युरीयाचा काळाबाजार थांबवा: शेतकरी कामगार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

  गडचिरोली: उशिरा आलेल्या पावसामुळे रोवणी हंगाम सध्या भरात चालू असताना जिल्ह्यात युरीया खताची क्रुत्रिम टंचाई निर्माण करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.   जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या लेखी तक्रारीत भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, राज्याचे क्रुषीमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, जिल्ह्याकरीता रासायनिक खतांची असलेल्या आवश्यकतेऐवढे खत वेळेपूर्वीच उपलब्ध करण्यात आलेले असल्याचे म्हणाले होते. असे असतांना जिल्हाभरात शेतकऱ्यांना २६६ रुपये किंमतीचे युरीया खत टंचाईच्या नावाने २९० ते ३५० अशा चढ्या दराने विक्री केले जात आहे.        …

हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार

हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार गडचिरोली: देशात आणि राज्यात सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्ष हे भांडवलदार धार्जिने असल्याने सामान्य माणसाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनाची स्वतंत्र भूमिका घेवून सामान्य जनतेचा लढा उभारणे गरजेचे आहे,असे मत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी व्यक्त केले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा लाल बावटा फडकविल्यानंतर झालेल्या बैठकीत भाई रामदास जराते यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. धानाला रुपये ३५००/- हमीभाव मिळाला पाहिजे.अन्यायकारक लॉकडावून मुळे रोजगार हिरावलेल्या नोंदणीकृत बांधकाम…