केज येथे शेकापचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील, लोकशाहीर काॅ.अण्णाभाऊ साठे यांचे विचारानेच शेतकर्यांच्या जिवनात क्रांती शक्य -डाॅ.प्रा संतोष रणखांब केज येथे शेकापचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केज (बीड) ३ ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील,लोकशाहीर काॅ.अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती व शेतकरी कामगार पक्षाच्या 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्षाच्या वर्धापण दिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित केलेले असतात मात्र या वेळेस सिटी केबल फेसबुक लाईव्ह कार्यक्रम शिक्षक पतपेढी येथे घेण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापण दिनानिमित्त केज येथे पक्ष कार्यालयासमोर पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहन भाई अॅड.नारायण गोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर नुतन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन भाई अॅड. संग्रम…

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघटना बळकट करण्याचा भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला आशावाद   अलिबाग: रायगडसह संपूर्ण राज्यभरात रविवारी शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मी आता ६५ वर्षाचा झालोय,तरीही मी थकलेलो नाही, मी मरगळलेलो नाही,नव्या उमेदीने,नव्या जोशाने पुन्हा शेकाप उभारणीसाठी प्रयत्न करतोय,नव्या पिढीनंही आपले योगदान द्यावे,असे भावनिक आवाहन केले. या कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस ऍड,आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स.सभापती…

म्हाळुंगे ता. करवीर येथे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात

कोल्हापूर- म्हाळुंगे ता. करवीर येथे शेतकरी कामगार पक्षाचा 73 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री. के . बी. पाटील, बाबासाहेब देवकर,सरदार पाटील,अमित कांबळे,तुकाराम खराडे, एम डी निचिते, आंनदा मोरे,म्हाळुंगे गावातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते होते,यावेळी पक्षाची ध्येयधोरणे,विचार,व भविष्यात करावयाची वाटचाल या विषयी चर्चा मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली,तसेच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आलेली घरगुती वीज बिल माफ करणेसाठी,दुधदर वाढीसाठी शासनाला ,त्या त्या विभागाला पत्रव्यवहार अथवा मोबाईल द्वारे एस एम एस प्रत्येक कार्यकर्त्याने करनेचे ठरवण्यात आले,प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला .