत्न हा एवढाच शेतकरी जीवनाचा भाग किसान सभेच्या किंवा आपल्या पक्षाच्या कक्षेत येऊन भागणार नाही . ग्रामीण जीवनाच्या सर्व प्रश्नांवर किसान सभा व आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन देऊन नेतृत्व स्वीकारण्याची तयारी केली पाहिजे . ग्रामीण शिक्षण , आरोग्य , वाहतूक , सहकारी क्षेत्र , सामाजिक सुधारणा या सर्व प्रश्नांवर आपल्या पक्षाच्या कार्यकत्यांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून लक्ष दिले पाहिजे . शेतकरी आघाडीवर काम करताना गावगुंड , सावकार , जमीनदार , खेड्यांतील दलाल , व्यापारी यांचे डावपेच लक्षात घेणे आवश्यक आहे . विशेषतः जेथे शेतकरी संघटित असतो तेथे त्या सर्वांचे खेड्यावर सामुदायिक प्रभुत्व असते . या लोकांचे मत हाच तेथील कायदा व न्याय असतो . अशा ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांचा थरही या टोळक्यात सामील होतो . ही सामुदायिक गुंडगिरी निकालात काढून शेतकरी समाजाचे संघटित व जागृत जीवन उभारण्याची गरज असते . किसान सभा व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी जनतेचा संपूर्ण विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . हा विश्वास हा शेतकरी आघाडीवरील संघटित व लढाऊ चळवळीचा पाया आहे . हा पाया मजबूत नसेल तर पक्षाचे राजकीय व आर्थिक धोरण व मार्गदर्शने कितीही अचूक असले तरी शेतकरी संघटनेत येण्यास कचरत असतात . हे सर्व प्रयत्न जोमाने केल्यास व राजकीय जागृतीची व चिकाटीची त्यास उत्तम जोड मिळाल्यास शेतकरी आघाडीवरील काम संघटित होणे शक्य आहे . आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या पद्धतीने वागणे व कार्य करणे शक्य आहे . गेल्या ५/७ वर्षाच्या कामामुळे आपण जनतेचा विश्वास मिळविला आहे . या विश्वासाच्या जोरावर शेतकरीवर्गास संघटित करून लोकशाही चळवळीतील महत्त्वाची जबाबदारी उचलण्याचे काम पक्षाने केले पाहिजे .
मध्यमवर्ग व विद्यार्थी
मध्यमवर्ग आर्थिक हलाखीत वेगाने सापडत चालला आहे . या थराचे इतर श्रमजीवी वर्गाशी कामगार - शेतकरी दोस्तीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे . या थराचे प्रश्न त्याला समजत नाहीत असे नाही ; पण संघटित प्रयत्न करण्याची गरज त्या थराला पटणे आवश्यक आहे . सध्या ही अडचण कमी होत आहे . ग्रामीण जीवनाशी संबंधित असलेला मध्यमवर्गाचा विभाग श्रमजीवी जनतेच्या चळवळीकडे सहानुभूतीने पाहतो . या विभागाशी दोस्तीचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या जीवनासाठी संघटित प्रयत्न करण्यासाठी त्यांना समर्थ करणे शक्य आहे . विशेषत : शिक्षण आघाडीवर काम करणे महत्त्वाचे आहे . विद्यार्थीवर्गाने राजकीय किंवा कुठल्याही सामुदायिक चळवळीत भाग घेऊ नये , असा प्रचार काँग्रेस व भांडवलदारी वृत्तपत्रे यांच्याकडून जोराने होत आहे . दैनंदिन जीवन व पुस्तकी ज्ञान याची फारकत करून कारकून व नोकरांचा तांडा निर्माण करणे व भांडवलदारी समाजाच्या यंत्रणेतील भाग म्हणून त्यांनी भांडवलशाहीची अपेक्षा असते . त्यामुळे महागडे व काम करणे एवढीच सुशिक्षित समाजाकडून तत्त्वशून्य शिक्षण देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो . विद्यार्थ्यांत सामाजिक , राजकीय जागृती होणे हे त्यांना धोक्याचे वाटते . कारण विद्यार्थी चळवळीत मिळालेल्या अनुभवातून भांडवलशाहीचे विरोधक निर्माण होतील अशी भीती आहे . दैनंदिन चळवळीशी विद्यार्थ्यांचे संबंध येणे अगत्याचे आहे . विद्यार्थ्यांची चळवळ ही भावी सामाजिक व राजकीय जीवनाचा पाया आहे . याच वेळी सर्व समाजाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते . या गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांत करणे अगत्याचे आहे . विद्यार्थी चळवळीत विद्यार्थ्यांनी आस्थेने भाग घ्यावा यासाठी अचूकपणे प्रयत्न केले पाहिजेत .
महिला आघाडी
राजकीय चळवळीत महिला आघाडीच्या कार्याकडे अतिशय दुर्लक्ष झाले आहे . त्यामुळे महिला चळवळ म्हणजे मध्यमवर्गाच्या महिलांचे करमणुकीचे साधन एवढेच या चळवळीचे स्वरूप झाले आहे . समाजातील महिलांच्या स्थानाबद्दल मूलभूत दृष्ट्या विचार झाला पाहिजे . श्रमजीवी महिलांच्या व मध्यमवर्गीय महिलांच्या प्रश्नांच्या स्वरूपात भिन्नता असते . त्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून प्रयत्न केले पाहिजेत . भारतीय महिलांच्या मनावर जुन्या सामाजिक व धार्मिक परंपरांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे व त्यामुळे अनेक वेळा या प्रभावाखालून बाहेर पडताना संघर्ष निर्माण होतात. एकंदर समाजाची महिलांकडे पाहण्याची दृष्टी साफ होईपर्यंत हे संघर्ष नाहीसे करणे कठीण आहे . पण त्या प्रयत्नांची सुरुवात झाली पाहिजे . महिला जगतात शिक्षणाचा प्रसार काही प्रमाणात होत आहे . मध्यमवर्गात हे प्रमाण जास्त आहे . श्रमजीवी समाजात हे प्रमाण अगदीच अल्प आहे . श्रमजीवी जनतेच्या झगड्यात त्या समाजातील महिलानीवाढत्या प्रमाणात भाग घेणे आवश्यक आहे . त्यासाठी प्रयत्न झाल्यास यश येऊ शकते . पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत प्रयत्नांत कुचराई करता कामा नये . जनसंघटनांच्या आघाडीवर काम करीत असताना एकंदर समाजाची जागृती डवून आणण्यासाठी सांस्कृतिक व सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये . त्या क्षेत्रांत आवश्यक सुधारणा करून पक्षाने त्यांत भाग घेतला पाहिजे . त्याचबरोबर जनसंघटनेच्या आघाडीवर कार्य करताना प्रचाराच्या विभागाला अतिशय महत्त्व आहे . प्रचारपद्धती आपल्या राजकीय धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे . त्यामुळे शक्य त्या साधनांचा वापर करून प्रचारपद्धती जनतेची जागृती टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी संघटनाकार्याच्या सोबतीला प्रचारपद्धतीची योग्य साथ मिळाली पाहिजे . संघटित केली पाहिजे .
लोकशाही चळवळीच्या मागण्या*
लोकशाही चळवळीच्या उद्दिष्टाबाबत आतापर्यंत जे विवेचन केले आहे व पक्षाच्या धोरणाची व कार्याची जी रूपरेषा मांडली आहे त्यावर आधारून लोकशाही चळवळीच्या प्रमुख मागण्या मांडणे आवश्यक आहे .. देशातील श्रमजीवी जनतेला या मागण्यांची जाणीव करून देऊन संघटित चळवळ उभी करणे व श्रमजीवी जनतेच्या सामर्थ्यात वाढ करणे अगत्याचे आहे. श्रमजीवी जनतेच्या लोकशाही चळवळीतील मागण्या थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत . १ ) राष्ट्राचे सार्वभौमत्व , राष्ट्राराष्ट्रांतील परस्पर सहकार्य , सलोखा , शांतता या सूत्राच्या आधारावर सर्व राष्ट्रांशी भारताचे संबंध असले पाहिजेत . २ ) जेथे जेथे साम्राज्यवादी राष्ट्र अविकसित व लहान राष्ट्रावर दडपण आणतात व पिळवणुकीचे धोरण अमलात आणतात , तेथे भारताने साम्राज्यवाद्यांना स्पष्ट विरोध केला पाहिजे . ३ ) जगतातील जनतेच्या स्वातंत्र्यवादी , वसाहत विरोधी चळवळीस भारत सरकारने पाठिंबा दिला पाहिजे . ४ ) साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोरीच्या सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्नांस भारत सरकारने विरोध केला पाहिजे व सोव्हिएट युनियन , नवचीन आणि सर्व लोकशाहीवादी राष्ट्रांच्या शांतता प्रयत्नास खंबीरपणे साथ दिली पाहिजे . ५ ) भारत सरकारने साम्राज्यवाद्यांच्या लष्करी करारांना विरोध केला पाहिजे व शखकपात , अण्वस्त्रांवर बंदी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . ६ ) परस्परसहकार्य , समान हित या तत्त्वावर राष्ट्राराष्ट्रातील व्यापारी सहकार्य वाढले पाहिजे. ७ ) राष्ट्राराष्ट्रातील सांस्कृतिक संबंध दृढ केले पाहिजेत . ८ ) गोमंतक हा भारताचा अविभाज्य भाग आहे . गोमंतकाच्या स्वातंत्र्यसंग्रामास भारत सरकारने सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे . ९ ) राजसत्तेचे विकेंद्रीकरण व लोकमताचा प्रभाव राज्ययंत्रणेवर राहील अशा तऱ्हेने राज्यघटनेत दुरुस्ती झाली पाहिजे . १० ) भाषिकत्वावरच राज्यपुनर्रचना झाली पाहिजे . या दृष्टीने संयुक्त महाराष्ट्र व महागुजराथ ही राज्ये निर्माण झाली पाहिजेत . भाषिक तत्त्वावरच सर्व घटक राज्यांच्या सरहद्दी ठरविल्या पाहिजेत . ११ ) देशातील बडे भांडवलदार व मक्तेदार , कारखानदार यांच्या नफ्याच्या मिळकतीची किमान मर्यादा ठरवून जादा झालेली सर्व रक्कम सरकारजमा करून खास राष्ट्रीय औद्योगिक निधी उभा केला पाहिजे . आंतरराष्ट्रीय व्यापार सरकारी पातळीवरच चालला पाहिजे . त्या दृष्टीने हा व्यापार ताब्यात घेतला पाहिजे. १२ ) सर्व मूलभूत उद्योगधंदे सार्वजनिक मालकीच्या विभागात आले पाहिजेत . मूलभूत उद्योगधंद्यांत असलेल्या सर्व कारखान्यांची व्यवस्था व नियंत्रण सरकारने केले पाहिजे व उपभोग्य वस्तूंच्या ( कंझ्युमर्स गुडस् ) कारखान्यांचा व उत्पादनांचा विकास राष्ट्रीय गरज लक्षात घेऊन केला पाहिजे . १३ ) सार्वजनिक मालकी विभागातून उद्योगधंद्यांचे उत्पन्न व उत्पन्नावरील कर हे मार्ग सरकारी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग राहील अशी करपद्धती देशात सुरू झाली पाहिजे . उपभोग्य वस्तूंवरील कराचे प्रमाण कमी होत गेले पाहिजे . १४ ) जलद औद्योगिकीकरण होण्याच्या दृष्टीने सध्याच्या यंत्रसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग व नव्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने नवे कारखाने काढणे हे धोरण स्वीकारले पाहिजे . कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या सुधारणा ( रॅशनलायझेशन ) कामगारांना बेकार राहावे लागू नये अशाच दृष्टीने केली पाहिजे. १५ ) औद्योगिक उत्पादन वाढीसाठी कामगारांना कारखान्याच्या कारभारात ( मॅनेजमेंट ) वाढत्या प्रमाणात भाग घेता आला पाहिजे . १६ ) कसबी कामगार व तज्ज्ञ यांचे प्रत्येक कारखान्यात मॅनेजमेंटच्या खर्चाने कामगारांना खास तांत्रिक शिक्षण देण्याची सोय सक्तीची केली पाहिजे. १७ ) संस्थानिकांचे तनखे रद्द करणे आवश्यक आहे . १८ ) शेतीव्यवस्थेवरील सरंजामी हितसंबंध ताबडतोबीने नाहीसे झाले पाहिजेत व गरीब मध्यम शेतकऱ्यांना सहकारी शेतीच्या क्षेत्रात आणण्याचे प्रयत्न जोरात झाले पाहिजेत . १९ ) शेतीव्यवसायातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा नाहीसा केला पाहिजे . शेतीव्यवसायातील लांब मुदतीची व हंगामी भांडवलाची मदत सहकारी सोसायट्यांच्या यंत्रणेकडून मिळाली पाहिजे. २० ) शेतीव्यवसायातील अद्यावत अवजारे व खते यांची मदत सहकारी शेतकरी संस्था यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे . २१ ) सहकारी यंत्रणेतील सध्याचे दोष काढून टाकून या क्षेत्रात गरीब शेतकरी , मध्यम शेतकरी यांचा प्रभाव राहील अशा दुरुस्त्या केल्या पाहिजेत . २२ ) शेतीमालाची खरेदी - विक्री , प्रोसेसिंग व वेअर हाऊसिंग ही सर्व कामे सहकारी यंत्रणेकडून झाली पाहिजेत . सुरुवातीच्या अवस्थेतील या यंत्रणेच्या खर्चाचा मोठा बोजा सरकारने स्वीकारला पाहिजे. २३ ) शेतकरी समाजातील तरुणांना सहकारी यंत्रणेच्या कामाचे खास शिक्षण देण्याची सरकारने मोठ्या प्रमाणात सोय केली पाहिजे . २४ ) शेतीमालाला उत्पादनखर्च व शेतकऱ्यांचे जीवन यांचा विचार करून योग्य दर मिळाले पाहिजे . शेतकऱ्यांकडील जादा उत्पादन सहकारी व सरकारी यंत्रणेने योग्य दर देऊन खरेदी केले पाहिजे. २५ ) ग्रामीण मजुरांच्या जीवनाचे प्रमाण ठरले पाहिजे व त्याच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी व शेतमजूर यांच्या सहकार्याची यंत्रणा उभारली २६ ) सरकारी कसाऊ पडजमिनी ग्रामीण मजुराना सहकारी पद्धतीवर देण्यात आल्या पाहिजेत . २७ ) अवर्षण आणि अतिवर्षणाचे संकट नाहीसे होण्यासाठी कालवे योजना व शेतीव्यवसायातील नवीन शेतीतंत्राचा वापर केला पाहिजे . २८ ) शेतीव्यवसायातील आजची दाटी कमी करण्यासाठी व ग्रामीण व्यवसायांतून ( बलुते ) बेकार झालेल्या लोकांना पुरवण्यासाठी सहकारी पद्धतीवर शेती अवजारे , स्थानिक कच्चा माल वापरून दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करण्याचे कारखाने काढले पाहिजेत . २९ ) कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी ( प्रॉ . फंड , बोनस , महागाई , औषधोपचारांसाठी खास व्यवस्था ) , तांत्रिक शिक्षण याबाबत वाढत्या प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजेत . ३० ) १४ वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण मिळाले पाहिजे . दुय्यम , उच्चशिक्षणाचा बोजा सरकारने जादा उचलला पाहिजे व तांत्रिक शिक्षणाचा खर्च सरकारने सोसला पाहिजे . ३१ ) ग्रामीण आरोग्य , शिक्षण , वाहतूक , पाणी पुरवठा याबाबत सरकारी सोयी वाढल्या पाहिजेत . ३२ ) अस्पृश्यता निवारण्यासाठी अस्पृश्य व सर्व मागासलेले वर्ग यांच्या आर्थिक विकासाबाबत जास्त लक्ष दिले पाहिजे . ३३ ) उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण , भागांची समतोल औद्योगिक वाढ , तांत्रिक शिक्षणाची सोय , ग्रामीण उद्योगधंदे , सध्याच्या कारखान्यांची कुवत वाढविणे या मार्गांनी बेकारी नाहीशी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे . श्रमजीवी जनतेच्या लोकशाही चळवळीतील वरील प्रमुख मागण्या आहेत . स्थानिक स्वरूपात या मागण्यांत कमीअधिक बदल झाला तरी सर्वसाधारणपणे राष्ट्रीय स्वरूपाचे हे प्रश्न आहेत . लोकसभा , विधिमंडळे , स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व संस्थांतून आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींनी जनतेचा हा आवाज उठविला पाहिजे व या मागण्यांवर पक्ष संघटनांमार्फत पाठिंबा व लढाऊ चळवळ उभी केली पाहिजे . शेतकरी कामगार पक्षाची आपल्या कार्यक्षेत्रातील ही महत्त्वाची जबाबदारी आहे . श्रमजीवी जनतेच्या आघाडीवरील एक मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष म्हणून आपल्या ऐतिहासिक जबाबदारीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे . श्रमजीवी जनतेची प्रभावी ताकद उभी करणे या मार्गानेच शक्य आहे . बडे भांडवलदार व त्यांचा काँग्रेस पक्ष यांना यशस्वी शह देण्यासाठी जनतेची खंबीर लोकशाही आघाडी निर्माण करण्याचा हा मार्ग आहे . श्रमजीवी जनतेच्या हाती सत्ता येण्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे . देशातील समाजवादी चळवळीचे पाऊल खंबीरपणे पुढे टाकण्याची ही दिशा आहे . शेतकरी कामगार पक्षाने जनतेच्या आघाडीवर राहून आज खंबीरपणे पुढे पाऊल टाकण्याची गरज आहे.